Kitchen chemistry
कुतूहल भाजीच्या मसाल्याचे.....
त्यात काय टाकते ?किती टाकते? कसे टाकते? या गोष्टीच मला कुतूहल वाटतं.मी नेहमीच आई स्वयंपाकात असली
की मधेमधे रेंगाळतो.तीने भाजी फोडणी घातलीकी मी तिला खोरायला मदत करतो आणि अधून मधून प्रश्न करत असतो.
ती मला म्हणते ,अरे...मी खूप घाईत आहे . नंतर सांगते काय ते ..पण तरी माझं आपल विचारन चालूच असते.आई आपण भाजीला कांदा का टाकतो ? तेल का खातो? मिठाचा काय उपयोग? हळद का घालतो ?यामुळे काय होते ...असे एक
ना अनेक माझे प्रश्न चालूच असतात. कारण आईच म्हणते
ना का ,कसे, कुठे? अशी जिज्ञासा असली पाहिजे ..
तोच खरा विज्ञानाचा विद्यार्थी शोभतो..म्हणून मी सतत प्रश्न विचारतो़. मला स्वयंपाकातील विज्ञान जाणून घ्यायचे असते.
आई जेव्हा तू तेलात मोहरीची फोडणी घालतेस ना, तेव्हा स्वयंपाक चालू झाला असं समजतं. हो रे... भाजी फोडणी घालताना तेलात आधी मोहरीचा तडका द्यावा लागतो. नंतर बाकी मसाले ... मोहरीचं आहारात खूप महत्त्व आहे.
मोहरी आरोग्यदायी आहे.मोहरीत अनेक औषधी गुणधर्म आहेत त्यामध्ये ओमेगा 3आणि 6,विटामिन E, खनिज, एंटीऑक्सीडेंट असतात.रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तसेच हृदयाच्या आरोग्यासाठी मोहरीचे तेल औषधी प्रमाणे काम करते.
आई जिर्याचा काय उपयोग? जिऱ्यामध्ये आढळणाऱ्या पोषक तत्त्व आणि अँटी ऑक्सीडंट पचनक्षमता वाढवतात. जिरं आपल्या प्रतिकारशक्तीलाही वाढवतं. त्यामुळे पोटासंबंधीच्या सर्व समस्या दूर होतात. जिऱ्याच्या सेवनाने जेवण लवकर आणि चांगलं पचत.जिऱ्यामध्ये आढळणाऱ्या व्हिटॅमीन ई मुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.
आई मला मिरची खुप तिखट लागते.ती का खायची? आई म्हणते, हिरव्या मिरचीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे शरीराला बॅक्टेरियापासून मुक्त ठेवण्यास मदत करतात. हिरवी मिरची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करू शकते. हिरवी मिरची मूड बूस्टर म्हणूनही काम करते. हे मेंदूमध्ये एंडोर्फिन प्रसारित करते, ज्यामुळे आपला मूड बर्याच अंशी आनंददायी राहतो.
मिठावाचून कोणाचेच चालत नाही इतके महत्त्व मिठाला आहे. मसाल्याच्या पदार्थात मीठ हे पाहिजेच. मीठ नाही म्हणजे सर्व बेचव. मिठाला सर्व रसांचा राजा म्हणतात.शरीरात मिठाचे योग्य प्रमाण असेल तर शरीरात ताकद राहते. त्याअभावी अशक्तपणा येतो. एक दिवस मीठ खाल्लं नाही तर दुसऱ्या दिवशी थकल्यासारखं होते. दात व हाडांकरिता पण आवश्यक आहे. शरीरात मीठ कमी प्रमाणात गेले तर दात लवकर किडतात. हाडे ठिसूळ होतात. मिठामुळे रूक्ष शरीराला ओलावा मिळतो. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत होते. आई तू नेहमीच भाजीला मीठ बरोबर घालते ? पण मला भाजीवर मीठ घ्यायला खूप आवडते ... पण वरून मीठ खाण्याची सवय चांगली नाही.
बघ ..हळदीमुळे सुद्धा भाजीला नुसताच रंग येत नाही तर ,हळद अतिशय गुणकारी आहे. हळदीमध्ये अँटीव्हायरल, अँटीफंगल गुण असतात. ज्यामुळे सर्दी, ताप, खोकला यासारख्या विकारावर हळद गुणकारी ठरते. वजन कमी होण्यास मदत होते .हळदीच्या दुधात कॅल्शियम असते.
आई पण मला लसुन बिलकुल नाही आवडत .जर मला भाजीत लसूण दिसला तर जेवणच करावस वाटत नाही . अरे बाबा ..लसूण मध्ये अँटिबायोटिक आणि अँटी व्हायरल गुण असतात. लसणामुळे कफ होत नाही.
सर्दी आणि खोकल्याच्या समस्यांमध्ये लसूण एक अद्भुत उपचार आहे . लसूण पचन शक्ती वाढवून पोटासंबंधी आजार दूर करतो.
तुला माहिती आहे ,आई दादा नेहमी पोह्या मधला कांदा बाजूनी काढून ठेवतो. कांदा आजिबात खात नाही.
अरे तसे नाही ,कांदा जेवनात खूप महत्त्वाचा असतो . कांद्याची पेस्ट केल्यापेक्षा तो कापून टाकलेला कधीही सोयीस्कर त्यातील पोषक मूल्य टिकून राहतात .कांद्यामध्ये फॉस्फरस असतो, तो हाडांसाठी खूप महत्त्वाचा असतो.
कांदा-खोबऱ्याच्या वाटणाशिवाय भारतीय जेवण पूर्णच होऊ शकत नाही. जेवतानाही कच्चा कांदा पानात वाढण्याची पद्धत महाराष्ट्रामध्ये आहे. याचं कारण कच्चा कांदा खाण्याचे फायदे अनेक आहेत. कच्च्या कांद्यामुळे किडनीचे कार्य खूप चांगलं चालतं .कांदा चिरताना तो जरी खूप रडवत असला तरी कांदा खाणं आरोग्यासाठी अतिशय फायद्याचं ठरतं. कांदा केस, त्वचेसाठीही औषधी आहे.
जेवणाचा स्वाद वाढविणारी, रुचकर, सुगंधी कोथिंबीर स्वयंपाकात वापरली जाते. सजावटीसाठीसुद्धा कोिथबिरीचा वापर केला जातो. कोिथबिरीचा गंध भूक वाढवितो, मन प्रसन्न करतो.
काय ग आई दादाला खूप तरीच्या भाज्या आवडतात आणि तू म्हणते की जास्त तेल शरीराला चांगले नसते. हो पण. .तेलाचा वापर प्रमाणात असावा. तेल शरीरासाठी आवश्यक असते.तेलामध्ये फॅट्स असतात.
फॅट, म्हणजे स्निग्धांशयुक्त अन्न ही शरीराची महत्त्वाची गरज आहे.
आपल्या आहारातील जीवनसत्त्वे अंगी लागण्यासाठी, शरीरातील संप्रेरकांचे (हार्मोन्स) संतुलन राहण्यासाठी, प्रजनन संस्थेचे आरोग्य नीट राहण्यासाठी, त्वचेच्या आरोग्यासाठी.. या व अशा अनेक प्रक्रियांसाठी विशिष्ट प्रमाणात स्निग्धांशयुक्त अन्नाची गरज शरीराला नेहमी असते. पण जर स्निग्ध पदार्थ प्रमाणापेक्षा जास्त झाले तर ते रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढवतात जे हृदयासाठी घातक असते.
आहारात मसाले आणि औषधी वनस्पतींचा समावेश केल्याने चयापचय वाढते. श्वसन सुधारू शकते आणि हृदय निरोगी राहते. पण हेही लक्षात ठेवणे गरजेचे आहे की हे सर्वा प्रमाणात असावे. नेहमी मसाले कमी प्रमाणात घालण्याचा सल्ला दिला जातो कारण आयुर्वेदानुसार मसाल्यांचा अतिरेक शरीरात पित्त दोष वाढवू शकतो. जास्त प्रमाणामुळे अनेक पचन समस्यादेखील वाढू शकतात.
आई तु कधी कधी भाजीला हिंग पण घालते ,ते का ?हिंग अँटिऑक्सिडेंटचा चांगला स्रोत आहे. त्यामध्ये सल्फर भरपूर असते .
हिंगाचा सर्वात सामान्य उपयोग अपचन झाल्यावर करतात. हिंग पचनासाठी लागणाऱ्या एंजाइमची क्रिया वाढवून पचन वाढविण्यास मदत करते.
भारतीय अन्नपदार्थ आणि त्यांचे आरोग्यासाठी फायदे हे समीकरण फार जुनं आणि महत्वाचं आहे. फोडणीला लागणाऱ्या जिरे-मोहरीपासून तर पानात वाढलेल्या प्रत्येक पदार्थांपर्यंत प्रत्येक घटक आपल्या निरोगी आरोग्यासाठी महत्वाची भूमिका बजावतो.
आरोग्यदायी भाजीचे साहित्य
छान महत्त्व सांगितले आहारातील मसाल्याचे👍
ReplyDelete