Aai
आई जीवन जगण्यासाठी तू प्रेरणा आहेस दीपस्तंभ प्रमाणे अटळ आधार आहेस अजूनही तुझ सौंदर्य असं दिसतं खुलून जसा पौर्णिमेचा चंद्र प्रकाश देतो झोकुन मधुर तुझ्या वाणीत सरस्वतीच वास करते म्हणूनच तर सगळ्यांना आपलंसं करते मनाला मन असे ठेवलेत जोडून जसे हारात फुले ठेवतात ओऊन जीवनाचे सुख दुःख तू आनंदाने पेलेली वादळ आले कितीही तरी तटस्थ राहिली खरंच तू आहेस उन्हातली सावली सर्वांची तू आहेस प्रेमळ माऊली आयुष्यात सदैव एकच मंत्र जपला जय सचितानंदा ने आनंद मिळवला आजच्या दिनी एकच सुंदर सुरेख सदिच्छा तुझ्या उदंड आयुष्याला भरभरून शुभेच्छा तुझीच सुरेखा