स्त्री तुझे रंग

   स्त्री तुझे रंग

शांत ,संयमाचा दागिना दिसतो तुला शोभून ... 
म्हणूनच जगण्यातला आनंद तुझा वाहतो ओसांडून... 

रोज नवा उत्साह जोश उरात भरत...
दिवसभरात तू कधीच नाही थकत.. 

आनंदी जगण्याची तुझे हे सूत्र..
जगण्यातले ते लाखमोलाचे मंत्र.. 

नवीन शिकण्याचे रंग तुझ्या अंगी... 
 ज्यामुळे बनवतेस जीवन सप्तरंगी... 

उपभोगून तंत्रज्ञानाची खास भेट
नेहमीच ठेवते स्वतःला अपडेट ... 

फोटो काढण्याचा तुझा छंदच आगळा
 आनंद उत्सवाचा तो रंगच वेगळा... 

पाककलेत तू तर असतेच निपून..
बोलता-बोलता जाते कितीतरी टिप्स देऊन ... 

 स्पर्धा ,प्रदर्शनी मध्ये सहभागी होऊन . .. 
माहितीचा खजिना येते सोबतच घेऊन... 

 मैत्रिणींची तुझी सल्लागार समिती..
सहज मिळवते मार्गदर्शन नि माहिती..

 कीटीपार्टी ची तर असते वेगळीच कमाल 
गप्पा-गोष्टी ,हास्यविनोदा ची नुसतीच धमाल

कुटुंबावर करते वर्षाव प्रेम वात्सल्याचा ..
 मिळवतेस बहुमान उत्कृष्ट मातृत्वाचा.. 

तू गिरीजा, तू पार्वती ,तू कल्याणी... 
संसार रथावरची खरच तू महारानी

 भरजरी साडीतली  तुझी रंगतच न्यारी ...
 संसारातली जणू तूच विश्वसुंदरी.... 

आवड तुला सतत नवनिर्मितीची ... 
सदैव साथ लाभो तुला अंतर्मनाची

खरंच गर्व आहे मला मी एक स्त्री 
धन्यवाद . धन्यवाद. धन्यवाद.. 

               शब्द गुंफण
                   सुरेखा माकोडे.. अकोट

Comments

Popular posts from this blog

Hyderabad Science Study Tour Report

माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी मायक्रो केमिस्ट्री प्रॅक्टिकल किट तयार करणे.

छंद /कला /आवड/ Hobby