मिलेट सर्वश्रेष्ठ आहार
विज्ञानाटोत्सव विषय -मिलेट सर्वश्रेष्ठ आहार ** शाळेत विज्ञान तासिका** राष्ट्रगीत झाल्यानंतर मुले वर्गात येतात आणि प्रार्थना म्हणतात ..हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे ..आरोग्य दे ...सर्वांना सुखात ,आनंदात ,ऐश्वर्यात ठेव...सर्वांचं भलं कर ..कल्याणकर ..रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे... प्रार्थना झाल्यानंतर लगेच किलबिलाट चालू होतो . . सांगा रे टाळ्यांचे प्रकार कोणते आहेत? चला आपण टाळ्या देऊया... अंकुश --हा मी देतो ऑर्डर.. बटरफ्लाय clap गो ...अपोजिट क्लॅप गो...रॉकेट क्लप गो ..बल्ले बल्ले clap गो...असाच टाळ्यांचा आनंद घेत असताना पहिल्या तासिकेची बेल होते .. टीचर वर्गात येतात..सर्व मुले एक साथ good morning mam म्हणतात आणि टीचर साठी वेलकम क्लॅप देतात. टीचर -- सीट डाऊन ऑल ऑफ यु ..थँक यु.. गुड मॉर्निंग काय ग मुलींनो? ?आज एवढी संख्या कमी का? मॅडम वेदिकाचे डोळे आले ...ओमचे पण आले...चेतनला ताप आहे..बाकी माहित नाही .. मॅडम-- हो पण हे तिघं सोडून बाकीचे कुठे आहेत? ? अंकुश-- सोप...