नवरंग साड्यांचे
नवरात्रीचे नऊ रंग म्हणजे जणू रंगांचा उत्सव. केवढे कौतुक नऊ दिवसाच्या नऊ रंगाच्या साड्या घालण्याचे.जणू रंगांची उधळण की रंगांचा सोहळा .नऊ दिवस आदिमाया शक्ती ची उपासना. एकच रंगाच्या साड्या घातलेल्या सर्व स्त्रिया एकत्र जमल्या की माळ तयार झाल्याची दिसते .. नऊ दिवसाच्या नऊ माळा .सर्व वातावरण जणू प्रफुल्लित चैतन्यमय बनत. मनामनात जणू आनंदीआनंद दिसतो . सुंदर सुंदर साड्या म्हणजे डोळ्यांच eye tonic च
साडी म्हणजे स्त्री वर्गाचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय .भारतीय स्त्रियांचं मुख्य आवडतं वस्त्र . साडी घ्यायची म्हटलं की मनात आनंदाचे काजवे चमकतात .जणूकाही मनात रंगीबेरंगी फुलपाखरं बागडतात .कपाटातल्या साड्या अंगावर पडतात . तरी ती नेहमी म्हणते ,मला साड्याच नाहीत .एक छान वाली साडी घ्यायची आहे.पण खरंच कोणतीही स्त्री साडी मध्ये खूप सुंदर गोड ,गोजिरी दिसते.तिच सौंदर्य अधिकच खुलून दिसत.
साडी तीच पण विविध भागात विविध पद्धतीने घातली जाते.
साडी परिधान करण्याच्या पद्धती सुद्धा काळानुसार बदलत गेल्या .कमरेला गुंडाळल्या वर उरलेल्या आकर्षक तुकड्याला पदर म्हणतात .आधीच्या काळात पूर्णपणे डोक्यावर पदर असायचा .नंतर जुड्या वरून म्हणजेच अर्धा डोक्यावरून पदर घ्यायच्या.नंतरच्या काळात खांद्यावर घेण्याची पद्धत होती .काम करताना मात्र कमरेला बांधायचा.पण आता पूर्णपणे flowing पदराची फॅशन आहे.ज्याला जसा आवडतो तसा त्या घेतात.
साड्यांचे रंग आणि प्रकार वेगवेगळे ..प्रत्येकीला वाटते की आपल्याकडे सर्वच रंगाच्या साड्या असाव्या. कारण कितीही महाग साडी असो दोन-तीनदा घातली कि ती बोर होते . कारण आज-काल Fb,व्हाट्सअप ला फोटो टाकण्याचे वेड आहे.मग एकाच साडीवर पुन्हापुन्हा फोटो कसे टाकायचे.
साड्यांचे विविध रंग लाल, हिरवा, पिवळा, निळा, जांभळा, गुलाबी ,आकाशी, अबोली ,केसरी असे अनेक ...साड्यांचे प्रकार सुद्धा वेगवेगळे सिल्क ,कांजीवरम ,कोटा ,बनारसी, पैठणी ,बंदीनी ,मैसूर ,लहरिया, जॉर्जेट ,नेट ,जरदोसी ,वेलवेट, सुपरनेट इत्यादी
लहानपणीपासून मला साडी आणली की, ती लगेच घालून बघायची आवड. मग नवरात्रीच्या दरम्यान साडी घेतली की ,आई म्हणायची घालून बघू नकोस.देवीला घालायची आहे.मग त्यावर मी म्हणायची ..का ग आई दुकानात तर लावून , घालून दाखवतात ..मग ते चालते का तुला?
कुठेही सुंदर फुले दिसली, रंगीबेरंगी फुलपाखरे दिसली ,पक्ष्यांची सुंदर रंग दिसले की ..डोक्यात विचार येतो, किती सुंदर रंगसंगती ..अशी साडी आपल्याला घ्यायची ..असं कॉम्बिनेशन खूप छान दिसेल.
कुठे गेल की स्त्रियांचा एकमेकींकडे बघून सौंदर्यदृष्टी जागृत होते आणि डोक्यात विचारचक्र चालू होतं .तिची साडी कशी ? घातली कशी ?रंग कसा ?texture कसा ? फॅशन जुनी का नवी ? स्वस्त की महाग ?आणि हो आवडली तर अगदी कौतुकाने तिला सांगायचं .तुझी साडी खूपच छान आहे.मला खूप आवडली.कुठून घेतली ?केवढ्याची घेतली?
असंच एकदा इंस्पायर अवार्ड सायन्स एक्झिबिशन मध्ये माझ्या स्कूल मॉडेलची स्टेट साठी निवड झाली म्हणून माझ्या शाळेचे नाव घेतलं .मी आणि माझा student स्टेजवर गेलो.तिथे सन्मानचिन्ह ,बुके ,सर्टिफिकेट देऊन गौरव करण्यात आला.स्टेज वरून उतरुन जागेवर जात असताना दोन मॅडमनी मला हळूच आवाज दिला.मला वाटलं ,माझ अभिनंदन करतिल .पण नाही ..त्यांनी चक्क मला माझ्या फक्त साडी बद्दल विचारले.आणि म्हटले . .आम्ही तुमची फक्त साडीच बघत होतो.खूप छान आहे ?कुठून घेतली? केवढ्याची?
आईसाठी जर साडी आणली .. आणि तिला विचारलं? कशी आहे? तर ती म्हणेल तू आणली ना मग छानच आहे .आणि तुला आवडली असेल ना तर आधी तू घाल.नंतर मी घालेल.केवढं प्रेम..केवढी आईची माया.. बहिणीला सुद्धा कधी म्हटले की ,तुझी ही साडी खूप छान आहे.तर ती लगेच म्हणते.अगं घालशील ना मग, तुला खूप छान दिसेल.
सासूबाई च्या बाबतीत मात्र थोडा वेगळा अनुभव येतो .तिच्यासाठी जर साडी आणली तर ,ती म्हणेल मला हा रंग आवडत नाही .साडीचे काठ छान नाही .त्याला पदर थोडा भरगच्च हवा होता. नाहीतर असं कर बदलूनच आण. त्यातच एखादा पंच सुद्धा देतात ...सेल मधून आणली असेल/स्वतःसाठी कशी छान निवडता येते वगैरे वगैरे.
काही स्त्रिया आपल्या पतीच्या आवडीचे ,साड्यांचे रंग घालतात .पण मला वाटते आपल्याला जे आवडतात आणि जे छान दिसतात तेच घालावे . कारण..मग आपल्या पसंतीच काय? माझ्या मते ,आपण साडी घातल्यानंतर ..कोणी जर तिला छान comment दिले ,तर ती साडी छान..
आमच्याकडे ज्या मुलींचे लग्न करायचं आहे .तिला पहिली साडी मामा घेतो .आणि तेही केशरी, अबोली, पिवळ्या ,फिकट गुलाबी रंगाची कारण त्या रंगात मुली अधिक गोऱ्या गोमट्या दिसतात .कारण भारतीयांना गोऱ्या रंगाचे महत्व जरा जास्तच .कोणत्याही मुलाला वाटते की मला गोरीच मुलगी पाहिजे.पण जर का मुलगी पगारदार असेल .तर मग त्यावेळी कोणता पण चालते बर का..मग म्हणतात रंगाचं काय करायचंय .दोनच रंग आहेत .नुसता स्वार्थाचा बाजार...
Waw साडीचे नवरंग, केव्हा जायचे मग साडी घ्यायला👌👍
ReplyDeleteफोटोंमुळे लेख उठावदार झाला आहे. सरसकट सगळ्या सासवा असं करत नाहीत हं.. ! माझ्या आईला साड्यांची आवड आणि जाणही होती. पण आमच्या शिक्षणासाठी तिने गरज असेल तेवढ्याच साड्या बाळगल्या.
ReplyDeleteलेख आवडला.