शिक्षक
शिक्षक असावा विद्यार्थ्यांचा मित्र
शिकवावे त्याने जगण्याची सूत्र
शिक्षकांचा दृष्टिकोन असावा दूरदर्शी
जीवनात अंगीकारून तत्व पारदर्शी
विद्यार्थी घडवण्याची असावी तळमळ
घडविण्या त्याला तडफदार सळसळ
नैतिक मूल्यांचा कायम ठेवावा वारसा
आपणाच असतो विद्यार्थ्यांचा आरसा
आचरणात झळकावे जगण्याची तत्व
तरच त्याच्या जीवनाला आहे महत्त्व
शिक्षक म्हणजे घडा ज्ञानामृताचा
वसा त्याचा ज्ञान तृष्णा शमविण्याचा
जिज्ञासेला पडावे प्रश्न का, कुठे, कसा?
सदैव अज्ञानाला सखोल अभ्यासा
शिक्षक विद्यार्थ्यांचे आवडीचे असावे
आयुष्यभर मनात घर करून बसावे...
@सुरेखा माकोडे ,अकोट.
Comments
Post a Comment