Posts

Showing posts from September, 2025

आई

आई म्हणजे साथ प्रेमाची  आई म्हणजे आशा मनाची  आई म्हणजे आदर गुरुचा  आई म्हणजे भास ईश्वराचा  आई म्हणजे मौल्यवान भेट  आई म्हणजे आभास विश्वाचा  आई म्हणजे आसमंत स्वातंत्र्याचा  आई म्हणजे आकारसृष्टीचा  आई म्हणजे आधार मायेचा  आई म्हणजे नाद भक्तीचा  आई म्हणजे हक्काची हाक  आई म्हणजे आनंदाची पहाट आई म्हणजे नात्यांची विन  आई म्हणजे विश्वासाची साथ आई म्हणजे प्रेरणा स्वप्नांची आई म्हणजे जिवलग सखी आई म्हणजे जीवन सुखी