छंद /कला /आवड/ Hobby

लॉकडाउनच्या काळामध्ये मी माझ्या मुलासाठी राबवलेले छोटे-छोटे उपक्रम ... वेळेचा सदुपयोग.. जगण्याचे रंग फुलवायचे असतील तर छंद जिवंत ठेवले पाहिजे .छंदामुळे उठतात मनात विविध तरंग म्हणूनच तर खुलतात जगण्याचे रंग ... खर आहेे ना? वेळेला गुंतवायचं असेल तर छंद जिवंत ठेवले पाहिजे, कुठलीही एक ना एक तरी कला जोपासायला हवी... कलेमध्ये आपण स्वतःला हरवून ..निर्माण झालेल्या कलाकृतीत आपण सापडतो.. कलेमुळे जीवन बहारदार बनते ..भरपूर आनंद मिळतो🤗🤗.. कले विना जीवन म्हणजे ...सुगंध शिवाय फुल... 🌻🌺 कितीही ठरवलं तरी छंदासाठी उपलब्ध न झालेला .. वेळ ..कोरोना मुळे सगळ्यांना उपलब्ध झालेला आहे. कोरोनामुळे सगळ्यांच्या जीवनात विविध कला.. जिवंत झाल्या असाव्यात असे मला वाटते. कोरोंना मुळे शाळा बंद झाल्या ..त्यामुळे लहान मुलांना खरं तर घरात कोंबून ठेवल्यासारखे झालंय .पंख कापलेल्या पक्षांप्रमाणे त्यांच्या मनाची अवस्था झाली आहे.काय करावं ? हा त्यांच्या छोट्या डोक्याला पडलेला मोठा प्रश्न ... कोरोना कधी जाणार ? शाळा कधी उघ...