महाराष्ट्र माझा
अभिमान मला या मायभूमीचा
जन्मले या भूमीवरती सूर्य ,चंद्र, तारे
उधळून गेले जीवनावरती प्रकाश सारे
ज्ञानेश्वरांनी रचियली ज्ञानेश्वरी
ज्ञान रसाने भरलेली सर्वतोपरी
ऐकुन पराक्रमी शिवरायांची शौर्यगाथा
स्वाभिमानाने नतमस्तक होतो माथा
ग्रामगीता संत तुकडोजींची
गुरुकिल्ली सुखी समृद्ध जीवनाची
बाबासाहेब संविधानाचे शिल्पकार
जगण्यातील कायदा कलमांचे सुत्रधार
सावित्रीची शिकवण्याची जिद्द न्यारी
शिक्षणाची गंगा पोहचली दारोदारी
श्रीमती सुरेखा गजानन माकोडे
यशोदा माध्यमिक विद्यालय,
चंडिकापूर
तालुका अकोट
जिल्हा अकोला
Comments
Post a Comment