आर्यभट्ट गगनयान पुरातन ज्ञान ते अनंत कक्षा

राष्ट्रीय अंतरिक्ष दिनाच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा ...23 ऑगस्ट हा दिवस आपण राष्ट्रीय अंतरिक्ष दिन म्हणून का साजरा करतो तर . २३ ऑगस्ट २०२३ रोजी चंद्रयान-३ मोहिमेतील विक्रम लँडरचे यशस्वी सॉफ्ट लँडिंग आणि प्रज्ञान रोव्हर चंद्रावर तैनात केल्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. २०२३ मध्ये याच दिवशी, चांद्रयान-३ मोहिमेने चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडरचे सुरक्षित आणि सॉफ्ट लैंडिंग केले.

राष्ट्रीय अंतराळ दिन पहिल्या राष्ट्रीय अंतराळ दिनाचा लोगो, वक्र चंद्रावर शैलीकृत विक्रम लँडर दर्शवित आहे, पार्श्वभूमीत भारतीय तिरंगा आहे.शास्त्रज्ञाच्या कार्याचा गौरव म्हणून हा दिन साजरा करण्याचे भारत सरकारने ठरवले. तसेच अंतराळा संबंधी माहिती तळागाळातील विद्यार्थ्यापर्यत पोहोचावी हाच त्यामागचा उद्देश .भविष्यात नविन संशोधक तयार व्हावे ,याकरिता वेगवेगळ्या स्पर्धाचे आयोजन केले. जेणेकरुन विद्यार्थी त्या विषयाचा अधिका अधिक अभ्यास करतील. अंतराळाविषयी जिज्ञासा ,गोडी निर्माण होईल. स्पर्धेचा विषय दिला आहे ,आर्यभट्ट ते गगनयान  पुरातन ज्ञान ते अनंत शक्यता.
आर्यभट्ट म्हणजे भारतीय उपग्रहाचे अवकाशातील पहिले यशस्वी पाऊल .ISRO ने 1975 साली त्यांच्या अथक परिश्रमातून उपग्रह प्रक्षेपण केले.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ही जगातील पाचवी सर्वात मोठी अंतराळ संस्था आहे. ISRO ची स्थापना १५ ऑगस्ट १९६९ रोजी झाली. त्याची स्थापना विक्रम साराभाई यांनी केली.इस्रोचे मुख्यालय हे अंतरिक्ष भवन, बंगलोर, येथे आहे. तसेच सतीश धवन अंतरिक्ष केंद्र श्रीहरीकोटा येथे आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या नेतृत्वाखाली 45 हून अधिक अंतराळ संशोधन केंद्रांचे एक मजबूत नेटवर्क भारतात आहे.भारतीय राष्ट्रीय उपग्रह (इंग्लिश लघुरुप: इन्सॅट) हा इस्त्रो या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा बहुउद्देशीय भूस्थिर कक्षा उपग्रहशृंखला कार्यक्रम आहे. या उपग्रहांचा वापर दळणवळण, उपग्रह प्रसारण, हवामानशास्त्र, शोध व इतर कार्यांकरिता केला जातो.
भारताच्या पहिल्या उपग्रह आर्यभट्टला आज ५० वर्षे पूर्ण झाली . १९७५ मध्ये आजच्याच दिवशी प्रक्षेपित करण्यात आलेल्या या उपग्रहाचे नाव प्राचीन भारतीय गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांच्या नावावरून ठेवण्यात आले. हे नाव भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सुचवले होते. आर्यभट्ट या पथकाचे नेतृत्व अवकाश शास्त्रज्ञ डॉ. उडुपी रामचंद्र राव यांनी केले होते.या उपग्रहाचे प्रक्षेपण रशियातून केले. कारण आपल्याकडे पतंग होती पण दोरा नव्हता अशी परिस्थिती होती . भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने बांधलेला हा उपग्रह यूएसएसआरच्या मदतीने कपुस्टिन यार येथून प्रक्षेपित करण्यात आला..हा उपग्रह अवकाशात पाच दिवसच कार्यरत होता . 
.भारताच्या काही उपग्रहांमध्ये आर्यभट, इन्सॅट (INSAT) मालिका, जीसॅट (GSAT) मालिका, रोहिणी आणि कल्पना-१ यांचा समावेश आहे. 
भारतीय उपग्रहांमध्ये खालील उपग्रहांचा समावेश आहे:
*इन्सॅट (INSAT) मालिका:
ही भारतीय राष्ट्रीय उपग्रह प्रणाली आहे, ज्यामध्ये विविध उपग्रह संप्रेषण, हवामान आणि इतर कार्यांसाठी वापरले जातात. 
*जीसॅट (GSAT) मालिका:
ही भारतीय उपग्रह प्रणाली दळणवळण आणि इतर कार्यांसाठी वापरले जातात. 
*रोहिणी (Rohini) मालिका:
ही भारतीय उपग्रहांची मालिका पृथ्वी निरीक्षण आणि इतर कार्यांसाठी वापरली जाते. 
*कल्पना-१ (Kalpana-1):
हे हवामान निरीक्षणासाठी असलेले उपग्रह आहे. 
*भास्कर (Bhaskara) I आणि II:
हे कमी-कक्षेतील पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहेत. 
याव्यतिरिक्त, भारताने अनेक उपग्रह इस्रोद्वारे (ISRO) प्रक्षेपित केले आहेत, ज्यामध्ये रिमोट सेन्सिंग, दळणवळण, आणि वैज्ञानिक संशोधनासाठी उपग्रह आहेत.

**मंगळयान-- हा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) मंगळावर पाठवलेला पहिला उपग्रह आहे. याला अधिकृतपणे मार्स ऑर्बिटर मिशन (MOM) असेही म्हणतात आणि हे मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागाचा व वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी पाठवले होते. हे यान ५ नोव्हेंबर २०१३ रोजी प्रक्षेपित केले गेले आणि २४ सप्टेंबर २०१४ रोजी मंगळाच्या कक्षेत यशस्वीरित्या फिरू लागले.

* चंद्रयान --भारताच्या चांद्रयान मोहिमांमध्ये चांद्रयान-१, चांद्रयान-२ आणि चांद्रयान-३ या तीन प्रमुख मोहिमांचा समावेश आहे, ज्या चंद्राचा अभ्यास करण्यासाठी पाठवण्यात आल्या आहेत. चांद्रयान-१ने चंद्राचे मॅपिंग केले, तर चांद्रयान-२मध्ये लँडर आणि रोव्हर होते, पण ते पूर्णपणे यशस्वी झाले नाही. चांद्रयान-३ने चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे सॉफ्ट लँडिंग केले आणि चंद्रावरील घटकांचा अभ्यास केला.

*आदित्य-L1   हे सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)  ने प्रक्षेपित केलेले पहिले भारतीय सौर मोहीम बिंदूजवळ कक्षेत स्थापित केले गेले आहे, जे पृथ्वीपासून सुमारे 1.5 दशलक्ष किमी अंतरावर आहे. 
आदित्य-L1 चे मुख्य उद्दिष्ट्ये:
1) सौर वातावरणाचा ,सौर वाऱ्याचा अभ्यास करेल. 
2) सौर ज्वाला आणि चुंबकीय वादळांचा  आणि त्यांचे पृथ्वीवरील वातावरणावर होणारे परिणाम यांचा अभ्यास करेल. 
3) सूर्याच्या भौतिक प्रक्रिया आणि सौर ऊर्जेच्या प्रवाहांवर संशोधन करेल. :
4) अवकाशातील हवामान आणि त्याचा पृथ्वीवरील
 प्रणालींवर होणारा परिणाम समजून घेणे.

** ...गगनयान, --भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) [ISRO] च्या नेतृत्वाखालील एक महत्वाकांक्षी मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचा उद्देश, तीन अंतराळवीरांना घेऊन जाणारे एक यान पृथ्वीच्या कक्षेत पाठवणे आणि त्यांना सुरक्षितपणे परत आणणे आहे. 
*गगनयान  उद्देश-
गगनयान भारताची मानवी अंतराळ उड्डाण क्षमता दर्शवण्यासाठी आहे. 
मिशन:  या मोहिमेत, तीन अंतराळवीरांना ७ दिवसांसाठी पृथ्वीच्या ४०० किमी उंचीवरील कक्षेत पाठवले जाईल. 
तंत्रज्ञान:
गनयानसाठी, इस्रोला नवीन तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे, जसे की मानवी-रेट केलेले प्रक्षेपण वाहन, राहण्यायोग्य कक्षीय मॉड्यूल, क्रू एस्केप सिस्टम, आणि जीवन समर्थन प्रणाली. 
प्रक्षेपण:
गगनयान LVM3 रॉकेट  द्वारे प्रक्षेपित केले जाईल. 
खर्च:
गगनयान कार्यक्रमाचा अंदाजित खर्च सुमारे 9,023 कोटी रुपये आहे. 
अंतराळवीर:
गगनयान मोहिमेसाठी भारतीय हवाई दलातील चार वैमानिकांची निवड करण्यात आली आहे. 
महत्व:
गगनयान भारताला अमेरिका, रशिया आणि चीननंतर मानवी अंतराळ उड्डाण करण्याची क्षमता असलेला चौथा देश बनवेल. भारत  जगात ध्रुवावर पोचणारा पहिला देश आहे.भारत भविष्यात BAS म्हणजेच भारतीय अंतरिक्ष स्टेशनची तयारी करत आहे.
  आर्यभट्ट ते गगनयान चा प्रवास निश्चितच खूप समृद्ध व प्रगतिशील आहे. आर्यभट्ट ते गगनयान आहे भारताची शान.
विश्वगुरू भारत गौरवशाली भारत. भारत भविष्यात BAS  म्हणजेच भारतीय अंतरिक्ष स्टेशनची तयारी करत आहे.

Comments

Popular posts from this blog

लाडक्या गणपती बाप्पाला पत्र

माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी मायक्रो केमिस्ट्री प्रॅक्टिकल किट तयार करणे.