Posts

Showing posts from November, 2022

मैत्री पक्षांसोबत

Image
एकदा गणपती उत्सवानंतर मुले वाजत गाजत गणपती विसर्जनासाठी शाळेच्या जवळच असलेल्या शेततळ्यावर गेले ..शेततळ्याच्या अवतीभवती बाभळीची खूप हिरवीगार काटेरी झाडे होती. त्यावर लटकलेली छान पक्षांची घरटी बघून मुलांना त्यांच्या जवळ जाण्याचा मोह झाला . काही घरट्यांमध्ये इवलीशी पिल्ले तर काही मध्ये अंडी होती .एका मुलाने तिथले घरटे उचलून शाळेत आणले ...मोठ्या आनंदाने त्यानी ते घरटं मॅडमला भेट म्हणून दिल. घरट बघून मॅडमचा जीव कासावीस झाला .त्यांनी विद्यार्थ्याला विचारले काय रे? हे घरटं कुठून आणलं? कशासाठी आणलं ?आणि ह्यात पिल्लं होती का ?ती कुठे गेली? असा प्रश्नांचा भडीमार केला ...त्यावर विद्यार्थी म्हणाला थोडा अवघडला आणि घाबरत म्हणाला ,मॅडम... घरट्यामध्ये पिल्ले होती पण मी ती बाजूने काढून ठेवली आणि मग आणलं .मी पिल्लांना मारलं नाही.त्यावर मॅडम म्हणाल्या अरे ..ती पिल्ले.. तर कोणाचे तरी शिकार होतीलच ना आणि खाल्ले जातील . हे  सुंदर विश्व बघण्या आधीच संपून जातील . हे बघा ,जसं आपलं घर कोणी उध्वस्त केलं, ...तर तुम्हाला आवडेल का ? आपण किती दुःखी होऊ ...पक्षांचे सुद्धा आपल्यासारखच असतं.. पक्षी...