Kitchen chemistry

कुतूहल भाजीच्या मसाल्याचे..... आई स्वयंपाकाला लागली की ..ती भाजी कशी बनवते ? त्यात काय टाकते ?किती टाकते? कसे टाकते? या गोष्टीच मला कुतूहल वाटतं.मी नेहमीच आई स्वयंपाकात असली की मधेमधे रेंगाळतो.तीने भाजी फोडणी घातलीकी मी तिला खोरायला मदत करतो आणि अधून मधून प्रश्न करत असतो. ती मला म्हणते ,अरे...मी खूप घाईत आहे . नंतर सांगते काय ते ..पण तरी माझं आपल विचारन चालूच असते.आई आपण भाजीला कांदा का टाकतो ? तेल का खातो? मिठाचा काय उपयोग? हळद का घालतो ?यामुळे काय होते ...असे एक ना अनेक माझे प्रश्न चालूच असतात. कारण आईच म्हणते ना का ,कसे, कुठे? अशी जिज्ञासा असली पाहिजे .. तोच खरा विज्ञानाचा विद्यार्थी शोभतो..म्हणून मी सतत प्रश्न विचारतो़. मला स्वयंपाकातील विज्ञान जाणून घ्यायचे असते. आई जेव्हा तू तेलात मोहरीची फोडणी घालतेस ना, तेव्हा स्वयंपाक चालू झाला असं समजतं. हो रे... भाजी फोडणी घालताना तेलात आधी मोहरीचा तडका द्यावा लागतो. नंतर बाकी मसाले ... मोहरीचं आहारात खूप महत्त्व आहे. मोहरी आरोग्यदायी आहे.मोहरीत अनेक औषधी गुणधर्म आहेत त्यामध...