छंद /कला /आवड/ Hobby
लॉकडाउनच्या काळामध्ये मी माझ्या मुलासाठी राबवलेले छोटे-छोटे उपक्रम ... वेळेचा सदुपयोग..
जगण्याचे रंग फुलवायचे असतील तर छंद जिवंत ठेवले पाहिजे .छंदामुळे उठतात मनात विविध तरंग म्हणूनच तर खुलतात जगण्याचे रंग ... खर आहेे ना?

वेळेला गुंतवायचं असेल तर छंद जिवंत ठेवले पाहिजे, कुठलीही एक ना एक तरी कला जोपासायला हवी... कलेमध्ये आपण स्वतःला हरवून ..निर्माण झालेल्या कलाकृतीत आपण सापडतो.. कलेमुळे जीवन बहारदार बनते ..भरपूर आनंद मिळतो🤗🤗.. कले विना जीवन म्हणजे ...सुगंध शिवाय फुल... 🌻🌺
कितीही ठरवलं तरी छंदासाठी उपलब्ध न झालेला ..
वेळ ..कोरोना मुळे सगळ्यांना उपलब्ध झालेला आहे. कोरोनामुळे सगळ्यांच्या जीवनात विविध कला..
कोरोंना मुळे शाळा बंद झाल्या ..त्यामुळे लहान मुलांना
खरं तर घरात कोंबून ठेवल्यासारखे झालंय .पंख कापलेल्या पक्षांप्रमाणे त्यांच्या मनाची अवस्था झाली आहे.काय करावं ? हा त्यांच्या छोट्या डोक्याला पडलेला मोठा प्रश्न ... कोरोना कधी जाणार ? शाळा कधी उघडणार? मित्र कधी भेटणार? सतत हेच प्रश्न... 🤔🤔
मला दोन मुलं ,मोठा दहावीला ..लहान पाचवीला ..
घरात आम्ही चौघंच..मोठा दहावीला असल्यामुळे सतत त्याच्या अभ्यासात व्यस्त त्याला वेळ कमी पडतो📗📕 ..आणि मला माझी काम संपतच नाहीत ,उलट जास्त काम वाढले की कामाचा कंटाळा येतो..मग विरंगुळा म्हणून पोस्टर रांगोळी काढणे ,चित्र काढणे आणि सोबतीला मोबाईल , टीव्ही, पेपर आहेतच.. मिस्टर पण त्यांच्यामध्येच व्यस्त ..आमच्या तिघांना रिकामा वेळच मिळत नाही..
पण माझ्या लहान शंतनू ला घरी राहण्याचा खूप कंटाळा आलाय 😐😟कारण कॉलनीत मुलांचे बाहेर निघणे, खेळणे बंद झाले न म्हणून..
त्यामुळे त्याच विश्व माझ्याभोवती गुरफटलेलं असतं सतत मला विचारत राहतो मी आता काय करू? आता काय करू? ??
🤔🤔
कारण लहान मुलांमध्ये प्रचंड ऊर्जा असते आणि त्या ऊर्जेच्या प्रवाहाला एक विशिष्ट दिशा मिळणे आवश्यक असते .आता त्याला काय सांगायचं ?हेच माझ्या डोक्यात चक्र चालू असतं..
आमच्या दिवसाचा शुभारंभ योग ,प्राणायाम नी होतो... म्हणून
रोज सकाळी सहा वाजता मी त्याला बाहेर सायकलिंग ला पाठवते 🚴🚴.. आल्यावर गेटमधूनच सांगतो खूप मजा आली मम्मी ...चला तर मग त्याच्या आनंदाचा पहिला सूर मला गवसला ..
आठ वाजता मी त्याची शिकवणी घेते ..
नंतर
दोघांचे पण एक छान वाक्य असते ..आज नाश्त्यात काय करते . .ग मम्मी? वाक्य जरी रोजच जुन असल तरी ..नाश्ता मात्र नवीन असतो बर का ...🍜🥪
साडेनऊ वाजता त्याचा ऑनलाईन क्लास असतो ..पण अभ्यासात असं फारसं काही नसतं ..त्यानंतर पुन्हा टीव्ही, मोबाईल आहेतच.आणि हो कोणाचेही फोन आले तर ते त्याच्या जवळ नेऊन देण्याचे काम त्याच..तेही आनंदाने .सतत टीव्ही लावली तर दादाला डिस्टर्ब होतो आणि मोबाईलवर राहिलं तर डोळे खराब होतात ..असं मी त्याला सांगितलं. ..म्हणून
अधून मधून दादा जवळ जातो आणि त्याला विनाकारण त्रास देत राहतो... त्यात त्याला खूप मजा वाटते
मग मी त्याला एक छान आयडिया दिली ऑइल पेस्टल पेंटिंग करायची ...कारण त्याला चित्र काढायला खूप आवडतं ..मग तो ..एक दोन तास सहज त्या पेंटिंग साठी घालवतो...
त्यानी काढलेली छानशी पेंटिंग, मग मी लगेच स्टेटसला लावते ...त्याच्या स्तुती ,कौतुक वाले मेसेज वाचून त्याला खूप आनंद होतो ,प्रोत्साहन येते ...आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी नव्या उत्साहाने अजून नवीन पेंटिंग करतो... खूप आवडीने.. कधी एकाच दिवशी दुसरी करण्याची विचारतो? मी म्हणते लहान मुलांचे बोट नाजूक असतात . .म्हणून एका दिवशी एकच करायची ... कधी विचारतो ..मला पेंटिंग का आवडत असेल? तर मी म्हणते ..मला आवडते म्हणून तुला आवडत असेल... Heridity..
लॉक डाऊन मध्ये शाळा बंद असल्यामुळे...मुलांकडे अख्खा दिवस ...काय करावे??मला बोर होतंय ..मम्मी तू लहान असताना सुट्ट्यांमध्ये काय करत होतीस ???मी म्हटलं ..आम्ही खूप खेळायचो..आईने आवाज दिल्याशिवाय घरातच येत नव्हतो ..भन्नाट मजा यायची...
शतनु बऱ्याच वेळा युट्युब वर बघितलेले ..विज्ञानाचे छोटे छोटे प्रयोग करून बघतो .. छोटी छोटी खेळणी बनवतो...,त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची जुळवाजुळव करतो ,प्रयोग यशस्वी झाला की ...जाम खुश.
दुपारचा चहा नंतर चार वाजता कॅरम / चेस गेम रंगायचा..चेस् कितीही लांबला तरी..माझे हरणे नक्कीच ... .तरीही मी .....मनातून खूप खूष असते..पण मी त्याला जिंकण्या साठी संधी मात्र कधीच सोडत नाही ,बर का ..
सायंकाळी ...कधीकधी दोघा भावांचे कराटे/ कबड्डीचे सामने हॉलमध्येच रंगतात..🤼♂️पंच(umpire) म्हणून मी माझी जबाबदारी खूप छान पार पडते....मुलांना खेळाचा आनंद मिळतो...
जेव्हा केव्हा तो माझ्याजवळ किचनच्या ओट्यावर येऊन बसतो..तेव्हा ..तोंडी बेरीज ,वजाबाकी, गुणाकार त्याला उलट सुलट करून विचारते.. कधी तो मला विचारतो.. हे असे का ?ते तसे का ? मी मुक्तपणे विचारू देते कारण उत्तर देणाऱ्यापेक्षा प्रश्न विचारणाऱ्याला जास्त डोक लावाव लागत.. खूप छान वाटते..
जेवणानंतर रात्री जेव्हा टेरेसवर फिरायला जातो .. तेव्हा त्याचं .एक 3 भाषेतील वाक्य खूप छान ...मम्मी मला बॉडी च्या बारे मध्ये सांग / विचार ?..तर कधी युनिव्हर्सच्या बारे मध्ये सांग??असे म्हणतो ... त्याला माहिती असलेलं सांगतो ..आणि मग हळूहळू चालु होतो विषय ...डोळ्याचं कार्य कसं चालतं ... मेंदूचं कार्य कसं चालतं ?? त्यांचा काय संबंध ?//सूर्याचे तापमान किती ?सूर्य कशाचा बनलेला आहे???
झोपताना आमच ठरलेल आहे की त्यानी ..एक गोष्ट तीन भाषेत सांगायची ..आणि नंतर मी त्याला ,अंगाई गीत म्हणून झोपवायचं ..चंदा है तू... / तुझे चांद ..कहु या सितारा...
@shantanu##
@आता काय करू? ##
@Best use of time##
@oil pastel coloring#
🚴🍕🍛🍜🤼♂️🥎🌻🌺🤼♂️📗📕
खूपच छान सुंदर आवड, छंद, जोपासणे महत्वाचे👌👍
ReplyDeleteखूप खूप खूप च. Creative बनवलस ग तू शंतनूला,,,keep it up.तशी तू एक परफेक्ट मॉम आहेस यात शंकाच नाही , मस्तच लिहिलंस
ReplyDeleteखुप सुंदर।
Deleteप्रत्येक घरातील पडलेला प्रश्न
मी आता काय करू?एक उत्तम आई चे पात्र रंगवते आहेस सुरेखा।
नावा प्रमाणेच सुरेख
पैटिंग ,रांगोळी सुरेख
शंतनु वर मेहनत घे
नक्की छान कलाकृती मिळेल।
Very nice written
ReplyDeleteनावा प्रमाने सुरेख लिहिले आहे सुरेखा मॅडम
ReplyDeleteउत्तम लेखन लिहीत रहा
Khup chan.. Best use of time
ReplyDeleteअतिशय रम्य चित्रं आहेत. खूप शुभेच्छा
ReplyDeleteशंतनुसाठी छान उपक्रम तुम्ही राबावलात. शंतनूने खूप खूप छान चित्रे काढली आहेत. तुमच्या दोघांचे अभिनंदन.
ReplyDeleteAll paintings n drawings r superb .keep it up shantanu
ReplyDeleteThanks to all🙏
ReplyDelete