तिचे आनंदी जगणे
आनंदी जगणे ही खरंच एक कला आहे..
नाहीतर सर्व असूनही जगणं निराश आहे..
पैसे खर्च करूनही खरा आनंद मिळवता येत नाही...
सकारात्मक दृष्टी शिवाय जगण्याला अर्थ येत नाही ..
लढाई जगण्याची तिची कधीच थांबली नाही ..
झुंजत राहिले वेळेशी ती कधी हरले नाही ..
जर ,भाकरीचा चंद्र शोधण्यात तिचं आयुष्य जाईल ...
तर ,खरंच तिला कला संशोधन कसं शक्य होईल..
तिचा सतत वेळ जातो पैशाचा हिशोब जोडण्यात...
उधारीचे हास्य चेहऱ्यावर ओढून ताणून आणण्यात...
काही मिळो ना मिळो आनंद मिळतो कुठूनही...
पण तो मिळवण्याचा मार्ग शोधता यावा कुठूनही ...
सतत सोडवत प्रश्नांना ती उत्तर शोधत राहिले...
आलेला प्रत्येक क्षण मात्र आनंदाने जगत राहिले...
संसार रथ ओढतेस आयुष्यभर
विसावा न घेता कधीही क्षणभर...
परिस्थितीशी संघर्ष तिचा कधीही संपला नाही . .
जीवनातला आनंद मात्र कमी होऊ दिला नाही...
अळखड जगण्याचा हा तिचा मंत्र...
दाखवतो रस्ता असो कितीही काळोखी रात्र..
संकटांना हसत तोंड दिल्याने ,संकटही दडून बसली ...
तुफान आले कितीही तरी , तिची नाव नाही डगमगली
विचारांच्या जाळ्यातून निघताना मार्ग कधीच थांबला नाही . .
पेटली असो रान कितीही त्याची झळ कधी पोहोचली नाही...
असो दुःख कितीही चेहरा हसरा ठेवा
बघणार्याला ही मग वाटेल की हेवा...
शब्द गुंफन
सुरेखा माकोडे, अकोट.
Comments
Post a Comment