घरातली समानता
घरातली समानता .......
मुलगा आणि मुलगी घरकामात समान असतात, त्यामध्ये भेद नसतो. महिलांचा आदर करणे त्यांना समान दर्जा देणे. ही भावना मुलांच्या मनात घरातच रुजवली जावी.समानता पालकांच्या आचरणात ,वागण्यात, बोलण्यात असावी.
आम्ही दोघ पण टीचर . कुटुंबापासून दूर बाहेरगावी . जेव्हा मी गावी जायचे तेव्हा बघायचे की माझे सासरे मशीन भरल्यानंतर सामान अगदी व्यवस्थित ,नीटनेटकेपणाने ठेवायचे .त्यांची स्वच्छता बघून खूप छान वाटायचं .
मला दोन मुलं , मोठा अकरावीला लहान सहावीला.छोटासा संसार .जेव्हा मी सकाळच्या स्वयंपाकात असते . तेव्हा स्वच्छतेची काम, इतर आवरासावर त्यांच्याकडे असते. प्रत्येक जण ठरलेली काम करतात. कारण सगळे काम आटपून, मला पण शाळेत जायचं असते.
रात्रीच्या जेवणानंतर सुद्धा मला आवर्जून मदत केली जाते .
सणासुदीला डेकोरेशन करणे , झाडांना पाणी घालने , भाजी तोडायला मदत करणे, पूजेसाठी फुले आणणे , कधी पूजा करणे अशी काम मुले लगेच करतात. हे काम मुलींचं आहे असं ते कधीच म्हणत नाही. मलाही कधी मुलीची कमी भासत नाही.
मुलांचा अनुभव मला लॉकडाऊन मध्ये आला.कामवाल्या मावशी बंद झाल्या . भांडी ,कपडे , पोछा ही काम माझ्याकडे आली .पण दोन्ही मुलांनी मला आनंदाने मदत केली .मी भांडी घासली की ते भांडी धुवायची .एक सकाळी तर दुसरा संध्याकाळी . लहाना तर खूप छान पाणी पण खेळायचा . rod नी फरशी पुसायचं काम तर दोघा भावांनी एकएक दिवस वाटून घेतल. मिळून काम केल्यामुळे मला माझे छंद जोपासण्याला वेळ मिळाला.
माझ्या मिस्टरांच्या व्यायाम, जेवण, पेपर वाचणे, टीव्ही बघणे या सगळ्यां वेळा ठरलेल्या आहेत .प्रत्येक काम वेळेतच केलं गेलं पाहिजे. कोणतेही काम असो ते आनंदाने केले पाहिजे . त्याच सवयी मुलांना लागल्या. मला नेहमी व्यायाम करणे ,पुस्तक वाचणे यासाठी प्रेरित करतात. फोर व्हीलर शिकण्यासाठी आग्रह करतात. आवर्जून बँकेचे व्यवहार करायला लावतात. आजच्या युगात स्त्री पुरुष समान आहेत असं म्हणतात. मला अभिमान आहे की माझ्या सासुबाई माजी शिक्षण सभापती आहेत.
मला रांगोळी चित्र काढण्याचा छंद आहे .माझी दोन्ही मुलं खूप छान रांगोळी ,चित्र काढतात . रांगोळी स्पर्धेमध्ये भाग घेतात, क्रमांकही पटकावतात.माझा छोटा मुलगा सुंदर ऑइल पेस्टल कलरिंग करतो. काढलेली चित्रे बर्थडेला गिफ्ट करतो .हे सुट्टी मधले छंद .छंदामुळे मनोरंजन होते, ज्ञानात भर पडते. नवनिर्मितीचा आनंद मिळतो . मनाची एकाग्रता वाढते .
मुलांना जीवनात वेळेचे महत्त्व समजून सांगतो.
वेळ खूप मौल्यवान आहे. गेलेली वेळ परत कधीच मिळू शकत नाही. जो विद्यार्थी आपल्या वेळेचा चांगला वापर करतो. तो यशस्वी होतो. मोठा मुलगा दहावीत नॅशनल लेव्हल ची NTS exam पास झाला.
शाळेच्या दिवसात मुलांचा अभ्यास घेते . उन्हाळ्याच्या दिवसात मुलासोबत चेस खेळते/ व्यायाम करते. घर हे सगळ्यांच असते एकाने पसरवलं तरी दुसऱ्याने आवरायचं असते .मुलं अनुकरणप्रिय असतात. कुठलही काम छोटा असो वा मोठ ते पूर्ण करायला मदत करणे , हास्य विनोदी कार्यक्रम बघायला मला सहभागी करून घेणे .अशा अनेक चांगल्या सवयी त्यांना लागलेल्या आहेत.
स्वच्छतेच ज्ञानामृत आम्ही नेहमी मुलांना देतो. निरोगी राहण्यासाठी स्वच्छता अत्यंत आवश्यक आहे. माणसाने स्वतः स्वच्छता केली पाहिजे. भारतीय संस्कृतीत जेथे जेथे स्वच्छता असते तेथे लक्ष्मी निवास करते. हे संस्कार त्यांच्या मनावर बिंबवले जातात. दिवाळीच्या स्वच्छतेत उत्साहाने सहभागी होणे,फुलांचे हार बनवणे ,दिव्यांची आरास मांडणे , ही काम हौशीने करतात.
दोघेही बाहेरून आल्यानंतर ,जेव्हा घर सगळीकडे स्वच्छ झाडलेल आणि तुळशीवर दिवा जळत असतो . तेव्हा मन खूप प्रसन्न आणि आनंदी होतं . माझ्या मैत्रिणी सुद्धा नेहमी त्यांचं कौतुक करतात. त्या म्हणतात ,आमच्या मुली सुद्धा एवढं काम करत नाही. कोरोना काळात सुद्धा मुलांनी खूप व्यवस्थितपणे स्वतःला आणि घराला सांभाळलं.
अशा प्रकारच्या माझ्या कुटुंबातील वातावरणामुळे मला असं वाटते की नव्या जगात समपातळीवर वावरताना मुलीच नाही तर मुलंही अनेक गोष्टी जेंडरलेस म्हणून स्वीकारतील याची मला खात्री आहे. मुलामुलींची काम वेगळी नसतात लाईफ स्किल सगळ्यांना सारखीच असतात.
सुरेख लिहिलं. तुझ कुटुंब सगळ्यांसाठी आदर्श आहे.
ReplyDelete🙏🙏
ReplyDelete