झुंज जगण्याशी
झुंज जगण्याशी
जोडीदार तिच्या संसाराचा ,होता महामेरू ..
आकस्मिक उडून गेले त्याचे प्राणपाखरू...
गेला सोडून तिचा विठ्ठल अर्ध्या वाटेवर...
देऊन संसारधुरा रुक्माईच्या खांद्यावर...
अशी केली त्याची नियतीने फसगत,..
श्वासाचीही त्याला दिली नाही सवलत...
अश्रू झाले अनावर, जिव झाला निष्प्राण..
लेकरांचा तिच्या तो होता जीव की प्राण..
तारुण्यातच तिला सोडून गेला वाऱ्यावर...
पुरुषी जबाबदाऱ्या आल्या अंगाखांद्यावर
रुतले चिखलात तिच्या संसाररथाचे चाक..
ओढून ओढून मात्र तिची होते दमछाक ...
चालून दुःखाच्या निखाऱ्यावर...
सोसते चटके एकटीच्या जीवावर ....
हरवले जरी आभाळ ,सुख झाले गहाळ ...
तूच दाखव मार्ग ईश्वरा ,तूच कर सांभाळ ...
उडण्या आकाशी पिल्लांना ,सामर्थ्य दे पंखात . ..
जगण्याशी झुंजण्यास , सहनशक्ती दे अंगात..
उठ, कर शक्तीची उपासना येण्या बळ अंगी..
तूच आहे तुझ्या संसाराची रणचंडी, सप्तशृंगी..
.
शब्द गुंफन
सुरेखा माकोडे
👌👍
ReplyDeleteHridaysparshi, prernadayi
ReplyDelete