जागतिक पुस्तक दिन
जागतिक पुस्तक दिन 23 एप्रिल रोजी साजरा करतात.विल्यम शेक्सपियर यांचा याच दिवशी मृत्यू झाला होता.त्यांना श्रद्धांजली म्हणून हा दिन घोषित करण्यात आला.
लोकांमध्ये वाचनाची सवय वाढावी.जगभरातील लेखकानं प्रति आदर व श्रद्धांजली अर्पण व्हावी .तसेच पुस्तकां मध्ये रस निर्माण करण्यासाठी हा दिन साजरा करण्यात येतो.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे ,
जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची रोटी घ्या आणि एक रुपयाची पुस्तक घ्या .
रोटी तुम्हाला जगण्यास मदत करेल तर पुस्तके तुम्हाला कसे जगावे ते शिकवतील.
जस देवघर आपण छान छान फुलांनी सजवतो, तस पुस्तकांचे घर सुद्धा असाव आणि तेसुद्धा सुंदर अशा पुस्तकांनी समृद्ध कराव. तरच आपला व्यक्तिमत्व विकास घडवून येईल. सामाजिक आणि मानसिक विकास होईल.
पुस्तके ही प्रत्येक व्यक्तीसाठी खूप महत्वाची असतात. कारण पुस्तके ही ज्ञानाचा समुद्र आहेत जी आपल्याला ज्ञान देतात. पुस्तके ही एखाद्या व्यक्तीचे चारित्र्य निर्माण करायला मदत करतात. म्हणून पुस्तकांना मानवाचे खरे मित्र देखील म्हटले जाते. पुस्तकांचे बुद्धीवर होणारे चांगले परिणाम म्हणजे
पुस्तके ही नेहमीच माणसाला योग्य मार्गदर्शन करतात आणि योग्य दिशा दाखवतात. पुस्तके वाचल्याने केवळ एखाद्या व्यक्तीचे ज्ञान वाढत नाही तर एक मनोरंजनाचे साधन देखील आहेत.
वाचनाची सवय लहानपणापासूनच मुलांना लावायला हवी.मग आपोआप वाचनाची आवड निर्माण होते.मी माझ्या मुलाला रोज गोष्ट सांगायला लावते .सुरुवातीला शाळेत हिंदी ,इंग्रजी,मराठीच्या धड्यावरील आणि नंतर मग स्टोरी बुक मधून वाचलेली स्टोरी सांगायचा. स्टोरी जर लहान असेल तर एकच स्टोरी तीन भाषेत सांगायची.मग त्यावर मी त्याला प्रश्न विचारत असे.त्यातूनच हळूहळू संभाषण, कथाकथन , वकृत्व कौशल्य विकसित होत. तिन्ही भाषा विकसित होतात .स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते..
आता तो मात्र हुशार झाला तो म्हणतो आधी तू सांग ,मग मी सांगतो . त्यामुळे मला सुद्धा आता कंपल्सरी सांगाविच लागते .कधीकधी मला त्याची स्टोरी ऐकताना डुलक्या येतात .तेव्हा तो लगेच मला प्रश्न विचारतो.सांग मी आता काय सांगितल? मग माझी झोपच उडते.जशी वर्गात गप्पा मारणाऱ्या मुलांना प्रश्न विचारला असता त्यांना काहीच माहीत नसतं त्यांची धांदल उडते.तशीच माझी गत होते.
बऱ्याच लोकांना पुस्तक वाचण्याची सवय असते. पुस्तक वाचल्याने फायदा होतो. आजच्या काळात पुस्तके देखील डिजीटल स्वरूपात येते. चला तर मग पुस्तक वाचण्याचे फायदे जाणून घेऊ या.
1 एकाग्रता वाढते- पुस्तक वाचल्याने एकाग्रता वाढते, कारण आपले लक्ष एकाच गोष्टीवर केंद्रित राहते. या मुळे आपले काम सहज बरोबर होतात. त्यासाठी अत्याधिक परिश्रम करावे लागत नाही.
2 मानसिक तणावात कमतरता -
पुस्तक वाचल्याने तणाव कमी होतो. जेव्हा आपण एखाद्या तणावात असता तेव्हा आपण कोणतेही काम व्यवस्थितरीत्या करू शकत नाही. त्यामध्ये देखील चुका होतात. पुस्तक वाचल्याने तणाव कमी होतो.
3 मेंदू सक्रिय होतो-
पुस्तक वाचल्याने मेंदूचा व्यायाम होतो, या मुळे मेंदू त्वरित सक्रिय होतो. पुस्तके वाचल्याने कोणते ही निर्णय घ्यायला वेळ लागत नाही. मेंदूचा व्यायाम झाल्यामुळे तो सक्रिय होतो.
4 स्मरणशक्ती वाढते-
जेव्हा आपण एखादे पुस्तक वाचतो तर त्यामधील काही ठळक मुद्दे लक्षात राहतात. दररोज पुस्तक वाचल्याने ते लक्षात ठेवण्यात वाढ होते . काही दिवसानंतर आपण पुस्तक हाताळले नाही तर ते मुद्दे विसरायला होतात,परंतु नंतर वाचल्यावर ते आठवू लागतात. अशा प्रकारे पुस्तक वाचल्याने स्मरण शक्ती वाढते.
5 बोलण्याचा आणि लेखनाचा विकास-
दररोज पुस्तके वाचणे,हे आपल्या शब्द भांडारात वाढ करतात. दररोज आपल्याला नवीन -नवीन शब्द वाचायला मिळतात. ज्यांचा वापर आपण बोलण्यात किंवा लिखाणात करतो. या मुळे बोलण्याच्या आणि लिखाणाच्या कलेचा विकास होतो.
6 वैचारिक शक्ती वाढते-
पुस्तक वाचल्याने आपली विचार करण्याची शक्ती वाढते. बऱ्याच वेळा आपल्याला पुस्तक वाचताना अशे काही घटनाक्रम आढळतात त्यांचा अंदाज आपण लावण्याचा प्रयत्न करतो. या मुळे आपली वैचारिक क्षमतेत वाढ होते.
7 चांगली झोप येते-
पुस्तक वाचल्यावर झोप चांगली येते, या मुळे आरोग्य चांगले राहते. झोपण्याच्या एक तास पूर्वी टीव्ही किंवा मोबाईल हाताळू नये. या मुळे मेंदू शांत होत नाही आणि झोप देखील शांत लागत नाही. झोप येत नसेल तर पुस्तक वाचावे .
सजीव माणसाचा सखा ,सोबती ,मित्र म्हणजे पुस्तक जगण्याचे रंग फुलवणारे सर्वोत्तम साधन.
संदर्भ माहिती, चित्र
From
Internet
Webdunia
📚सुरेखा माकोडे आकोट📕📗📕
छान माहिती आहे, पुस्तक दिनाची👍👌
ReplyDeletechan
ReplyDeleteछान माहिती. Relearning is very important. It happens through such small articles read at any stage of life
ReplyDelete