रंग जगण्याचे
" Friendship Everyday "
फ्रेंड्स व्हाट्सअप ग्रुपवरती होतात रोजच भेटी
अन् रंगतात गप्पागोष्टी..
नेहमीची फ्रेन्डशिप अन् नेहमीचा डे
मग का नाही ?हॅपी फ्रेंडशिप एव्हरीडे..
माझा ग्रुप म्हणजे
रंगीबेरंगी फुलांचा गुच्छ
प्रत्येकाचं मन कसं निर्मळ स्वच्छ....
विचाराने जरी वेगवेगळे सगळे
तरी मैत्रिने उधळले इथे रंग सगळे...
चॅटींग ची तरी इथे भारीच गंम
विचारांची उठते नुसतीच पंगत ...
कधी एखाद्या विषयाची एवढी खेचातान
की मूळ विषयाचे मग राहत नाही भान..
वाढदिवसाचे दिवशी तर मजाच भारी
दिवसभर घोड्यावरून उतरत नाही स्वारी.
शुभेच्छांची...इथे तर भलतीच गर्दी दाट
इतर मेसेजला मग सापडणार नाही वाट ..
नेहमीच भरते विनोदाची हास्य जत्रा
चढू न देता कुणाच्या टेन्शनची मात्रा...
ग्रुपला भेट देण्याची उत्सुकता भारी
मेसेज बघण्याची गंमतच न्यारी..
सर्वांना असावा मैत्रीचा एक कप्पा
जिथे मारता येतील मनसोक्त गप्पा...
Happy friendship to my all friends ..
👭👬👫👭👬👫
#College friends
#friends
#friendship
# रंग मैत्रीचे
#रंग जगण्याचे
Yes, happy friendship everyday 👌
ReplyDeleteThanks dear
DeleteThanks dear
DeleteNicely written 👌 Happy friendship everyday 😊
ReplyDelete