घरातली समानता

घरातली समानता ....... मुलगा आणि मुलगी घरकामात समान असतात, त्यामध्ये भेद नसतो. महिलांचा आदर करणे त्यांना समान दर्जा देणे. ही भावना मुलांच्या मनात घरातच रुजवली जावी.समानता पालकांच्या आचरणात ,वागण्यात, बोलण्यात असावी. आम्ही दोघ पण टीचर . कुटुंबापासून दूर बाहेरगावी . जेव्हा मी गावी जायचे तेव्हा बघायचे की माझे सासरे मशीन भरल्यानंतर सामान अगदी व्यवस्थित ,नीटनेटकेपणाने ठेवायचे .त्यांची स्वच्छता बघून खूप छान वाटायचं . मला दोन मुलं , मोठा अकरावीला लहान सहावीला.छोटासा संसार .जेव्हा मी सकाळच्या स्वयंपाकात असते . तेव्हा स्वच्छतेची काम, इतर आवरासावर त्यांच्याकडे असते. प्रत्येक जण ठरलेली काम करतात. कारण सगळे काम आटपून, मला पण शाळेत जायचं असते. रात्रीच्या जेवणानंतर सुद्धा मला आवर्जून मदत केली जाते . सणासुदीला डेकोरेशन करणे , झाडांना पाणी घालने , भाजी तोडायला मदत करणे, पूजेसाठी फुले आणणे , कधी पूजा करणे अशी काम मुले लगेच करतात. हे काम मुलींचं आहे असं ते कधीच म्हणत नाही. मलाही कधी मुलीची कमी भासत नाही. मुलांचा अनुभव मला लॉकडा...