श्वास
श्वास
श्वासात तु ध्यासात तू
देह मंदिरात तू ही तू
सृष्टीत तू दृष्टीत तू
जळी स्थळी तू ही तू
रानात तू वनात तू
पानापानात तू ही तू
जाणीव तू उणीव तू
रंध्रारंध्रात तू ही तू
गंधही तू चव ही तू
पंचेंद्रियात तू ही तू
व्यक्त तू अव्यक्त तू
अग्नीसाक्षी तू ही तू
क्रिया तू प्रतिक्रिया तू
कर्ता करविता तू ही तू
चेतन तू अचेतन तू
चराचरात तू ही तू
ओम तू ओंकार तू
सौंदर्यात तू ही तू
शक्ती तू सामर्थ्य तू
रोमरोमात तू ही तू
ज्ञानात तू बुद्धीत तू
अंतरंगात तू हि तू
जोवर तन-मन-धनाची आस
तोवर फक्त एक श्वास श्वास
सुरेखा माकोडे, अकोट
👌खूपच छान, कविता
ReplyDelete