चक्कर/ भोवळ /गरगरणे/ फेऱ्या/ प्रदक्षणा

चक्कर म्हटलं की थोडस फिरल्यासारख ,फेरफटका मारल्या सारखंच  वाटत नाही का ? मूळ ठिकाणाहून निघून परत तिथेच वापस येणे म्हणजे चक्कर .चक्कर या शब्दाचे आपल्या जगण्याशी कसे वेगवेगळे रंग जुळले आहेत.? हे मी आपल्या निदर्शनास आणणार आहे .चक्कर या शब्दाचा अर्थ एकच पण.. परिणाम मात्र
 वेगवेगळे .. बर का....कधी आनंद मिळून देणारे तर कधी दुःख.. 

 फुलाभोवती फुलपाखराने किंवा भुंग्याने मारलेले  चक्कर ..एखाद्या तरुणाने तरुणीच्या मागेमागे  किंवा तिच्या घराभोवती मारलेले चक्कर. ती दिसली तर आनंद . स्त्रियांना आनंदाची बातमी देणारे चक्कर अत्यंत सुखद असतात.

.एखाद्याकडे उधारीचे पैसे काढायचे असतील तर त्याच्या घराभोवती मारलेले चक्कर . .पैसे मिळाले तर आनंद नाहीतर मग मन उदास, निरुत्साही ,केविलवाणे बनते. Punishment म्हणून ग्राउंड ला मारलेले दहा चक्कर .कोर्टकचेरीचे मारलेले चक्कर सुद्धा बऱ्याच लोकांना  वाईट अनुभवाचे असतात .

पाहुणे घरी आल्यानंतर  त्यांच्या गाडीचा  मारलेला एक चक्कर . किंवा कुणाच्या नवीन गाडीचा किंवा सायकलचा एक चक्कर मारल्यानंतर  जो आनंद मिळतो तो पैसे मोजूनही मिळत नाही बर का  ?बऱ्याच लोकांना अशा सवयी असतात नवीन गाडी चक्कर आणणे .औदुंबराच्या झाडाला  मारलेले चक्कर म्हणजे  आनंदाने मनात काहीतरी इच्छा ठेवून  मारलेल्या प्रदक्षणा  मनाला   आशावादी बनवतात . 

मेरी गो राऊंड मध्ये घेतलेले चक्कर. पाळण्यात बसल्यानंतर मिळालेला आनंद , उत्साह , जोश काही वेगळाच . मित्रांसोबत सायकल ने मारलेले चक्कर . मनाला आनंद मिळवून देतात. 

पण  बस मध्ये बसल्यावर मळमळणे .बोट मध्ये बसल्यावर  गरगरणे , पाळणा किंवा बंगडी वर बसल्यावर  मळमळ होणे, ही नेहमी चे  अनुभव ..मला तर लहानपणी चक्क  बैलगाडी त बसल्यावर सुद्धा  मळमळ व्हायचं.. 

तसेच मानसिक  स्थिती बिघडलेली असताना आलेले चक्कर  म्हणजे सतत विचार  करून डोके गरगरणे, खूप भीती वाटणे..  खूप जास्त बडबड करणे.. इत्यादी

स्पॉंडिलायसिस मुळे येणारे चक्कर  जे कॅल्शियमची कमी आणि हाडाच्या घर्षणामुळे येतात.,   फुगडी खेळल्यामुळे  भोवळ येणे  म्हणजे शारीरिक स्थिती बिघडल्यामुळे येणारे चक्कर . 

पण एक नक्की ..चक्कर कुठलाही असो त्यामुळे आपली मनस्थिती  उलथापालथ होते. खरे पाहता हृदय आणि मेंदूच्या कार्यात थोडा जरी बिघाड  झाला तर त्यांचं संतुलन बिघडते. बीपी वाढल्यामुळे, उपाशी असल्यामुळे ,जास्त ताप असल्यामुळे ,जास्त ताणामुळे,  जास्त विचारामुळे अशा वेगवेगळ्या शारीरिक किंवा मानसिक ताणतणावामुळे गरगरल्यासारखे होते.


पण एवढे मात्र नक्की चक्कर आल्या मुळे आपल्या  पायाखालची जमीन  सरकल्या सारखी होते.जणू काही आपली दुनिया फिरत आहे .असे वाटते, सार विश्व थांबलं की काय? अचानक वादळ आलं की जसं टीव्हीचे सिग्नल जातात आणि टीव्हीवर काहीच दिसत नाही .तसंच  काही कारणास्तव आपल्या मेंदूचे सिग्नल काही काळापुरते गेल्यामुळे आपला बॉडी कंट्रोल जातो .परिणामी आपल्याला चक्कर येतात. बरोबर आहे ना... 

असाच माझ्या मुलाला ताप आल्यामुळे आलेला चक्कर आणि त्यासाठी क्लिनिक ते मेडिकल पंचर गाडीने मारलेले चक्कर हा अनुभव मी आपल्यासोबत शेअर करते. सायंकाळी पाच ते रात्री 8 च्या दरम्यान माझ्या मुलाला ताप ,थंडी वाजणे, खूप हात पाय दुखणे ही लक्षणे सुरू होताच ,मी त्याला आठ वाजता फॅमिली डॉक्टर कडे नेले .डॉक्टर एका पेशंटला सलाईन लावत होते ते बघून   की/ ताप होता म्हणून त्याला चक्कर  आला, मला  कळलच नाही .माझ्या हातात हात असून सुद्धा तो हातातून सुटत गेला मम्मी  मम्मी ...मी लगेच डॉक्टरांना आवाज दिला त्यांनी ताबडतोब त्याला चेक केला आणि सांगितलं की डेंग्यूची साथ पसरलेली आहे .तुम्ही लवकरात लवकर मेडिकल वरून औषध घेऊन या ,कारण covid मुळे सात वाजता सर्व मार्केट बंद झाली होती .रस्ते ही  निर्मनुष्य झाली होती.फक्त दवाखाने मेडिकल नऊपर्यंत चालू होते. ताबडतोब आम्ही मेडिकल वर पोहोचलो पण तिथे औषध नव्हती .त्यांनी सांगितल गोळी बदलून आना .मी तिथेच थांबले आणि मिस्टर डॉक्टर कडून औषधे बदलून आणायला गेले.रस्त्यात गाडी पंचर झाली . औषध बदलून आणले पण तेही तिथे उपलब्ध नव्हते .मग मेडिकल वाल्यांनी सांगितलं की पुढे थोड्या अंतरावर एक मेडिकल आहे.तिथे जाऊन घेऊन या मुलाचा ताप आणि आलेल्या चक्कर  मुळे आमचा तान  अधिकच  वाढला होता .पुढच्या मेडिकल वर पंचर गाडी ने पोचलो ते मेडिकल  सुद्धा बंद झाले होते.म्हणून पुन्हा तिथेच वापस आलो ,निदान ते तरी कुठून तरी मदत करतील .आमचे इकडून तिकडे चक्कर बघून  दोन तरुण धावत आले आणि म्हणाले ,तुम्ही पंचर गाडीवरून का जात आहे ?थांबा ..कुठे जायचे ?ते मला सांगा ..मी   मदत करतो ..मी त्याला हकीकत सांगितली.तो म्हणाला 24 तास चालू असणाऱ मेडिकल मला माहित आहे .चला  माझ्यासोबत.मी तिथेच थांबले .माझे मिस्टर त्याच्या गाडीवर गेले.खरोखर  त्यानी औषध मिळवून दिली .आम्ही त्यांचे मनापासून आभार मानले आणि खरच त्या तरुणांची मदत आम्हाला लाखमोलाचे ठरली.
त्यानंतर त्याला  सतत ताप..तीन दिवसानंतर  ब्लड चेक केल्या मुळे डेंग्यूची लागण झाल्याचे कळले . डेंगू एडीस इजिप्ती नावाच्या डासापासून होतो .डेंगू चा कालावधी 7 दिवसाचा असतो. नंतर त्याचा उपचार चिल्ड्रेन स्पेशालिस्ट कडे केला . ताप कमी झाल्यानंतर पेशी कमी होतात त्यामुळे खूप अशक्तपणा येतो . म्हणून डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा फोलोअप घेतला .दररोज ब्लड चेक करणे  आणि  सलाईन देणे. अशा दवाखान्याच्या  चकरा सुरू झाल्या.कारण डेंगू मुळे सतत पेशी कमी होतात .मग पेशी कमी होऊ नये म्हणून सकाळ-संध्याकाळ पपईच्या पानाचा रस .अधून मधून  कच्चा पपई चा हलवा.पिकलेली पपई ,रोज किवीचे फळ ज्यामुळे पेशी वाढतात .डाळिंब ज्यामुळे हिमोग्लोबिन वाढते .संत्री मोसंबी त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते. असा दिनक्रम चालू झाला. घरी आराम घेतला त्यामुळे ॲडमिट करण्याचे काम पडले नाही.
परंतु इतर मुलांना ऍडमिट रहाणे, सतत सलाईन ,खूपच पेशी कमी झाल्या तर प्लाजमा देणे चालू होते ..कारण डेंगू हा गंभीर स्वरूपाचा देखील असू शकतो.

अशा प्रकारे सात दिवसानंतर  माझ्या मुलाच अंग खाजवायला लागलं आणि डॉक्टरांनी सांगितलं की आता पेशी वाढलेल्या आहेत ,सर्व रिपोर्ट नॉर्मल .नंतर तो पूर्णपणे तंदुरुस्त झाला.

Comments

  1. Good Thought process

    ReplyDelete
  2. चक्कर आणि त्यामुळे घडलेलं बरंच काही👌, छान आहेत चक्कर 👍अनुभव कथन.

    ReplyDelete
  3. Malmal chakkar he mla w uju la mahit ahet g....bas madhle ..
    Tuza anubhaw share kelas te br kelas...mast....best wishes for next

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Hyderabad Science Study Tour Report

माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी मायक्रो केमिस्ट्री प्रॅक्टिकल किट तयार करणे.

छंद /कला /आवड/ Hobby