कोरोनामुळे बदललेले जगण्याचे रंग
Corona मुळे सौंदर्य वस्तू गुपचूप बसल्या
जणू काही मनातल्या मनातच रुसल्या ...
💅💄🌼
बाहेर मिरवल्या जाणाऱ्या सुंदर सुंदर साड्या
आता मात्र गुदमारतात त्यांच्या घड्या वर घड्या..
🥻🥻
छान छान ड्रेस आणि ओढण्या दुरूनच खुणावतात
बाहेर कधी जायचं म्हणून मिश्कीलपणे विचारतात..
👗🧥🦺
नेहमीच्या नेलपेंट आणि फाउंडेशन च्या बाटल्या
वाट बघून जागीच कोरड्या होऊन आटल्या..
💅
गळ्यातल्याचाही असायचा वेगळाच थाट
मस्त म्हणून ऐकण्याची तेही बघतायेत वाट..
बॉक्स मधील बांगड्या ही बसल्यात ताठ
कुणाचीच हाताशी नाही कधी भेट गाठ..
जिच्यामुळे खुलते चेहऱ्याची रंगत लय भारी
ती ही शांत बसली ड्रावरच्या कोपऱ्यात विचारी..
💄💄💄
परफ्यूमचा चालायचा मंद धुंद सुगंध
तोही आता झाला बाटली तच बंद..
चपला सॅंडल ची चालते नेहमी कुजबुज
स्लीपरच आहे बाई मालकिणीशी हितगुज ..
👠🥿👡
कपाटातल्या पर्स सुद्धा बसल्या हिरमुसून
त्यांनासुद्धा वाटतं कुठेतरी यावं हिंडून फिरून ..
👜👛💼
या सगळ्यात मात्र आरसा मौला मस्त
सगळ्यांची खबर ठेवण्यात असतो व्यस्त ..
Corona काळ संपेपर्यंत
सर्व सौंदर्य वस्तूंनी रहा राजासारखं
तुमच्या विना मी ही जगते छान राणी सारख..
☺😊
Corona ने दाखवून दिल जगाला...
जगण्याला लागत नाही असं काही जास्त
जीवन असू शकत खूप साधं आणि स्वस्त🌺🌺
🌷🌹🥀🌷🌹🌹🌷🌷🥀🥀
सुरेखा माकोडे, अकोट
मस्त जमलं बदललेले जगण्याचे रंग👌👍
ReplyDeleteवा मस्त
ReplyDeleteछान जमली आहे कविता. मस्त.
ReplyDeleteमस्त
ReplyDelete