Posts

Showing posts from October, 2023

Drama workshop

Image
 💫💫 *नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा* 💫💫 शिक्षणाधिकारी कार्यालयाद्वारा आयोजित अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये नाट्यीकरण कौशल्याचा प्रभावी उपयोग करण्यासाठी नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अकोला आणि जे. आर. डी. टाटा स्कूल &  लॅब, खडकी, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.    दि ७ ऑक्टोबर २०२३ला सकाळी १०ते ०२ वेळेत संपन्न झालेल्या या नाट्यप्रशिक्षणाला जिल्ह्यातील अनेक शिक्षकांची भरगच्च उपस्थिती होती. यावेळी विविध जिल्ह्यामध्ये कार्याचा ठसा उमटवणा-या व सतत नवनवीन आव्हाणात्मक नाविण्यपूर्ण प्रयोग राबविणा-या अकोला जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य)आदरणीय डॉ सुचिता पाटेकर मॅडम स्वत: उपस्थित होत्या.त्यांनी यवतमाळ,परभणी जिल्ह्यात बालनाट्य प्रयोगाविषयी केलेल्या भरीव कामाविषयी प्रशिक्षणार्थ्यांना विस्तृत माहिती दिली व कार्यशाळेविषयीची अपेक्षा, उद्दिष्टे विषद केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश कवडे सर यांनी केले.  भाषा व वाचिक अभिनयात प्रा. मधु जाधव यांनी नाटकाची व्याख्या सांगताना कथा, घटना, प्...