Posts

कोरोनामुळे बदललेले जगण्याचे रंग

Image
    Corona मुळे सौंदर्य वस्तू गुपचूप बसल्या  जणू काही मनातल्या मनातच रुसल्या ...  💅💄🌼 बाहेर मिरवल्या जाणाऱ्या सुंदर सुंदर साड्या  आता मात्र  गुदमारतात त्यांच्या घड्या वर घड्या..  🥻🥻 छान छान ड्रेस आणि ओढण्या दुरूनच खुणावतात  बाहेर कधी जायचं म्हणून मिश्कीलपणे विचारतात..  👗🧥🦺 नेहमीच्या नेलपेंट आणि फाउंडेशन च्या बाटल्या  वाट बघून जागीच कोरड्या होऊन आटल्या..  💅  गळ्यातल्याचाही असायचा वेगळाच थाट मस्त म्हणून ऐकण्याची तेही बघतायेत वाट..   बॉक्स मधील बांगड्या ही बसल्यात ताठ कुणाचीच हाताशी नाही कधी भेट  गाठ..  जिच्यामुळे खुलते चेहऱ्याची रंगत लय भारी  ती ही  शांत बसली ड्रावरच्या कोपऱ्यात विचारी..  💄💄💄   परफ्यूमचा चालायचा मंद धुंद सुगंध   तोही आता झाला बाटली तच बंद..   चपला सॅंडल ची चालते नेहमी कुजबुज  स्लीपरच आहे बाई मालकिणीशी हितगुज ..  👠🥿👡 कपाटातल्या पर्स  सुद्धा बसल्या हिरमुसून  त्यांनासुद्धा वाटतं कुठेतरी यावं हिंडून फिरून .....

जागतिक पुस्तक दिन

Image
सुंदर जगण्यासाठी सुंदर विचारांची गरज असते .सुंदर विचार हे पुस्तकच प्रदान करीत असतात.मानवाला सर्व प्रकारचे ज्ञान हे पुस्तकातून मिळते. शरीराला जशी पोषक अन्नाची गरज असते तसेच बुद्धीला समृद्ध विचारांची गरज असते.  जागतिक पुस्तक दिन 23 एप्रिल रोजी साजरा करतात.विल्यम शेक्सपियर यांचा याच दिवशी मृत्यू झाला होता.त्यांना श्रद्धांजली म्हणून हा दिन घोषित करण्यात आला. लोकांमध्ये वाचनाची सवय वाढावी.जगभरातील लेखकानं प्रति आदर व श्रद्धांजली अर्पण व्हावी .तसेच पुस्तकां मध्ये रस निर्माण करण्यासाठी हा दिन साजरा करण्यात येतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे , जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची  रोटी घ्या आणि एक रुपयाची पुस्तक घ्या .  रोटी तुम्हाला जगण्यास मदत करेल तर पुस्तके तुम्हाला कसे जगावे ते शिकवतील.  महात्मा ज्योतिबा फुले म्हणायचे "वाचाल तर वाचाल" जस देवघर आपण  छान छान फुलांनी सजवतो, तस पुस्तकांचे घर सुद्धा असाव आणि तेसुद्धा सुंदर अशा पुस्तकांनी समृद्ध कराव. तरच आपला व्यक्तिमत्व विकास घडवून येईल. सामाजिक आणि मानसिक विकास होईल. पुस्तके ही प्रत...

रंग मैत्रीचे

Image
जगातील सुंदर आणि श्रेष्ठ नातं म्हणजे मैत्रीच . मैत्री म्हणजे जीवनाला लाभलेला प्रेम आणि आनंदाचा निखळ झराच. मित्र रूपाने मग कोणीही असू शकते. आपण समोरच्या मनाची काळजी आपल्या मना पेक्षा जास्त घेतो म्हणजेच मैत्री.मैत्री एखाद्या  छोट्या  रोपट्या प्रमाण असते , जशी वाढवायची फुलवायची ,तशी फुलते. जीवनात मैत्रीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे .कारण अगदी बालपणापासून ते जीवनाच्या प्रत्येक सुख दुःखाच्या क्षणात आपल्याला कोणाची तरी सोबत हवी असते.बहुदा समवयस्क मध्ये मैत्री अलगद ,सहज जुळून येते. मला मैत्री करायची ,  मला मित्र-मैत्रिणी पाहिजेत,असे म्हटल्याने मैत्री होऊ शकत नाही .पण मैत्रीचे नाते कसे  व कधी जुळून येते हे कळत सुद्धा नाही. एक मात्र खरं..मैत्रीचे सुंदर रेशमी बंध जोडणे सोपे असते .परंतु ते टिकून ठेवणे तितकेच अवघड.  मैत्री ही विश्वासाच्या स्तंभावर आधारलेली असते.आणि या  स्तंभाचा चा मूळ पाया असतो, तो म्हणजे विचारांची जुळणी. जीवनाच्या वाटेवर चालत असताना बालपणापासून ते आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर पुष्कळ माणसं भेटतात .परंतु त्यामध्ये खरीखुरी मैत्री मात्र क्व...

नवरंग साड्यांचे

Image
नवरात्रीचे नऊ रंग म्हणजे जणू रंगांचा उत्सव. केवढे कौतुक नऊ दिवसाच्या नऊ रंगाच्या साड्या घालण्याचे.जणू रंगांची उधळण की रंगांचा सोहळा .नऊ दिवस आदिमाया शक्ती ची उपासना. एकच रंगाच्या साड्या घातलेल्या सर्व स्त्रिया एकत्र  जमल्या की माळ तयार झाल्याची दिसते .. नऊ दिवसाच्या नऊ माळा .सर्व वातावरण जणू प्रफुल्लित चैतन्यमय बनत. मनामनात जणू आनंदीआनंद  दिसतो . सुंदर सुंदर साड्या म्हणजे डोळ्यांच eye tonic च साडी म्हणजे स्त्री वर्गाचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय .भारतीय स्त्रियांचं मुख्य  आवडतं वस्त्र . साडी घ्यायची म्हटलं की मनात आनंदाचे काजवे चमकतात .जणूकाही मनात रंगीबेरंगी  फुलपाखरं बागडतात .कपाटातल्या साड्या अंगावर पडतात . तरी ती नेहमी म्हणते ,मला साड्याच नाहीत .एक छान वाली साडी घ्यायची आहे.पण खरंच कोणतीही स्त्री साडी मध्ये खूप सुंदर गोड ,गोजिरी दिसते.तिच सौंदर्य अधिकच खुलून दिसत. साडी तीच  पण विविध भागात विविध पद्धतीने घातली जाते. साडी परिधान करण्याच्या पद्धती सुद्धा काळानुसार बदलत गेल्या .कमरेला गुंडाळल्या वर उरलेल्या आकर्षक तुकड्याला पदर म्हणतात .आधी...

चक्कर/ भोवळ /गरगरणे/ फेऱ्या/ प्रदक्षणा

Image
चक्कर म्हटलं की थोडस फिरल्यासारख ,फेरफटका मारल्या सारखंच  वाटत नाही का ? मूळ ठिकाणाहून निघून परत तिथेच वापस येणे म्हणजे चक्कर .चक्कर या शब्दाचे आपल्या जगण्याशी कसे वेगवेगळे रंग जुळले आहेत.? हे मी आपल्या निदर्शनास आणणार आहे .चक्कर या शब्दाचा अर्थ एकच पण.. परिणाम मात्र  वेगवेगळे .. बर का....कधी आनंद मिळून देणारे तर कधी दुःख..   फुलाभोवती फुलपाखराने किंवा भुंग्याने मारलेले  चक्कर ..एखाद्या तरुणाने तरुणीच्या मागेमागे  किंवा तिच्या घराभोवती मारलेले चक्कर. ती दिसली तर आनंद . स्त्रियांना आनंदाची बातमी देणारे चक्कर अत्यंत सुखद असतात. .एखाद्याकडे उधारीचे पैसे काढायचे असतील तर त्याच्या घराभोवती मारलेले चक्कर . .पैसे मिळाले तर आनंद नाहीतर मग मन उदास, निरुत्साही ,केविलवाणे बनते. Punishment म्हणून ग्राउंड ला मारलेले दहा चक्कर .कोर्टकचेरीचे मारलेले चक्कर सुद्धा बऱ्याच लोकांना  वाईट अनुभवाचे असतात . पाहुणे घरी आल्यानंतर  त्यांच्या गाडीचा  मारलेला एक चक्कर . किंवा कुणाच्या नवीन गाडीचा किंवा सायकलचा एक चक्कर मारल्यानंतर  जो आनंद मिळतो तो पैसे...

रंग विज्ञानाचा..Inspire Award

Image
 माझ्या बाल वैज्ञानिकांच्या जीवनातील बहुमूल्य सन्मान म्हणजे इंस्पायर अवार्ड योजने मध्ये राज्यस्तरावर निवड   .मुलांच्या जिज्ञासा ,कुतूहल आणि सृजनशिल कल्पनाशक्तीला वाव देणारी  ..राष्ट्रीय दर्जाची अत्यंत साधी ,सरळ ,सोपी  नोंदणी प्रक्रिया असणारी इन्स्पायर  अवार्ड  योजना. शोधांची दुनिया, जादुई नगरी ,सतत सत्याचा शोध ,निसर्गातील घडणाऱ्या घटनांचे निरीक्षण ,त्यातून निर्माण होणारी जिज्ञासा ...का? कुठे? कसा ?उलगडण्याचा प्रयत्न ..हा एक मानवाच्या जगण्याचा वेगळाच रंग नाही का? वैज्ञानिक वृत्ती ला  चालना देणारा जीवनाचा रंग .त्यातूनच जीवनाला सहज, सुलभ, सुकर बनवण्याचा सततचा प्रयत्न .मानवी जीवनाचे रंगच बदलून टाकणारे प्रगत विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे विश्व .हे सारे सहज शक्य झाले ते मानवाच्या सततच्या निरीक्षणातून .निसर्गाच्या घडणाऱ्या घटनांच्या शोधातून ..जसे जलचक्र , ऑक्सिजन चक्र, जीव भू रसायन चक्र ,ऋतुचक्र . सततच्या संशोधनातून निकषाप्रत पोहोचलेले व्याख्या, नियम, सूत्र ,सिद्धांत जे मानवी जीवनाला अत्यंत मोलाचे ठरले आहे.विज्ञान तर मानवी जीवनाला वरदानच....

छंद /कला /आवड/ Hobby

Image
लॉकडाउनच्या काळामध्ये मी माझ्या मुलासाठी राबवलेले छोटे-छोटे उपक्रम ... वेळेचा सदुपयोग..   जगण्याचे रंग फुलवायचे असतील तर छंद जिवंत ठेवले पाहिजे .छंदामुळे उठतात  मनात विविध तरंग म्हणूनच तर खुलतात  जगण्याचे रंग ... खर आहेे ना?  वेळेला गुंतवायचं असेल तर छंद जिवंत ठेवले पाहिजे,  कुठलीही एक ना एक तरी कला जोपासायला हवी... कलेमध्ये आपण स्वतःला हरवून ..निर्माण झालेल्या कलाकृतीत आपण सापडतो.. कलेमुळे जीवन  बहारदार  बनते ..भरपूर आनंद मिळतो🤗🤗.. कले विना जीवन म्हणजे ...सुगंध शिवाय फुल... 🌻🌺  कितीही ठरवलं तरी छंदासाठी उपलब्ध न झालेला ..  वेळ ..कोरोना मुळे सगळ्यांना उपलब्ध झालेला आहे. कोरोनामुळे सगळ्यांच्या जीवनात विविध कला..   जिवंत झाल्या असाव्यात असे मला वाटते. कोरोंना मुळे शाळा बंद झाल्या ..त्यामुळे लहान मुलांना  खरं तर घरात कोंबून ठेवल्यासारखे झालंय .पंख कापलेल्या पक्षांप्रमाणे  त्यांच्या मनाची अवस्था झाली आहे.काय करावं ? हा त्यांच्या छोट्या डोक्याला पडलेला मोठा प्रश्न ... कोरोना कधी  जाणार ? शाळा कधी उघ...