Hyderabad Science Study Tour Report

Hyderabad Science Study Tour Report
Presented by🌷🌷🌷
Miss Surekha Gajanan Makode
Yashoda Madhyamik Vidyalay Chandicapur, 
Taluka -Akot.. Dist-Akola

 पाठ्यपुस्तकातून अभ्यास विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांसमोर एक आवाहनच आहे .विज्ञानाच्या माध्यमातून बदलत्या युगाची स्पर्धा करताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकाची भूमिका महत्त्वाची असते.शिक्षकांना शिक्षण व आधुनिक बदलाची मोट बांधता यावी ,यासाठीच अल्पावधीतच शिक्षण क्षेत्रात आपली छाप  उमटवणार्‍यां उपक्रमशील शिक्षणाधिकारी डॉक्टर सुचिता पाटेकर मॅडम यांनी जिल्ह्यातील 60 विज्ञान गणित शिक्षकांचा विज्ञान अभ्यास दौरा आयोजित केला.
या विज्ञान अभ्यास दौऱ्याच्या माध्यमातून बुद्धी कौशल्य संपादन करून शिक्षकांना विज्ञान संशोधनाची दिशा मिळाली.शिक्षकांचा विचारांची प्रगल्भता वाढवण्यासाठी व शैक्षणिक स्थळ विज्ञानाच्या माध्यमातून बळकट करण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला.अभ्यासक्रम, पाठ्यक्रम एवढ्यावरच न थांबता विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी शिक्षकांना कृतीयुक्त अध्यापन पद्धती व झपाट्याने बदलत जाणाऱ्या अभ्यास पद्धती प्रत्यक्ष अनुभवाता याव्या .,..विज्ञान ,खगोल विज्ञान यासारख्या विज्ञानाच्या विविध शाखांच्या अभ्यासातून विचारांची प्रगल्भता वाढावी. याकरताा हा दौरा आयोजित करण्यात आला.
 या अभ्यास दौऱ्याचे उत्कृष्ट नियोजन जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र भास्कर सर ,पातुर तालुका  विज्ञान अध्यापक मंडळ अध्यक्ष श्री .मुसळे सर, श्री.थोरात सर, श्री .बांगर सर   यांनी केले. . 
अभ्यास दौरा यशस्वी करण्यासाठी HBCSE  मुंबईचे प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र देशमुख यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
 तसेच हैदराबाद स्थित Birla science सेंटरचे शास्त्रज्ञ डॉक्टर विश्वनाथ गोगटे व डॉक्टर स्नेहा गोगटे यांच्या मार्गदर्शनाचा सिंहाचा वाटा राहिला.

दिनांक 8 ऑगस्ट 2023 ला सकाळी नऊ वाजता अकोल्या वरून कुचीगुडी ट्रेन ने 60 शिक्षकांची टीम हैदराबादला रवाना झाली व संध्याकाळी नऊ वाजता पोहोचली. तिथे नियोजित राहण्याची व जेवणाची उत्तम व्यवस्था केलेली होती.
अनुक्रमाणिका
1) अकोला येथून रवाना
2) रामोजी फिल्म सिटी ,हैदराबाद
3) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन सायन्स हैदराबाद
4) सालार जंग म्युझियम 5)स्नो वर्ल्ड
6) चारमिनार 
7)नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर
8) डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टॅच्यू 
9) लुंबिनी गार्डन
10) बौद्ध हुसेन सागर
11) लेझर शो
12) स्कूल विजिट ऑफ हैदराबाद 13)डॉक्टर विश्वनाथ गोमटे विज्ञान वाहिनी 
14)निर्मला बिर्ला गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट
15) डॉक्टर कुमार सर यांनी दाखवलेले विज्ञानाचे प्रयोग

9 ऑगस्ट 2023 ला सकाळी आठ वाजता सर्व शिक्षक फ्रेश होऊन मेस मध्ये आठ वाजता चा नाश्ता घेऊन रामोजी फिल्म सिटी साठी निघाले.
रामोजी ‘फिल्म सिटी’ मध्ये फक्त चित्रपटांचीच निर्मिती होत नसून, हे एक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध होेत आहे. दक्षिण भारतातील हैदराबादमध्ये ही सुंदर फिल्म सिटी असून, सुमारे १५ हजार एकरात उभारली आहे.
आभासी व वास्तव देण्यातला फरक काय असतो हे समजण्यासाठी रामोजी फिल्म सिटीची भेट खूप आवश्यक आहे.कारण विद्यार्थी सिनेमालाच खरी दुनिया समजतात.परंतु वास्तविक  सिनेमा कसा तयार होतो हे आम्ही तिथे प्रत्यक्ष पाहिले. बाहुबली  सिनेमा बघताना आपण गुंग  होऊन जातो परंतु येथील बाहुबली सेटला भेट दिल्यानंतर कळते की ही सगळी एडिटिंग ची कमाल आहे.
10 तारखेला  सकाळी नऊ वाजता NIN करिता निघालो .नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन ( NIN ) हे हैदराबाद , भारत येथे स्थित एक भारतीय सार्वजनिक आरोग्य , पोषण आणि अनुवाद संशोधन केंद्र आहे . [१] [२] ही संस्था भारतातील सर्वात जुन्या संशोधन केंद्रांपैकी एक आहे, आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अंतर्गत, उस्मानिया विद्यापीठाच्या परिसरात असलेले सर्वात मोठे केंद्र आहे  यांचे प्राध्यापक डॉक्टर पाटील सर यांनी शेवगा आणि विटामिन डी ,आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी पोषक घटकावर उत्तम मार्गदर्शन केले .कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी शरीरासाठी का आवश्यक आहेत, त्यांची कमतरता कशी ओळखावी?
व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमचे महत्त्व: व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम दोन्ही शरीरासाठी आवश्यक आहेत. ते हाडे, दातांच्या इतर अनेक समस्यांपासून शरीराला सुरक्षित ठेवतात. तथापि, दोघांची स्वतःची कार्ये आणि महत्त्व आहे. शरीरात दोन्हीची कमतरता कशी ओळखावी, त्यांच्यात काय फरक आहे, कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे काय आहेत, जाणून घ्या याविषयी सर्व काही इथल्या तज्ज्ञांकडून….
उपलब्ध वेळेत मी माझ्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी प्रतिकृतीचे म्हणजेच जैविक घड्याळ चे महत्व समजून सांगितले.
त्यानंतर तीन वाजता सालार जंग संग्रहालय ला भेट देण्यात आली.हे तेलंगणा राज्याची राजधानी हैदराबाद शहरातील मुसा नदीच्या दक्षिणेकडील दार-उल-शिफा येथे स्थित एक कला संग्रहालय आहे . हे भारतातील तीन राष्ट्रीय संग्रहालयांपैकी एक आहे. म्युझियम मधील घड्याळ हे एक महत्त्वाचे आकर्षण केंद्र होते.. 
त्यानंतर सायंकाळी snow park.पार्क ला भेट देण्यात आली. तिथे आम्ही बर्फात खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला.

 अकरा तारखेला सकाळी नऊ वाजता चार मिनार ला भेट देण्यात आली . हे एक मस्जिद स्मारक आहे . विश्वस्तरावर चारमिनाार हे हैदराबादचं प्रतीक म्हणून ओळखले जाते.चारमीनार , 1591  मध्ये निर्मित आहे.

त्यानंतर नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर ला भेट देण्यात आली.
हैदराबाद येथील नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर (NRSC) रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट डेटा संपादन आणि प्रक्रिया, डेटा प्रसार, एअरबोर्न रिमोट सेन्सिंग आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी निर्णय समर्थन यासाठी जबाबदार आहे. भारतीय रिमोट सेन्सिंग उपग्रह तसेच इतरांकडून डेटा प्राप्त करण्यासाठी NRSC चे हैदराबादजवळ शादनगर येथे डेटा रिसेप्शन स्टेशन आहे.
Application of remote sensing
Environment land use, Geoscience of water, agriculture, soil, forest, oceans  या विषयावर प्रकाश टाकण्यात आला.
Bhuvan Geo platform
Visualization-Geoghraphical indication of India 
Road network and Navigation
Ministry education
School Bhuvan- NCERT
मार्गदर्शन करण्यात आले जे विद्यार्थ्यांना अत्यंत उपयोगी आहे.

ISRO शाखा असलेल्या नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरमध्ये चंद्रयान तीन चे उड्डाण भरताना कोणते सेंसर काम करतात व fuel कोणत्या पद्धतीने याला मिळते .याबद्दल शिक्षकांनी प्रात्यक्षिक पाहिली. विविध प्रतिकृतींचा अभ्यास केला

हुसेन सागर हे हैदराबाद , तेलंगणा , भारतातील एक कृत्रिम तलाव आहे . [१] हे मुसी नदीच्या उपनदीवर १५६२ मध्ये बांधले गेले. 1992 मध्ये, तलावाच्या मध्यभागी असलेल्या एका बेटावर गौतम बुद्धांची एक मोठी अखंड मूर्ती उभारण्यात आली. हे हैदराबादला त्याचे जुळे शहर सिकंदराबादपासून वेगळे करते .
12 तारखेला सकाळी आठ वाजता  गुजराती विद्या मंदिर हायस्कूल हैदराबाद व्हिजिट करण्यात आले.

अकरा वाजता बिर्ला सायन्स सेंटरला पोहोचलो . तिथे डॉक्टर विश्वनाथ गोगटे आणि डॉक्टर स्नेहा गोगटे  यांनी सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक स्वागत केले.
विज्ञान आश्रम पुणे जिल्ह्यातील पाबळ गावातील एक शैक्षणिक संस्था आहे. डॉ. श्रीनाथ शेषगिरी कलबाग हे या संस्थेचे संस्थापक आहे.ते हिंदुस्थान लिव्हर या प्रसिद्ध कंपनीच्या ‘इंजिनिअरिंग सायन्स’ विभागाचे प्रमुख होते. शिक्षण हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. त्यांनी १९८३ च्या सुमारास विज्ञान आश्रम सुरू केला. अनेक मुले, त्यांनी शाळा सोडली असली तरी, जीवनात यशस्वी होतात. ती काम करत करतच शिकतात. याचाच अर्थ काम करत करत शिकणे ही शिकण्याची नैसर्गिक पद्धत आहे. समाजातील जास्तीत जास्त मुले अशा प्रकारे शिकत असतील तर शिकण्याची हीच मुख्य  पद्धत हवी, या विचारातून डॉक्टरांनी विज्ञान आश्रमाची स्थापना केली. आणि त्यांचाच वारसा गोगटे दांपत्य पुढे चालवत आहेत.

निर्मला बिर्ला मॉडर्न आर्ट गॅलरीच्या खालच्या डेकवर हिंदू पौराणिक कथांमधील दृश्यांची मोठी चित्रे उभी आहेत. पण तुमचे लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे रामायणातील एका दृश्याचे अर्धवट झालेले चित्र. कारण याच कामादरम्यान 1992 मध्ये कलाकार इक्बाल हुसैन यांचे निधन झाले आणि आता त्यांची अपूर्ण कलाकृती फक्त प्रतीक्षा करत आहे. अनेकांना माहीत नसलेल्या कलाकाराचे काम दाखविण्यासाठी आर्ट गॅलरी इक्बाल हुसेन सप्ताह साजरा करत आहे. आणि त्यांच्या जवळपास 40 कलाकृती प्रदर्शनात आहेत.

"इक्बाल हुसेन यांना हिंदू पौराणिक कथांवर काम करायला आवडते. कलाकार दोन महाकाव्यांमधून विविध दृश्ये तयार करण्यासाठी ओळखले जात होते आणि ते देण्यासाठी त्यांनी खूप काळजी घेतली,"इक्बाल नेहमी तपशीलाकडे लक्ष देत असे आणि ते त्यांच्या कामात दिसून येते. "त्यांच्या बर्‍याच कामांमध्ये बरेच लोक आहेत, उदाहरणार्थ, महाभारताचा शेवटचा सीन, जिथे किमान शंभर चेहरे आहेत. पण, एकही चेहरा सारखा नाही. काळजीपासून आरामापर्यंत, कोणतेही दोन चेहरे सामायिक करत नाहीत.
Experience of science
Nirmla science Center चीफ डायरेक्टर डॉक्टर कुमार सर यांनी शिक्षकांना खूप छान छोटे छोटे प्रयोग करून दाखवले आणि शिक्षकांशी हितगुज साधले.
 धन्यवाद 
धन्यवाद डॉक्टर सुचिता पाटेकर मॅडम आपण आम्हाला इतकी छान संधी दिली ज्यामुळे  आमच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या. सर्वव शिक्षकांसाठी हा अभ्यास दौरा खूप महत्त्वाचा ठरला.
Thanku so much...Madam🙏🙏🙏 

Comments

Popular posts from this blog

माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी मायक्रो केमिस्ट्री प्रॅक्टिकल किट तयार करणे.

छंद /कला /आवड/ Hobby