नवरंग साड्यांचे
नवरात्रीचे नऊ रंग म्हणजे जणू रंगांचा उत्सव. केवढे कौतुक नऊ दिवसाच्या नऊ रंगाच्या साड्या घालण्याचे.जणू रंगांची उधळण की रंगांचा सोहळा .नऊ दिवस आदिमाया शक्ती ची उपासना. एकच रंगाच्या साड्या घातलेल्या सर्व स्त्रिया एकत्र जमल्या की माळ तयार झाल्याची दिसते .. नऊ दिवसाच्या नऊ माळा .सर्व वातावरण जणू प्रफुल्लित चैतन्यमय बनत. मनामनात जणू आनंदीआनंद दिसतो . सुंदर सुंदर साड्या म्हणजे डोळ्यांच eye tonic च साडी म्हणजे स्त्री वर्गाचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय .भारतीय स्त्रियांचं मुख्य आवडतं वस्त्र . साडी घ्यायची म्हटलं की मनात आनंदाचे काजवे चमकतात .जणूकाही मनात रंगीबेरंगी फुलपाखरं बागडतात .कपाटातल्या साड्या अंगावर पडतात . तरी ती नेहमी म्हणते ,मला साड्याच नाहीत .एक छान वाली साडी घ्यायची आहे.पण खरंच कोणतीही स्त्री साडी मध्ये खूप सुंदर गोड ,गोजिरी दिसते.तिच सौंदर्य अधिकच खुलून दिसत. साडी तीच पण विविध भागात विविध पद्धतीने घातली जाते. साडी परिधान करण्याच्या पद्धती सुद्धा काळानुसार बदलत गेल्या .कमरेला गुंडाळल्या वर उरलेल्या आकर्षक तुकड्याला पदर म्हणतात .आधी...