स्त्री तुझे रंग
स्त्री तुझे रंग शांत ,संयमाचा दागिना दिसतो तुला शोभून ... म्हणूनच जगण्यातला आनंद तुझा वाहतो ओसांडून... रोज नवा उत्साह जोश उरात भरत... दिवसभरात तू कधीच नाही थकत.. आनंदी जगण्याची तुझे हे सूत्र.. जगण्यातले ते लाखमोलाचे मंत्र.. नवीन शिकण्याचे रंग तुझ्या अंगी... ज्यामुळे बनवतेस जीवन सप्तरंगी... उपभोगून तंत्रज्ञानाची खास भेट नेहमीच ठेवते स्वतःला अपडेट ... फोटो काढण्याचा तुझा छंदच आगळा आनंद उत्सवाचा तो रंगच वेगळा... पाककलेत तू तर असतेच निपून.. बोलता-बोलता जाते कितीतरी टिप्स देऊन ... स्पर्धा ,प्रदर्शनी मध्ये सहभागी होऊन . .. माहितीचा खजिना येते सोबतच घेऊन... मैत्रिणींची तुझी सल्लागार समिती.. सहज मिळवते मार्गदर्शन नि माहिती.. कीटीपार्टी ची तर असते वेगळीच कमाल गप्पा-गोष्टी ,हास्यविनोदा ची नुसतीच धमाल कुटुंबावर करते वर्षाव प्रेम वात्सल्याचा .. मिळवतेस बहुमान उत्कृष्ट मातृत्वाचा.. तू गिरीजा, तू पार्वती ,तू कल्याणी... संसार रथावरची खरच तू महारानी भरजरी साडीतली...