Posts

माशांची शिकार की माणसाचा बळी..

Image
माशांची शिकार की माणसाचा बळी? सातपुड्याच्या कुशीतील डोळे उघडणारी एक सत्य घटना... जनगणनेचे काम सुरू होणार होते. मला वाटले होते की, नेहमीप्रमाणे माझ्या परिचयाचे, शाळेचे गावच मला जनगणनेसाठी मिळेल. पण जेव्हा यादी हातात आली, तेव्हा माझ्या गावापासून तब्बल 35 किलोमीटर दूर सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले एक दुर्गम आदिवासी गाव मला मिळाले होते. इतक्या लांब आणि अनोळखी भागात काम कसे करायचे, या भीतीने मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विचारणा केली. तेव्हा ते हसून म्हणाले, "मॅडम, एकदा  नवीन ठिकाणी जाऊन नवीन अनुभव घेऊन तर या!"काही अडलं तर आम्ही आहोत सहकार्याला..अधिकाऱ्यांच्या त्या शब्दांनी मला धीर दिला आणि मी शासकीय कर्तव्याचा भाग म्हणून उत्साहाने त्या आदिवासी भागात प्रवेश केला. तो माझा जनगणनेचा पहिलाच दिवस होता. गावाला लागूनच असलेला एक संथ, सुंदर तलाव आणि निसर्गाचे ते रूप मनाला भुरळ घालणारे होते. पण त्याच दिवशी माझ्या डोळ्यांसमोर अशी एक भयंकर आणि हृदयद्रावक घटना घडली, ज्याने मला अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या त्या 'अनुभवाचा' एक अतिशय वेदनादायी आणि कधीही न विसरता येणारा चेहरा दाख...

आई

आई म्हणजे साथ प्रेमाची  आई म्हणजे आशा मनाची  आई म्हणजे आदर गुरुचा  आई म्हणजे भास ईश्वराचा  आई म्हणजे मौल्यवान भेट  आई म्हणजे आभास विश्वाचा  आई म्हणजे आसमंत स्वातंत्र्याचा  आई म्हणजे आकारसृष्टीचा  आई म्हणजे आधार मायेचा  आई म्हणजे नाद भक्तीचा  आई म्हणजे हक्काची हाक  आई म्हणजे आनंदाची पहाट आई म्हणजे नात्यांची विन  आई म्हणजे विश्वासाची साथ आई म्हणजे प्रेरणा स्वप्नांची आई म्हणजे जिवलग सखी आई म्हणजे जीवन सुखी

लाडक्या गणपती बाप्पाला पत्र

Image
लाडक्या गणपती बाप्पाला यशचा साष्टांग नमस्कार .पत्र लिहिण्याचे प्रयोजन असे की कालच वर्गात मॅडम‌नी गणपती उत्सवाबद्दल  अर्थात तुझ्या येण्याबद्दल आनंद व्यक्त केला.  तसेच तुझ्या विसर्जनाने पर्यावरणावर होणारे अनिष्ट परिणाम देखील सांगितले . जे मला खूप चिंताजनक वाटले . हे सर्व तुला पत्राने कळवावेसे वाटले. म्हणून पत्र लिहीत आहे. बाप्पा तुला ठाऊक आहे ? तुला घरी आणण्यापूर्वी  कोणती तयारी होते? तुझ्यासाठी छताची छान सजावट केली जाते, त्यासाठी अभियंत्याप्रमाणे विविध सृजनशील कल्पना आमच्या डोक्यात येतात.  आई तुझ्यासाठी नैवेद्य म्हणून मोदक व लाडू बनवते , पूजा साहित्याची जमवाजमवा करते. घर स्वच्छ करून आंब्याच्या पानांनी दाराला तोरण बांधणे यांसारखी तयारी होते. सार्वजनिक मंडळाची सुद्धा याच प्रमाणे तयारी होते. तु येणार म्हणून बाआरपेठेत तुझ्या मुर्तीची  दुकान सजतात.  मूर्तिकार भव्यदिव्य प्लास्टर ऑफ परिसच्या सुंदर मुर्त्या तयार करतात.भक्तगण फक्त तुझ्या आगमणाचीच प्रतिक्षा करत असतात. बाजारात  हार, तुरे, लाईटरींगच्या आरास मांडल्या जातात. लड्डू पेढ्याची दुकान सञ्च  झाली अ...

आर्यभट्ट गगनयान पुरातन ज्ञान ते अनंत कक्षा

Image
राष्ट्रीय अंतरिक्ष दिनाच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा ...23 ऑगस्ट हा दिवस आपण राष्ट्रीय अंतरिक्ष दिन म्हणून का साजरा करतो तर . २३ ऑगस्ट २०२३ रोजी चंद्रयान-३ मोहिमेतील विक्रम लँडरचे यशस्वी सॉफ्ट लँडिंग आणि प्रज्ञान रोव्हर चंद्रावर तैनात केल्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. २०२३ मध्ये याच दिवशी, चांद्रयान-३ मोहिमेने चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडरचे सुरक्षित आणि सॉफ्ट लैंडिंग केले. राष्ट्रीय अंतराळ दिन पहिल्या राष्ट्रीय अंतराळ दिनाचा लोगो, वक्र चंद्रावर शैलीकृत विक्रम लँडर दर्शवित आहे, पार्श्वभूमीत भारतीय तिरंगा आहे.शास्त्रज्ञाच्या कार्याचा गौरव म्हणून हा दिन साजरा करण्याचे भारत सरकारने ठरवले. तसेच अंतराळा संबंधी माहिती तळागाळातील विद्यार्थ्यापर्यत पोहोचावी हाच त्यामागचा उद्देश .भविष्यात नविन संशोधक तयार व्हावे ,याकरिता वेगवेगळ्या स्पर्धाचे आयोजन केले. जेणेकरुन विद्यार्थी त्या विषयाचा अधिका अधिक अभ्यास करतील. अंतराळाविषयी जिज्ञासा ,गोडी निर्माण होईल. स्पर्धेचा विषय दिला आहे ,आर्यभट्ट ते गगनयान  पुरातन ज्ञान ते अनंत शक्यता. आर्यभट्ट म्हणजे भारतीय उ...

Aai

             आई   जीवन जगण्यासाठी तू प्रेरणा आहेस  दीपस्तंभ प्रमाणे अटळ आधार आहेस                 अजूनही तुझ सौंदर्य असं दिसतं खुलून  जसा पौर्णिमेचा चंद्र प्रकाश देतो झोकुन  मधुर तुझ्या वाणीत सरस्वतीच वास करते  म्हणूनच तर सगळ्यांना आपलंसं करते     मनाला मन असे ठेवलेत जोडून        जसे हारात फुले ठेवतात ओऊन जीवनाचे सुख दुःख तू आनंदाने पेलेली  वादळ आले कितीही तरी तटस्थ राहिली खरंच तू आहेस उन्हातली सावली  सर्वांची तू आहेस  प्रेमळ माऊली आयुष्यात सदैव एकच मंत्र जपला  जय सचितानंदा ने आनंद मिळवला  आजच्या दिनी एकच सुंदर सुरेख सदिच्छा तुझ्या उदंड आयुष्याला भरभरून शुभेच्छा                 तुझीच सुरेखा

माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी मायक्रो केमिस्ट्री प्रॅक्टिकल किट तयार करणे.

 ## नवोपक्रमाचे शीर्षक -माध्यमिक स्तरासाठी मायक्रो केमिस्ट्री प्रॅक्टिकल किट तयार करणे. ## नवोपक्रमाची गरज व महत्त्व-## विद्यार्थ्यांना रासायनिक संकल्पना एक्सप्लोर करण्यास, पदार्थातील बदल पाहण्यास आणि व्यावसायिक, वैज्ञानिक  वातावरणात, वैज्ञानिक कौशल्ये प्राप्त करण्यास शालेय जीवनात प्रॅक्टिकल घेतली जातात.  विज्ञानातील रसायनशास्त्र विषयाचे प्रयोग प्रात्यक्षिक आवश्यक असतात. रासायनिक तंत्रज्ञान आरोग्य, साहित्य आणि उर्जेच्या वापरातील समस्यांवर नवीन उपाय प्रदान करून आपल्या जीवनाची गुणवत्ता अनेक प्रकारे समृद्ध करण्यास मदत करतात. सैद्धांतिक कार्य अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी . विशिष्ट विषयात रस वाढवण्यासाठी. बदल आणि नवकल्पना करण्यात मदत करतात. वर्ग नऊ किंवा दहा मध्ये जी प्रॅक्टिकल घेतली जातात .त्यामध्ये रसायन  ग्रॅम मध्ये वापरले जातात .प्रयोगासाठी काचेचे टेस्ट ट्यूब ,बिकर वापरली जातात त्यामुळे एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या देशांमध्ये एवढी रसायन ,उपकरण , जिकरीचे काम आहे.म्हणून हीच रसायने जर स्मॉल क्वांटिटी म्हणजेच मायक्रो लेव्हल वर वापरली गेली तर दहा विद्यार्थ्यांना ल...

Drama workshop

Image
 💫💫 *नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा* 💫💫 शिक्षणाधिकारी कार्यालयाद्वारा आयोजित अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये नाट्यीकरण कौशल्याचा प्रभावी उपयोग करण्यासाठी नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अकोला आणि जे. आर. डी. टाटा स्कूल &  लॅब, खडकी, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.    दि ७ ऑक्टोबर २०२३ला सकाळी १०ते ०२ वेळेत संपन्न झालेल्या या नाट्यप्रशिक्षणाला जिल्ह्यातील अनेक शिक्षकांची भरगच्च उपस्थिती होती. यावेळी विविध जिल्ह्यामध्ये कार्याचा ठसा उमटवणा-या व सतत नवनवीन आव्हाणात्मक नाविण्यपूर्ण प्रयोग राबविणा-या अकोला जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य)आदरणीय डॉ सुचिता पाटेकर मॅडम स्वत: उपस्थित होत्या.त्यांनी यवतमाळ,परभणी जिल्ह्यात बालनाट्य प्रयोगाविषयी केलेल्या भरीव कामाविषयी प्रशिक्षणार्थ्यांना विस्तृत माहिती दिली व कार्यशाळेविषयीची अपेक्षा, उद्दिष्टे विषद केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश कवडे सर यांनी केले.  भाषा व वाचिक अभिनयात प्रा. मधु जाधव यांनी नाटकाची व्याख्या सांगताना कथा, घटना, प्...