जैविक घड्याळ

hiii
पृथ्वीच्या परिभ्रमणानुसारच सर्व जीवसृष्टी चालते.प्रत्येक सजीवाच्या शरीरात असणारी पृथ्वीच्या गतीनुसार म्हणजे सूर्योदय व सूर्यास्तानुसार शरीराचे तापमान ,झोप ,संप्रेरक खाण्याच्या सवयी व पचनक्रिया यांचे नियंत्रण करणारी यंत्रणा म्हणजे जैविक घड्याळ. .हजारो वर्षाच्या उत्क्रांतीनंतर प्राण्यांचे शरीर दिवस व रात्र याकरता अनुकूल झाले आहे, असे मानवाला संशोधनातून समजले .शरीरातील जैविक घड्याळ संशोधनाला नोबल प्राईज मिळालआहे . अमेरिकेचे तीन शास्त्रज्ञ सर हॉल, सर रोज बॅश ,सर एम यांना हा पुरस्कार मिळाला आहे .क्रोनो बायोलॉजी या विज्ञान शाखेत शरीराच्या जैविक घड्याळाचा अभ्यास केला जातो. 
           पेशीत रात्री व दिवसा कसे बदल होतात हे मानवाने शोधले.शास्त्रज्ञांनी फळांवर बसणाऱ्या माश्यांच्या शरीरातून जैविक घड्याळ नियंत्रित करणारे जनुक वेगळे केले. हे जनुक पेशींमधील एक प्रकारचे प्रथिन तयार करण्यास कारणीभूत असते. हे प्रथिन रात्री पेशींमध्ये साठून राहते व दिवसा लोप पावते. आणि त्यामुळे आपल्या शरीराचं जैविक घड्याळ नियंत्रित राहते. शरीरात प्रत्येक भागात शरीराच्या क्रिया निश्चित करणारे चक्र असते.जैविक घड्याळाचा नित्यक्रम निश्चित करण्यात जणूकांची भूमिका महत्त्वाची असते त्याला सारकॅडीयन सायकल असे म्हणतात.
 मानवी शरीर वनस्पती ,प्राणी ,बुरशी इत्यादींचे शरीर सुद्धा जैविक घड्याळानुसार काम करते .28 एप्रिल हा जैविक घड्याळ दिवस म्हणून पाळला जातो.
जैविक घड्याळाप्रमाणे मानवी शरीर दिवसभर कार्यरत राहते. हे जैविक घड्याळ मानवी शरीराला नियंत्रित करत असते. यामध्ये बदल केला तर त्याचे आरोग्यावर विपरीत परिणाम होतात .विविध आजारांना निमंत्रण मिळते. अवेळी डोळ्यांना चष्मे लागतात . जैविक घड्याळाप्रमाणे आपली दिनचर्या निश्चित केली, तर आपण निरोगी जीवनाचा दीर्घकाळ आनंद घेऊ शकतो.
मी नेहमीच्या घड्याळ सारखच आतील बाजूने बारा तासाच आणि बाहेरील बाजूने 24 तासाच जैविक घड्याळ च मॉडेल बनवल आहे . यामध्ये शरीरातील बारा अवयवांचे कार्य स्पष्ट केले आहे.एक ते बारा आकडे बारा अवयवांचे कार्य निर्देशित करतात . 24 तासाच्या घडाळीनुसार प्रत्येक अवयव दोन तास जास्त सक्रिय असतो.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपण बघतो की शरीराकडे बघण्यासाठी कोणाला वेळच नाही .शालेय जीवनात पाठ्यपुस्तकात हृदय, किडनी, पचनक्रिया म्हणजेच पचन संस्था, श्वसन संस्था ,उत्सर्जन संस्था ,प्रजनन संस्था ,चेतासंस्था या सर्वांचे शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते . पण जैविक घड्याळानुसार आपले शरीर कसे कार्यरत असते . हे विद्यार्थ्यांना ठाऊक असायला हवे .त्याचं ज्ञान विद्यार्थी जीवनातच व्हायला हव. कारण आधुनिक जीवनशैली , मोबाईलच्या नादामुळे विद्यार्थी आपल्या जेवणाच्या ,अभ्यासाच्या ,झोपण्याच्या वेळ पाळत नाहीत,  त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो .म्हणून  मी एका घड्याळाच्या प्रतिकृती द्वारे  शरीराचे कार्य दाखवण्याचा प्रयत्न केला आहे .जे त्यांना जीवनभर उपयोगी पडेल.  शरीराच्या विज्ञानाबरोबर शरीराच्या घड्याळाचा सुद्धा विद्यार्थ्यांना अभ्यास  असावा .जागरण न करता विद्यार्थी आपल्या अभ्यासाची वेळ निश्चित करतील . जैविक घड्याळ डोळ्यासमोर सतत राहिली. आणि त्यानुसार दिनचर्या ठेवली तरआपण नक्कीच नेहमी स्वस्थ राहू . आरोग्यम् धनसंपदा.. 

ऋषीमुनींनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला माहित आहे की पहाटे तीन वाजता ब्रह्म मुहूर्त ची वेळ आहे.त्यावेळी आपण जागे झाले पाहिजे आणि रात्री बारानंतर जागरण करू नये कारण त्यावेळी भूत जागे होतात (मनाला दाखवलेला धाक) असं म्हणतात . आपण ती गोष्ट कधी सिरीयसली घेत नाही . पण आता शरीराच्या जैविक घड्याळामुळे त्याचा शास्त्रीय अर्थ आपल्याला कळाला आहे , की नेमकं त्या वेळेत काय होत असेल. 
   1) पहाटे तीन ते पाच...या काळात फुफुसांची क्रिया अधिक सक्रिय असते , फुफुसाचे शुद्धीकरण होत असते .म्हणून मोकळ्या हवेत फिरल्याने, प्राणायाम केल्याने फुफ्फुस अधिक कार्यक्षम बनतात .असे म्हणतात , पहाटे उठणारे व्यक्ती अधिक बुद्धीमान व उत्साही असतात.Detoxification of lungs take place at this time. 
सुबह की हवा, लाखमोल की दवा.. 

2) पहाटे पाच ते सात ...या कालावधीत आपले मोठे आतडे अधिक कार्यक्षम असते .म्हणून सकाळी कोमट पाणी प्यावे . त्यामुळे मल विसर्जन क्रिया सुलभ होते.यावेळी मल विसर्जन करणाऱ्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही .त्यानंतर स्नान करावे.Be fresh 🍃💦at this time. 

3)सकाळी सात ते नऊ ..या काळात आपले जठर म्हणजेच पोट अधिक सक्रिय असते सूर्योदयाच्या तीन ते साडेतीन तासानंतर जठराग्नी प्रज्वलित झालेला असतो.यावेळी पोट राजा सारखं असते . त्यामुळे भरपूर नाश्ता करावा किंवा जेवण करावे ..
.Good concentration at this time. 

4) सकाळी नऊ ते अकरा..या काळात आपलं SPLEEN म्हणजेच प्लीहा अधिक सक्रिय असते . यावेळी अन्न पाचक रस स्त्रवत असतात.त्यामुळे आपण खाल्लेल्या अन्नाचे पचन व्हायला मदत होते.याच काळात रक्त शुद्धीकरणाचे सुद्धा काम चालू असते .आपण पाणी पिऊ शकतो . 
Makes WBC ,protect from infection, makes strong💪 our immune system

5) अकरा ते एक ..या काळात हृदय अधिक सक्रिय बनलेल असते. त्यामुळे पाणी किंवा तरल पदार्थ घ्यावे .रक्ताद्वारे ऑक्सिजन आणि पोषद्रव्ये सर्व शरीराला पुरवण्याचे काम वेगात चालू असते .एक ते दीड वाजता च्या सुमारास आपण जेवण करू शकतो किंवा काही नाश्ता घेऊ शकतो.
Feeling high energy because active blood circulation by heart❤at this time. 

6) एक ते तीन ...च्या काळात लहान आतडे अधिक सक्रिय असते.या काळात अन्नपचन झाल्यानंतर जो आहार रस तयार होतो .त्याला लहान आतड्याद्वारे रक्तात शोषण केले जाते . आणि त्याला संपूर्ण शरीर भर पोहोचवल्या जात.वामकुक्षी घेण्याचा हा उत्तम काळ असतो .कारण शरीराची ऊर्जा थोडी कमी झालेली असते.
Feeling low energy and nap time. 😴

7) दुपारी तीन ते पाच ..या काळात मूत्राशय अधिक सक्रिय असते .चयापचय क्रियेत तयार झालेले टाकाऊ पदार्थ मूत्राशयात येतात.हे विषारी टाकाऊ पदार्थ शरीराच्या बाहेर टाकण्याची क्रिया म्हणजेच मूत्र प्रवृत्ती होते. Release of liquid waste n energy restore at this time. 

8)पाच ते सात...या काळात किडनीचे म्हणजेच मूत्रपिंडाचे कार्य अधिक प्रभावीपणे चालू असते .किडनी द्वारे पोष द्रव्य रक्तात घेतली जातात .इतर वेळेच्या तुलनेत शरीराचा रक्तदाब वाढलेला असतो . आपण सर्वांनीच ऐकलेलं असते .रात्रीचे जेवण सातच्या आधी करणे आरोग्यास हितकारक आहे.so do our best. 
Kidney store nutrients and build bone marrow at this time. 

9) रात्री सात ते नऊच्या ...काळामध्ये आपले हृदयाचे म्हणजेच रक्ताभिसरण संस्थेचे कार्य अधिक जोमाने चालू असते .या काळात पोषद्रव्ये केशीका आणि पेशी पर्यंत पोहोचवून दिले जातात .मस्तीष्क सुद्धा अधिक सक्रिय असते .त्यामुळे अभ्यास करण्यासाठी ही वेळ खूप चांगली असते.पाठ केलेलं लवकर लक्षात राहते.Best time for our Brain. 

10) रात्री नऊ ते अकरा..या काळात अंतस्त्रावी ग्रंथी अधिक सक्रिय असतात.या ग्रंथीतून विविध संप्रेरके स्त्रवतात.झोप आणणारे मेलाटोनिन संप्रेरक स्त्रवत असल्यामुळे झोप लागायला लागते. या काळात रात्री अकराच्या आत झोपलेच पाहिजे तरच शरीराला पूर्ण विश्रांती मिळते. जशी भूकेची वेळ टळून गेली की भूक पळून जाते तसे झोपेचीही वेळ टळून गेली की, झोपही पळून जाते व भविष्यात निद्रानाशाची समस्या उद्भवू शकते. मात्र, या वेळेत नियमितपणे झोपणार्‍यांना भविष्यातही निद्रानाश होऊ शकत नाही. या कालावधीत आपल्या शरीरातील सर्व अवयव व सर्व सिस्टिम पुन्हा नव्या ऊर्जेने कार्यरत होण्यासाठी तयार होत असतात. त्यामुळे या कालावधीत झोपणार्‍यांना पुढील दिवस उत्साहात जातो. झोपेतून जागही लवकर रोजच्या वेळेवर येतो .
Due to Burning of fats at this time regulate our body temperature.
 
11) रात्री 11 ते1 ..
या कालावधीमध्ये पित्ताशय अधिक सक्रिय असते. या काळात झोपलेले असावे, या काळात नवीन ऊर्जा आपल्या शरीरात साठायला लागते व ती पुढील दिवसभरात सर्व कामे करण्यासाठी उपयोगी पडते. त्यामुळेच या काळात झोप झाल्यावर पुढील दिवसभर उत्साही वाटते. जागरणामुळे नेत्ररोग होऊ शकतात ,बुढापा लवकर येतो .Body restore energy ,build new cell and cell repair take place at this time. Gall bladder release bile juice. 

12) रात्री एक ते तीन ...या काळात शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी Liver म्हणजेच यकृत खूप सक्रिय असते . यावेळी शरीर शुद्धीकरणाचे काम चालू असते.त्यामुळे झोपलेले असणे आवश्यक आहे .या काळात जागी राहिल्यास यकृत आपले काम नीट करू शकत नाही .त्यामुळे विषारी द्रव्य यकृतामध्येच राहतात . यकृत विषारी द्रव्ययुक्त बनते . त्या संबंधित आजार व्हायला लागतात. जागरणामुळे पचन तंत्र बिघडते . 
त्यामुळे रात्री अकरा ते तीन या काळात जर झोप व्यवस्थित झाली, तरच पुढील दिवस उत्साहात जातो. अन्यथा दिवसभर अस्वस्थ वाटते.
Take Deep sleep.. Body recover at this time.

 त्यामुळे जैविक घड्याळाप्रमाणे आपले दिनचर्या असली तर आपण आनंदी निरोगी जीवन जगू शकतो. आरोग्यदायी जीवनासाठी चांगल्या सवयी फार महत्त्वाच्या आहेत . जैविक घड्याळाचे ज्ञान अतिशय उपयुक्त आहे .विद्यार्थ्यांना रात्री उशिरापर्यंत मोबाईल वरील गेम किंवा व्हिडिओ पाहण्यामुळे तसेच रात्री जागून अभ्यास केल्यामुळे झोपेचं तंत्र बिघडते . त्याचा परिणाम पचन तंत्रावर होतो.निद्रानाशाच्या समस्या उद्भवतात .त्यामुळेच मुलांना चष्मे लागू शकतात.निद्रानाश, वैफल्य व हृदयविकारांसारख्या अनेक व्याधींवरील उपाय शोधण्यासाठी जैविक घड्याळाची मदत मिळू शकते. तसेच कोणती औषधे दिवसाच्या नेमक्या कोणत्या वेळी घेतली म्हणजे अधिक परिणामकारक ठरू शकतात, याच्या अभ्यासासाठीही हे उपयुक्त आहे. अनेक दिवस अनियमित झोप घेतल्याचे परिणाम अभ्यासण्यासाठी व रात्री उशिरापर्यंत जगणाऱ्या तरुणांवर इलाज करण्यासाठी या जैविक घड्याळाचा खूप फायदा होऊ शकतो
शरीराचं जैविक घड्याळ कार्यरत असल्यानं आपल्याला विशिष्ट वेळी झोप येते आणि विशिष्ट वेळेत जाग सुद्धा येते .शरीराचं चलनवलन आणि आपलं वागणं हे जैविक घड्याळानुसार बदलतं
So... 
Do ur Best because ..Health is wealth
🧘‍♀🧘‍♀️....🏃💨
 

Surekha Makode
@Akot@@

Comments

Popular posts from this blog

Hyderabad Science Study Tour Report

माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी मायक्रो केमिस्ट्री प्रॅक्टिकल किट तयार करणे.

छंद /कला /आवड/ Hobby