सखी
सखी, तुु जाई मी जुई
मनमोहक मैत्रीचा
गंध ग बाई
मैत्रीचा आपल्या झालाय मुरब्बा
आता कोण साखर नि कोण आंबा
प्रत्येक भेटीच असते नव चैतन्य
तरुणच राहू आपल्या मैत्रीच तारुण्य
कुणाच्या विचारांचे कुणावर नाही वर्चस्व
घेतो भावना सांभाळून असो दीर्घ वा रस्व
नेहमी जुळते आमच्या विचारांची कविता
सदैव प्रेरणा आम्ही एकमेकी करिता
न बोलता ही जे वाटतं ते तिला बरोबर कळतं
रस्ते जरी वळणाचे तरी मन एकच वाट शोधत
एकमेकिंशिवाय आपलं हलत नाही पान
शॉपिंगची तर येते मजाच खूप छान
मैत्रीच आपलं विश्व भलमोठ
रेशीमता त्यात नाही कमी कुठ
उपभोगून तंत्रज्ञानाची खास भेट
नेहमीच ठेवतो स्वतःला अपडेट
सतत स्पर्धा प्रदर्शनांना हजेरी लावून
माहितीचा खजिना येतो सोबत घेऊन
एकमेकींच्या आपण सल्लागार समिती
सहजच मिळवतो मार्गदर्शन नी माहिती
खरंच ....
मैत्री म्हणजे रंग जगण्याचे
मैत्री म्हणजे रंग इंद्रधनुचे
सुरेखा माकोडे ,आकोट
Comments
Post a Comment