लाडक्या गणपती बाप्पाला पत्र


लाडक्या गणपती बाप्पाला यशचा साष्टांग नमस्कार .पत्र लिहिण्याचे प्रयोजन असे की कालच वर्गात मॅडम‌नी गणपती उत्सवाबद्दल  अर्थात तुझ्या येण्याबद्दल आनंद व्यक्त केला.  तसेच तुझ्या विसर्जनाने पर्यावरणावर होणारे अनिष्ट परिणाम देखील सांगितले . जे मला खूप चिंताजनक वाटले . हे सर्व तुला पत्राने कळवावेसे वाटले. म्हणून पत्र लिहीत आहे.
बाप्पा तुला ठाऊक आहे ? तुला घरी आणण्यापूर्वी  कोणती तयारी होते? तुझ्यासाठी छताची छान सजावट केली जाते, त्यासाठी अभियंत्याप्रमाणे विविध सृजनशील कल्पना आमच्या डोक्यात येतात.  आई तुझ्यासाठी नैवेद्य म्हणून मोदक व लाडू बनवते , पूजा साहित्याची जमवाजमवा करते. घर स्वच्छ करून आंब्याच्या पानांनी दाराला तोरण बांधणे यांसारखी तयारी होते. सार्वजनिक मंडळाची सुद्धा याच प्रमाणे तयारी होते.

तु येणार म्हणून बाआरपेठेत तुझ्या मुर्तीची  दुकान सजतात.  मूर्तिकार भव्यदिव्य प्लास्टर ऑफ परिसच्या सुंदर मुर्त्या तयार करतात.भक्तगण फक्त तुझ्या आगमणाचीच प्रतिक्षा करत असतात. बाजारात  हार, तुरे, लाईटरींगच्या आरास मांडल्या जातात. लड्डू पेढ्याची दुकान सञ्च  झाली असतात.एकदरित मोठी आर्थिक उलाढाल गणपती उत्सवा दरम्यान होते. सगळीकडे जणू आनंदाची भाव लहस्च उठते.

आम्हाला माहित आहे ,तुला दूर्वा खूप प्रिय आहे . श्रीगणेशाला २१ दुर्वा वाहणं ही एक अत्यंत प्रसिद्ध आणि प्रभावशाली उपासना आहे. हे फक्त एक पारंपरिक कर्मकांड नसून, यामागे गहन आध्यात्मिक अर्थ, सूक्ष्मदेह शुद्धीकरण, आणि मनशुद्धीचा एक वैज्ञानिक मार्ग आहे. 
दुर्वा म्हणजे काय?
'दुर्वा' या शब्दाचा अर्थच आहे
"दुःखं व्रजति इति दुर्वा" - जे दुःख दूर करते ती दुर्वा.
ती तृण असूनही अनंत शक्तीची वाहक आहे. ती ज्या प्रकारे कितीही कापली तरी पुन्हा पुन्हा उगम पावते, ती अनंतचेतनेचं प्रतिक आहे - पुनर्जन्म, पुनरुत्थान, व अजेयता दर्शवते.तिला औषधी गुणधर्म सुद्धा आहे  .तसेच पिकाला स्पर्धा करणारी हराळ त्या माध्यमातून कमी होण्यास मदत होते. पण आता तन नाशक सुद्धा फवारली जातात.
उंदीर तुझ वाहन आहे. म्हणजेच उपद्रवी जीवांनासुध्दा कामाला लावावं.कुणालाही कमी समजू नये.हा अनमोल संदेश तू दिला. 
तुला मोदक  खूप आवडतात . मोदक हे केवळ एक गोड पदार्थ नसून, ते गणेशाच्या भक्तीचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे, जे गणेशोत्सवाचा अविभाज्य भाग आहे.आम्हाला पण खूप आवडतात .
गणपतीच्या पूजेतील सर्वात महत्त्वाची आरती म्हणजे 'सुखकर्ता दुःखहर्ता'. गणपतीच्या आगमनानंतर आणि उत्सवाच्या काळात ही आरती मोठ्या भक्तीभावाने म्हटली जाते, जी देवाचे स्वागत करते आणि त्याच्या कृपेची याच
ही आरती(सुख) देणारी आणि दुःखे दूर करणारी , तिला भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी गायली जाते. 
कोणत्याही विधी किंवा समारंभाच्या सुरुवातीला त्याची पूजा केली जाते. 
ही आरती म्हटल्याने गणपती प्रसन्न होतो आणि भक्तांच्या सर्व अडचणी दूर करतो . आरती नंतर गणपती बाप्पा मोरया असा जयघोष होतो.
गणपती बाप्पा मोरया' म्हणजे 'पुढे या, हे गणपती बाप्पा' असा भाव असतो, ज्यामध्ये भक्त गणपतीला आपल्या जीवनात नेतृत्व करण्यासाठी आवाहन करतात. 'तुझी आराधना केल्याने सुख, समृद्धी येते.तु बुद्धीचा देवता आहेस. मॅडम  ने आम्हाला दररोज गणपती स्त्रोत  म्हणायला सुद्धा सांगितलं आहे. त्या सांगत होत्या गणपतीला चौसष्ट कला आणि 14 विद्या अवगत होत्या  आणि या कला जीवनातील विविध पैलूंशी संबंधित आहेत, ज्यात आत्मज्ञान, धनुर्विद्या, लेखन, गणित, वैद्यक, ज्योतिष, गायन, नृत्य आणि अनेक कौशल्ये समाविष्ट आहेत. या कलांद्वारे दैनंदिन गरजा पूर्ण करता येतात आणि सात्त्विक जीवनाकडे वाटचाल करता येते.
तुझ्या उत्सवा दरम्यान  घरात  भावभक्तीच आनंदी वातावरण असते. जेव्हा तुझ्या जाण्याची वेळ येते तेव्हा मात्र मन भरून येते, वाटते तू जाऊच नये. 
 तुला माहित आहे बाप्पा ,गणपती मिरवणुकी दरम्यान होणारे ध्वनी प्रदूषण. 
अरे ...ते तर तू विचारूच नको .डीजेच्या मोठ्या आवाजामुळे श्रवणशक्तीवर परिणाम होऊ शकतो, तसेच छातीत धडधडणे, हृदयविकाराचा त्रास, चिडचिड, डोकेदुखी आणि उच्च रक्तदाब यांसारखे शारीरिक आणि मानसिक त्रास होऊ शकतात. विशेषतः गरोदर स्त्रिया, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आवाज धोकादायक ठरू शकतो.
, कारण त्यांची श्रवणशक्ती संवेदनशील असते. 
 डीजेच्या आवाजामुळे आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतात आणि या आवाजाला आवर घालणे आवश्यक आहे,  
 आणखी तुला ठाऊक आहे का बाप्पा? 
- मुर्तीकार मूर्ती बनवीण्यासाठी प्रचंड प्लास्टर ऑफ पॅरिस ,घातक चमकी, रंग लावण्याची जणू स्पर्धा करतात.त्यामुळे जलीय जीवांना धोका निर्माण होतो.  (पीओपी) गणेश मूर्तीचे मुख्य दुष्परिणाम म्हणजे पर्यावरणाचे नुकसान, विशेषतः जलस्रोतांचे प्रदूषण, कारण पीओपी पाण्यात विरघळत नाही आणि जलचर सजीवांवर हानिकारक परिणाम करते. मॅडम सांगत होत्या, पीओपीमध्ये सल्फर, फॉस्फरस आणि मॅग्नेशियमसारखे रासायनिक घटक असतात, जे पाण्यात मिसळल्यास पाणी विषारी होते. त्यामुळे जलस्रोतांचे प्रदूषण होते आणि ते आरोग्यासाठीही घातक ठरते. 
शिवाय पाण्यातील रंग, चमकी माश्यांच्या पोटात - जाते.,मानव  तेच मासे अगदी आनंदाने  खातो. प्रदूषित पाण्यामुळे मासे आणि मानव याचे आरोग्य बिघडते.  जैविक विषसंचय होते .
तुझ्या विसर्जनानंतर समुद्रकिनारी, नदीकिनारी याची डोळा याची देही होण्याऱ्या तुझ्या मूर्तीचे हाल बघवल्या जात नाहीत देवा  .POP ची सुंदर मुर्ती घेण्याचा मोह आवरत नाही, सगळ्यांना तीच आवडते. मी मॅडमला विचारले की  सार्वजनिक मंडळ एवढ्या मोठमोठ्या POP च्या मूर्ती का बसवतात. जेवढी जास्त मोठी मूर्ती तेवढा गणपती बाप्पा आशीर्वाद जास्त देतात का?मॅडम म्हणाल्या  नाही रे ...ते फक्त आपले क्षमता प्रदर्शन करतात, एवढेच. बाप्पा  तर सर्वांवर समान दृष्टी ठेवतो. तो अनंत आहे.तोच निर्मिती .तोच अंत आहे.  करता करविता तोच आहे .मंगलमूर्ती मोरया.🙏
 जाऊदे बाप्पा पण तूच काहीतरी जादूची कांडी  फिरव , गणपती बाप्पा  वाहतो तुला दुर्वा हराय तूच सुचव पर्यावरण  संरक्षणाचे  उपाय. तरी सुचवतो तुला ,एक झाड एक गणपती असं कर. pop  च्या मूर्ती बंदच कर.
 मॅडम सांगत होत्या गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव म्हणजे गणेश मूर्ती विसर्जित करण्यासाठी सरकारने किंवा पालिकांनी तयार केलेले खास जलस्रोत आहेत, जे नैसर्गिक तलाव किंवा नद्यांमध्ये प्रदूषण होऊ नये म्हणून बनवले जातात. हायकोर्टाच्या आदेशानुसार, पीओपी (प्लॅस्टर ऑफ पॅरिस) च्या मूर्ती, विशेषतः ६ फुटांपेक्षा मोठ्या मूर्ती कृत्रिम तलावांमध्येच विसर्जित करणे बंधनकारक आहे. हे दुःखहर्ता गणराया पर्यावरण रक्षणाची मानवाला सद्बुद्धी दे. मूर्ती फक्त मातीचीच असावी, त्यात बीज असावी जेणेकरून विसर्जनानंतर त्यातून झाड तयार होईल .वने समृद्ध होतील. हीच तुझ्याकडे विनंती करतो .  असो गणेश उत्सव आनंदाचा, समतोल राखून पर्यावरणाचा,,, 
                                            तुझाच गणेश भक्त
                                                यश  



Comments

Popular posts from this blog

माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी मायक्रो केमिस्ट्री प्रॅक्टिकल किट तयार करणे.

Hyderabad Science Study Tour Report