माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी मायक्रो केमिस्ट्री प्रॅक्टिकल किट तयार करणे.
## नवोपक्रमाचे शीर्षक -माध्यमिक स्तरासाठी मायक्रो केमिस्ट्री प्रॅक्टिकल किट तयार करणे.
## नवोपक्रमाची गरज व महत्त्व-##
विद्यार्थ्यांना रासायनिक संकल्पना एक्सप्लोर करण्यास, पदार्थातील बदल पाहण्यास आणि व्यावसायिक, वैज्ञानिक वातावरणात, वैज्ञानिक कौशल्ये प्राप्त करण्यास शालेय जीवनात प्रॅक्टिकल घेतली जातात.
विज्ञानातील रसायनशास्त्र विषयाचे प्रयोग प्रात्यक्षिक आवश्यक असतात. रासायनिक तंत्रज्ञान आरोग्य, साहित्य आणि उर्जेच्या वापरातील समस्यांवर नवीन उपाय प्रदान करून आपल्या जीवनाची गुणवत्ता अनेक प्रकारे समृद्ध करण्यास मदत करतात.
सैद्धांतिक कार्य अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी . विशिष्ट विषयात रस वाढवण्यासाठी. बदल आणि नवकल्पना करण्यात मदत करतात. वर्ग नऊ किंवा दहा मध्ये जी प्रॅक्टिकल घेतली जातात .त्यामध्ये रसायन ग्रॅम मध्ये वापरले जातात .प्रयोगासाठी काचेचे टेस्ट ट्यूब ,बिकर वापरली जातात त्यामुळे एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या देशांमध्ये एवढी रसायन ,उपकरण , जिकरीचे काम आहे.म्हणून हीच रसायने जर स्मॉल क्वांटिटी म्हणजेच मायक्रो लेव्हल वर वापरली गेली तर दहा विद्यार्थ्यांना लागणारे रसायने ही शंभर विद्यार्थ्यांना पुरवले जाऊ शकतात. लिक्विडच्या दहा ड्रॉप ऐवजी एका ड्रॉप मध्ये काम भागू शकते .मायक्रो लेव्हल वर प्रयोग करूनही रिझल्ट मात्र तेच असतात. हा सर्वात मोठा आउटपुट आहे.
उपकरण हाताळताना विद्यार्थी संकोचत असतात कारण शिक्षक वारंवार सूचना देत राहतात उपकरण व्यवस्थित हाताळा. हे फुटलेली काच विल्हेवाट लावणे हे सुद्धा एक महत्त्वाचं काम असते .
तसेच रसायनांचे वेस्ट हे सुद्धा एक मोठी समस्या असते.जर आपण ती मायक्रो लेव्हलवर वापरली तर ह्या समस्या उद्भवणार नाही. प्रयोग करताना जर आपण टेस्ट ट्यूब ऐवजी आपण petri डिश , वॉच क्लास किंवा स्लाइडवर हे प्रयोग करून बघितले तर ते कपड्याने लगेच स्वच्छ करता येतात.
प्रयोगासाठी लागणारे रसायन स्मॉल क्वांटिटी मध्ये वापरल्यामुळे रसायनांचा व काचेचा बचाव होतो हे माझ्या उपक्रमाचे वेगळेपण आहे .
माझ्या या उपक्रमाचा उपयोग देशातील प्रत्येक शिक्षकांना होऊ शकतो. शंभर विद्यार्थ्यांना लागणारी रसायने आपण हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतो सर्व विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळू शकतो म्हणून माझा हा उपक्रम अत्यंत उपयुक्त आहे. शिक्षकांसाठी लागणारी मायक्रो केमिस्ट्री किट सुद्धा मी तयार केलेली आहे.
##नवोपक्रमाची उद्दिष्टे-- ##
1) शिक्षकांसाठी मायक्रोस्केल केमिकल किट तयार करणे.
2) लो कॉस्ट मध्ये जास्तीत जास्त शिक्षकांना/ विद्यार्थ्यांना प्रयोगाचे साहित्य/ रसायना उपलब्ध करून देणे.
3) शाश्वत विकासासाठी रसायनांचा कमीत कमी वापर करणे 4)प्रयोगादरम्यान वापरल्या जाणाऱ्या रसायनांचा व काचेचा कचरा कमी करणे.
5) प्रयोग मायक्रो लेव्हल वर घेऊनही निष्कर्ष मिळवणे.
## नवोउपक्रमाचे नियोजन##
पूर्व परिस्थिती-- आधी फक्त शिक्षकच प्रयोग करून दाखवायचे.रसायने जास्त खर्च होतात म्हणून विद्यार्थ्यांना करण्याची संधी मिळत नसे.तसेच फुटण्याची पण भीती असते.पण आता अगदी कमीत कमी रसायन लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा प्रयोग करण्याची संधी उपलब्ध होते.प्रत्यक्ष प्रयोग करता येतो . अनुभव घेता येतो.
इतरांशी चर्चा--
अगस्ती इंटरनॅशनल फाउंडेशन तर्फे जिज्ञासा ही विज्ञान प्रदर्शनी दरवर्षी घेण्यात येते.त्यामध्ये माझे विद्यार्थी आणि मी स्टेट लेव्हलवर प्रेझेंटेशन करतो. माझ्या मुलाची नॅशनल करता निवड झाली होती.त्याच दरम्यान अगस्त्या मार्फत पुणे येथे कार्यरत असलेले ज्योतिबा सर, यांच्याशी मी नेहमी चर्चा करते.त्यांच्याशी मी माझ्या उपक्रमाबद्दल चर्चा केली.तसेच माझे मैत्रीण उज्वला तायडे मॅडम अरविंद माध्यमिक विद्यालय अडगाव येथील विज्ञान सहाय्यक शिक्षिका यांच्याशी सुद्धा मी माझ्या उपक्रमाबद्दल चर्चा केली ,तर त्यांनी मला हा एक छान उपक्रम आहे म्हणून सांगितले.
आवश्यक रसायने-
प्रयोगा साठी लागणाऱ्या रसायनांची यादी
Litmus paper, universal solvent,Phenaphthtalin indicator, HCl, H2SO4, NaOH, Ca(OH) 2 ,Fe, Zn,Mg,Cu,Al, CuSO4, ZnSO4, Feso4, Bacl2, Na2SO4, AgNO3,Al2(SO4)3, , FeS, CaO, NaCl, KOH, Na2CO3, KMnO4, CaCO3, NaHCO3, plaster of paris, edible oil,
इतर साहित्य
वॉच ग्लास ,स्लाईड ,प्लास्टिक पेपर, ड्रॉपर , लहान छोट्या टेस्ट ट्यूब, रिकाम्या काचेच्या औषधींच्या बाटल्या ,फेविकॉल, कागदी पट्ट्या, प्लास्टिकचा बॉक्स इत्यादी साहित्य..
कृतींचा क्रम -- माध्यमिक स्थराकरता लागणाऱ्या वर्ग 8,9,10, च्या विज्ञान पुस्तकातून प्रयोगासाठी लागणाऱ्या सर्व रसायनांची यादी तयार केली. प्रयोगांची यादी तयार केली .सर्व रसायनांची जुळवा जुळव केली.
दवाखान्यातील वेस्ट काचेच्या इंजेक्शनच्या बॉटल जमा केल्या.त्या स्वच्छ धुऊन नंतर कोरड्या पुसून घेतल्या . प्रत्येक बॉटलमध्ये एक एक रसायन भरले .त्यानंतर त्यावर लेबल लावले. सर्व बॉटल एका प्लास्टिकच्या बॉक्स मध्ये ठेवण्यात आल्या.
उपक्रमोत्तर परिस्थितीचे निरीक्षण--
प्रत्यक्ष कृती करणे, निरीक्षण करणे यामधून विद्यार्थी अनुभवातून शिकले .अनुभवात्मक शिक्षण ही अनुभवातून शिकण्याची प्रक्रिया आहे. विद्यार्थ्यांसाठी, अनुभवात्मकशिक्षण त्यांना त्यांच्या स्वतःच्या कल्पनांचे अनुसरण करण्यास आणि समस्या उद्भवल्याबरोबर कार्य करण्यास सक्षम करते. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण झाला.प्रयोगाबद्दल आवड निर्माण झाली. विद्यार्थ्यांची विज्ञान विषयातील अभिरुची समृद्ध व संपन्न झाली. प्रयोग कौशल्य विकसित झाले. विज्ञान शिक्षणाच्या प्रक्रियेतील निरीक्षण, तर्क ,अनुमान, तुलना करणे ,प्राप्त माहितीचे उपयोजन करणे शिकले.
कार्यवाहीचे टप्पे-- वर्ग आठ नऊ दहा च्या विद्यार्थ्यांकरिता 1जुलै2023 पासून एक डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. जो घटक शिकवायचा आहे त्या दिवशी उपलब्ध तासिकेच्या वेळे मध्ये प्रात्यक्षिक दाखवण्यात आली .त्यानंतर विद्यार्थ्यां चे गट करून त्यांनी स्वतः कृती केली. विद्यार्थी प्रयोगातून शिकले. अनुभव संपन्न झाले.
ज्या शाळेत खूप जास्त विद्यार्थी संख्या असेल तिथे प्रोजेक्टर वर प्रात्यक्षिक दाखवता येतात. नंतर गटातून कृती करतील.
##इतरांची मदत-- या कार्यासाठी मला माझ्या शाळेचे मुख्याध्यापक ,शाळेतील सहकारी शिक्षक ,इतर कर्मचारी आणि सर्वात प्रिय माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांची खूप मदत झाली. उपक्रम राबवत असताना अडचणी आल्या ,त्या पार करत शेवटी उपक्रम यशस्वी झाला.
5)## कार्यपद्धती
प्रयोग यादी
1) लिटमस पेपरच्या साह्याने आम्ल आम्लारी ची टेस्ट घेणे.
2) वैश्विक दर्शकाच्या साह्याने विविध पदार्थांचे PH काढणे.
3) लोखंड आणि गंधकाच्या मिश्रणातून लोखंडाचे चुंबकाच्या साह्याने लगीकरण करणे.
4) आम्ल आणि आम्लारींची उदासीनीकरण अभिक्रिया
5) कॉपर सल्फेट च्या द्रावणात खीळा टाकला असत
खीळ्यावर तांब्याचा थर चढतो.
6) विद्युत अपघटन , विचरण
7) सोडियम बायकार्बोनेट आणि सायट्रिक ऍसिड( लिंबू )यांचे अभिक्रिया
8) कॅल्शियम कार्बोनेटवर हायड्रोक्लोरिक आम्ल अभिक्रिया
9) Decolonization of पोटॅशियम परमॅग्नेट by lemon
10) डिटर्जंट आणि हळद अभिक्रिया
यासारखे इतरही अनेक प्रयोग विद्यार्थ्याना कमीत कमी रसायने वापरून करून दाखवता येतात . विद्यार्थी आनंदाने, जिज्ञासेने ,उत्सुकतेने प्रयोग करतात .शिकवलेल्या घटकाला स्वानुभवातून समजून घेतात.
6)##उपक्रमाची यशस्विता फलश्रुती -- विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना रसायनांचे किट उपलब्ध झाली. वर्ग सहावा आणि वर्ग नववा मधील जे विद्यार्थी होमी भाभाच्या परीक्षेला बसतात आणि प्रॅक्टिकलच्या सेकंड लेव्हल साठी प्राप्त ठरतात .त्यांना सुद्धा मायक्रो केमिस्ट्री किट खूप उपयुक्त ठरली. इतरही शिक्षकांना ही किट कमी दरात जास्त विद्यार्थ्या ना उपलब्ध झाली. रसायन कमीत कमी वापरली गेली . सर्व विद्यार्थ्यांना प्रयोग साहित्य उपलब्ध झाले . प्रयोग कौशल्य विकसित झाले . विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण झाला . रसायन शास्त्राची आवड निर्माण झाली . विद्यार्थ्यांना रसायनांच्या संज्ञा, सूत्रे ,रासायनिक अभिक्रिया समजल्या .शाश्वत विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाची बीजे पेरली गेली. रसायनांची ओळख पटली. शिकवलेला घटक सहज समजू लागला. रसायनांची सूत्रे पाठ झाली. शैक्षणिक संपादनूक होऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली.
7)##समारोप--
मी राबवलेल्या उपक्रमामुळे माझे विद्यार्थी रसायनांचा काटकसरीने वापर करणे शिकले. भावी जीवनातील शास्त्रज्ञ घडवण्यासाठी मदत झाली. एकमेकांना मदत करणे ,मिळून काम करणे हा गुण विकसित झाला .प्रायोगिक कौशल्य, निरीक्षण क्षमता , सर्जनशीलता, उपक्रमशीलता विकसित झाली.
इतरही शिक्षक अशा प्रकार ची किट तयार करतील. कमीत कमी रसायनांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभ होईल.. वर्ग 6 वा वर्ग व नऊ 9 च्या होमी भाभा च्या सेकंड लेव्हल प्रात्यक्षिक परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रयोगाचा सराव करण्यासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त अशी ही किट आहे .
वर्ग आठ च्या एन डबल एम एस शिष्यवृत्ती परीक्षेच्या क्लास मधील विद्यार्थ्यांना सुद्धा हे प्रॅक्टिकल दाखवण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. सर्वच विद्यार्थी प्रात्यक्षिकातून शिकले. विज्ञानाच्या सर्व शिक्षकांसाठी माझा अत्यंत उपयोगी उपक्रम आहे.
8) ## संदर्भसूची
माहितीची संकलन-- Internet, विज्ञान विषय पुस्तके, विज्ञान प्रदर्शनी , विज्ञान विषयक कार्यक्रम ,यामधून माहिती मिळवली.
9) परिशिष्ट--उपक्रमाचे नियोजन ,कार्यवाही आणि यशस्वीतेसाठी मी विविध तज्ञ मार्गदर्शकांच्या व शिक्षकांच्या सोबत चर्चा केल्या. पुस्तकांचे वाचन केले.प्रयोगशाळांना भेटी दिल्या. शिक्षकांची मत जाणून घेतली.विद्यार्थ्यांशी चर्चा केली, त्यांचे अनुभव घेतले.
###प्रश्नावली
1) प्रात्यक्षिकाचे महत्त्व काय?
2) आम्लांची नावे सांगा ?
3) आम्लारी ची नावे सांगा ?
4) लीटमस पेपर चा उपयोग काय?
5) कॅल्शियम कार्बोनेट चे सूत्र सांगा?
)खाण्याचे सोड्याचे सूत्र सांगा?
7) कॉपर सल्फेट चा रंग कोणता?
8) लोखंड, तांबे यांच्या संज्ञा सांगा?
9) मीठ हे कोणते संयुग आहे?
10) सहसंयुज संयुग कोणते?
Comments
Post a Comment