रंग मैत्रीचे
जगातील सुंदर आणि श्रेष्ठ नातं म्हणजे मैत्रीच . मैत्री म्हणजे जीवनाला लाभलेला प्रेम आणि आनंदाचा निखळ झराच. मित्र रूपाने मग कोणीही असू शकते. आपण समोरच्या मनाची काळजी आपल्या मना पेक्षा जास्त घेतो म्हणजेच मैत्री.मैत्री एखाद्या छोट्या रोपट्या प्रमाण असते , जशी वाढवायची फुलवायची ,तशी फुलते.
जीवनात मैत्रीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे .कारण अगदी बालपणापासून ते जीवनाच्या प्रत्येक सुख दुःखाच्या क्षणात आपल्याला कोणाची तरी सोबत हवी असते.बहुदा समवयस्क मध्ये मैत्री अलगद ,सहज जुळून येते. मला मैत्री करायची , मला मित्र-मैत्रिणी पाहिजेत,असे म्हटल्याने मैत्री होऊ शकत नाही .पण मैत्रीचे नाते कसे व कधी जुळून येते हे कळत सुद्धा नाही. एक मात्र खरं..मैत्रीचे सुंदर रेशमी बंध जोडणे सोपे असते .परंतु ते टिकून ठेवणे तितकेच अवघड.
मैत्री ही विश्वासाच्या स्तंभावर आधारलेली असते.आणि या स्तंभाचा चा मूळ पाया असतो, तो म्हणजे विचारांची जुळणी.
जीवनाच्या वाटेवर चालत असताना बालपणापासून ते आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर पुष्कळ माणसं भेटतात .परंतु त्यामध्ये खरीखुरी मैत्री मात्र क्वचितच लाभते. प्रवासात अनेक चांगले लोक आपल्याला भेटतात .पण सोबतच्या वाटसरूला आपण मित्र म्हणू शकत नाही . मैत्रीच्या या पवित्र नात्याला कुठल्याही रुढ नात्यांचे बंधन नसावे किंवा मैत्री आहे म्हणून खूप सार्या अपेक्षाही नसाव्या . कुठल्याही ओझ्याखाली कुठलाही ओझ्याखाली नसाव्या . मैत्री ही पारदर्शी असावी . कुठलाही किंतु-परंतु नसावा .ओढ असावी ती फक्त एकमेकांना भेटण्याची..भेटून चर्चा व्हावी ती सुखदुःखाची, गप्पा-गोष्टी रंगाव्या त्या हास्य विनोदाच्या. निराश काळी मनाच्या गुंता ,गाठी मोकळ्या करण्यासाठी मैत्रिणी/मित्र हे सर्वात जवळचा वाटतात.मैत्री कडून अपेक्षा असते ती फक्त आपलेपणाची, प्रेमाची, आधाराची ,विश्वासाची...
 खरंतर मैत्री ही सहवासातून निर्माण होणारी प्रेमळतेची लता वेलच आहे . तिच्यावर आपुलकी आणि प्रेमाच्या कळ्या फुलत असतात .अशाा वेलीला बहर आला की जगण्यालाा नवीी प्रेरणा मिळते.जगण्यालाा बहर येतो.
वारा एकच असतो परंतुु तीनहीी प्रहार सोबत आपले नातेे निभावतो .पहाटेलाा थंडगार वारा नव्या दिवसाची नवीन प्रेरणा देतो . माध्यमाचा खट्याळ वारा खळखळून हसण्याची कला शिकवतो.सायंकाळचाा मंद धुंद वारा निशेला शांत उल्हासित करणारा असतो .त्याच प्रमाणे आपण सुद्धा सर्व् प्रकारच्या मित्रांशी जुळवून घेतले पाहिजे. मैत्रीचा आनंद घेता आला पाहिजे.कारण सगळेच सारख्या् स्वभावाचे नसतात.
प्रेमानंतर मैत्रीही मानवी मनाला मिळालेली परमेश्वराची अमुल्य अशी भेटवस्तू आहे.जिच्यामुळे आपण इतरांशी हितगुज साधू शकतो .जीवनाचा आनंद भेटू शकतो.मैत्री अशी असावी की जिला बघून इतरही प्रेरित व्हावे. फुल जस आपल्या पाकळ्यांना अलगद जपून सुगंध सगळीकडे पसरवतो.तसेच आपण सुद्धा आपला मित्रपरिवार जपावा आणि मैत्रीचा सुगंध सर्वदूर पसरावा.
.
मी स्वतःला खरंच खूप धनवान समजते.माझ्याजवळ सप्तरंगी इंद्रधनुष्या सारख्या मैत्रीची अमुल्य अशी धनसंपत्ती आहे . ज्यामुळे मला आनंददायी जीवन जगता येते.
Waw!परमेश्वराची अमूल्य अशी भेटवस्तू म्हणजे मैत्री🙌छान ग friendship👌💃💃
ReplyDelete