माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी मायक्रो केमिस्ट्री प्रॅक्टिकल किट तयार करणे.
## नवोपक्रमाचे शीर्षक -माध्यमिक स्तरासाठी मायक्रो केमिस्ट्री प्रॅक्टिकल किट तयार करणे. ## नवोपक्रमाची गरज व महत्त्व-## विद्यार्थ्यांना रासायनिक संकल्पना एक्सप्लोर करण्यास, पदार्थातील बदल पाहण्यास आणि व्यावसायिक, वैज्ञानिक वातावरणात, वैज्ञानिक कौशल्ये प्राप्त करण्यास शालेय जीवनात प्रॅक्टिकल घेतली जातात. विज्ञानातील रसायनशास्त्र विषयाचे प्रयोग प्रात्यक्षिक आवश्यक असतात. रासायनिक तंत्रज्ञान आरोग्य, साहित्य आणि उर्जेच्या वापरातील समस्यांवर नवीन उपाय प्रदान करून आपल्या जीवनाची गुणवत्ता अनेक प्रकारे समृद्ध करण्यास मदत करतात. सैद्धांतिक कार्य अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी . विशिष्ट विषयात रस वाढवण्यासाठी. बदल आणि नवकल्पना करण्यात मदत करतात. वर्ग नऊ किंवा दहा मध्ये जी प्रॅक्टिकल घेतली जातात .त्यामध्ये रसायन ग्रॅम मध्ये वापरले जातात .प्रयोगासाठी काचेचे टेस्ट ट्यूब ,बिकर वापरली जातात त्यामुळे एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या देशांमध्ये एवढी रसायन ,उपकरण , जिकरीचे काम आहे.म्हणून हीच रसायने जर स्मॉल क्वांटिटी म्हणजेच मायक्रो लेव्हल वर वापरली गेली तर दहा विद्यार्थ्यांना ल...