रंग मैत्रीचे
रंग मैत्रीचे🌷
मैत्री असावीअशी की ऊनातही सावली
सुख दुःखात तीची साथ पावलोपावली🌷
वागण असाव अल्लड ,बोलण ही गोड
उथळ पाण्याला जसा तळ खूप खोल 🌷
हास्य गमती कराव्या खळखळून
मनाची सरिता मग वाहते दुथडी भरून🌷
मैत्रीच असावं प्रत्येकाजवळ एक खातं,
मनाचे व्यवहार करायला तिथे सोप जातं🌷
मैत्री असावी जशी ऊन सावलीचा खेळ,
रुसवे-फुगवे काढण्यात नको जायला वेळ🌷
मैत्री असावी जसे जंगल घनदाट,
बाहेर निघायला नकोच कुठे वाट🌷
मैत्री म्हणजे मौज मनमयुराची,
जगण्यात जणू उधळण सप्तरंगाची🌷
खरंच मैत्री म्हणजे दुधावरची साय ,
ती भेटल्यावर मनाला हवं तरी काय🌷
शब्द गुंफण
सुरेखा माकोडे, अकोट
Comments
Post a Comment