मैत्री पक्षांसोबत
एकदा गणपती उत्सवानंतर मुले वाजत गाजत गणपती विसर्जनासाठी शाळेच्या जवळच असलेल्या शेततळ्यावर गेले ..शेततळ्याच्या अवतीभवती बाभळीची खूप हिरवीगार काटेरी झाडे होती. त्यावर लटकलेली छान पक्षांची घरटी बघून मुलांना त्यांच्या जवळ जाण्याचा मोह झाला . काही घरट्यांमध्ये इवलीशी पिल्ले तर काही मध्ये अंडी होती .एका मुलाने तिथले घरटे उचलून शाळेत आणले ...मोठ्या आनंदाने त्यानी ते घरटं मॅडमला भेट म्हणून दिल.
घरट बघून मॅडमचा जीव कासावीस झाला .त्यांनी विद्यार्थ्याला विचारले काय रे? हे घरटं कुठून आणलं? कशासाठी आणलं ?आणि ह्यात पिल्लं होती का ?ती कुठे गेली? असा प्रश्नांचा भडीमार केला ...त्यावर विद्यार्थी म्हणाला थोडा अवघडला आणि घाबरत म्हणाला ,मॅडम... घरट्यामध्ये पिल्ले होती पण मी ती बाजूने काढून ठेवली आणि मग आणलं .मी पिल्लांना मारलं नाही.त्यावर मॅडम म्हणाल्या अरे ..ती पिल्ले.. तर कोणाचे तरी शिकार होतीलच ना आणि खाल्ले जातील . हे सुंदर विश्व बघण्या आधीच संपून जातील .
हे बघा ,जसं आपलं घर कोणी उध्वस्त केलं, ...तर तुम्हाला आवडेल का ? आपण किती दुःखी होऊ ...पक्षांचे सुद्धा आपल्यासारखच असतं.. पक्षी आणि मानव यांच्या जीवनपद्धतीत सारखेपणा असतो.
.मनुष्य हा समाजशील प्राणी आहे.त्याचप्रमाणे पक्षी सुद्धा थव्याने राहतात .मानव कुटुंबात राहतो .तसच पक्षी घरट्यामध्ये आपल्या कुटुंबासह राहतात.मानवाच्या कुटुंबात जसे माता, पिता असतात.तसेच पक्षांमध्येही नर-मादी असतात.ते आपल्या पिल्लांची काळजी घेतात .त्यांच्या अन्न निवाऱ्याची गरज पूर्ण करतात.जसं मानव नोकरीसाठी इतर देशी किंवा दुसऱ्या गावी जातो .तसेच पक्षी सुद्धा अन्नासाठी स्थलांतर करतात. पर्यावरणातील पक्षी, मानवासारखेच एक घटक आहे. त्यांचा सुद्धा निसर्गावर तेवढाच अधिकार आहे. सांग तर मग...तू हे घरट का उचलून आणलास? विद्यार्थ्याला खूप अपराध्यासारखं वाटत होतं. इतरही विद्यार्थी खिन्न मनाने ऐकत होती.
मॅडमचे बोलणे चालूच होते... त्या म्हणाल्या
तू बाभळीच्या काट्यातून हे घरटं काढून आणलंस ना ,तुला माहिती आहे का ?त्यांनी बाभळी वरच आपलं घरटं का बनवलं असेल?...
बाभळी हे पक्षांचे पसंतीचे झाड आहे .सर्व प्रकारचे लहान पक्षी विशेष करून चिमणी वर्गीय पक्षी ..या झाडावर घरटी बनवतात .याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे बाभळीला मोठे व भरपूर काटे असतात .त्यामुळे घरट्यात असलेली अंडी, उडू न शकणारी लहान पिल्ले ..यांचे साप, मांजर, घार यासारख्या प्राण्यांपासून संरक्षण होते .साप काट्यांमुळे घरट्यांपर्यंत पोहोचू शकत नाही .बाभळीच्या फांद्या लवचिक असल्यामुळे मांजर झाडावर चढू शकत नाही . रानमांजर झाडापर्यंत उंच उडी मारून सुद्धा खोप्या पर्यंत पोहोचू शकत नाही.
त्यातच एक विद्यार्थी मध्येच बोलला ...म्हणाला मॅडम...यानी पक्षी सुद्धा पकडून ठेवला आहे .. याच्या घरी पिंजऱ्यात. मॅडमला खूप वाईट वाटले.त्या अजून समजून सांगू लागल्या. अरे मुलांनो ...पक्षांना पिंजऱ्यात ठेवणं म्हणजे त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेणे .तुम्हाला जर बंद खोलीत कोंडून ठेवलं तर ..काय वाटेल ?विचार करा.. पक्षांना मुक्त जगू द्या .जीवनाचा आनंद घेऊ द्या. पक्ष्यांचे सुद्धा सुंदर जग असत. . ते मानवी मनाला आनंद मिळवून देत .. पक्ष्यांचा चिव चिवट किती मधुर असतो. त्यांचे रंगबिरंगी पंख किती सुंदर ,मनमोहक असतात.
परंतु जर त्यांना कोंडून ठेवलं तर ,उबग येत असेल त्यांना पिंजऱ्यातील जीवनाचा ! तुमची करमणूक होते, पण त्यांना किती यातना होतात .याचा कोणीही विचार केला का कधी? त्याला त्याच्या आईची खूप आठवण येत असेल. तिची भेट या जन्मी होईल की नाही ?हे विचार त्याला जगू देत नसतील. तुम्ही अतिशय क्रुर आणि निर्दयी आहात. त्यांचा जीव म्हणजे तुम्हाला खेळणे वाटतो की काय? असं सतत मॅडम विद्यार्थ्यांना दम भरत होत्या. तुम्ही पक्षांची काळजी घ्यायला हवी..त्यांच्यासाठी घराच्या छतावर ,झाडावर..दाणे, पाणी ठेवायला हवं.. त्यांच्याशी मैत्री करायला हवी. ते दररोज तिथे येतील..
मॅडम आणि विद्यार्थ्यांचे हे संवाद वर्गाच्या खिडकीवर बसलेला एक पक्षी बघत होता आणि मनोमन असं समजत होता की आपलही कुणीतरी आहे या जगात . आपली किंमत मानवाला समजून सांगणार ..शिक्षक म्हणजे पिढी घडवणारे, निसर्गाशी मैत्री करण्याचे मूल्य रुजवणारे. जीवो जीवस्य जीवनम् . हे सर्व संवाद ऐकून पक्षी मनोमन आनंदित झाला आणि भुरकन उडून गेला.
@Save nature...@Save birds...
Save environment🌿🍃save ourselves
Protect plants🌱🌱 Protect Life of 🌐earth
@Surekha Makode...
Rangoli.. Com
Comments
Post a Comment