मिलेट सर्वश्रेष्ठ आहार
विज्ञानाटोत्सव
विषय -मिलेट सर्वश्रेष्ठ आहार
** शाळेत विज्ञान तासिका**
राष्ट्रगीत झाल्यानंतर मुले वर्गात येतात आणि प्रार्थना म्हणतात ..हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे ..आरोग्य दे ...सर्वांना सुखात ,आनंदात ,ऐश्वर्यात ठेव...सर्वांचं भलं कर ..कल्याणकर ..रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे... प्रार्थना झाल्यानंतर लगेच किलबिलाट चालू होतो . .
सांगा रे टाळ्यांचे प्रकार कोणते आहेत? चला आपण टाळ्या देऊया...
अंकुश --हा मी देतो ऑर्डर..
बटरफ्लाय clap गो ...अपोजिट क्लॅप गो...रॉकेट क्लप गो ..बल्ले बल्ले clap गो...असाच टाळ्यांचा आनंद घेत असताना पहिल्या तासिकेची बेल होते ..
टीचर वर्गात येतात..सर्व मुले एक साथ good morning mam म्हणतात आणि टीचर साठी वेलकम क्लॅप देतात.
टीचर -- सीट डाऊन ऑल ऑफ यु ..थँक यु.. गुड मॉर्निंग
काय ग मुलींनो? ?आज एवढी संख्या कमी का? मॅडम वेदिकाचे डोळे आले ...ओमचे पण आले...चेतनला ताप आहे..बाकी माहित नाही ..
मॅडम-- हो पण हे तिघं सोडून बाकीचे कुठे आहेत? ?
अंकुश-- सोपान आणि विराज गावाला गेले मॅडम..
मॅडम-- हो का ?? शाळा लागल्यावरही गावालाच जात राहा म्हणा ..आम्ही तिथेच शाळा घेऊन येतो.उन्हाळाभर कुठे गेले होते? सुट्ट्यांमध्ये नाही का गावाला जाऊन यायचं ..तेव्हा काय झालं होतं? मस्त जाऊन यायचं होतं मामाच्या घरी ...आता शाळा लागल्यावर नियमित शाळेत यायचं ..काय करावं . ..शाळेच महत्त्वच कळत नाही या विद्यार्थ्यांना...
यश-- जाऊ द्या ना मॅडम ..तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेता.. ..तुमचा शुगर वाढील ना..
मॅडम- अरे मुर्खा, रागाने शुगर नसतो वाढत..बीपी वाढत असतो..
यश -- अहो मॅडम तेच ते..
मॅडम -हो का तुला माहित आहे का? शुगर म्हणजे काय? ती कशाने वाढते?
अंकुश -कोणती शुगर??मॅडम दुकानातली की डब्यातली
...
मॅडम --अरे मुर्खा ती नाही ..आपल्या रक्तातली ..आपल्या रक्तात ग्लुकोज असते ते म्हणजे शुगर ..त्याची लेव्हल जेव्हा 140 ते 170 च्या दरम्यान असते . तेव्हा आपण निरोगी असतो. ती लेवल जास्त झाली तर आपण आजारी पडतो ,तेव्हा मधुमेह किंवा डायबिटीस झाला असे म्हणतात.
आणि हो एकदा का मधुमेह झाला की . .रोज गोळी घ्यावी लागते. शुगर लेवल खूप जास्त असेल तर इन्सुलिनचे इंजेक्शन पण घ्यावी लागतात .
शितल -औषधे घेतली नाही तर काय होते ??मॅडम
मॅडम-- आपण गंभीर आजारी होऊ शकतो . किडन्या खराब होऊ शकतात .परिणामी मृत्यू सुद्धा येऊ शकतो.
अश्विनी- हो मॅडम ,माझ्या घरा शेजारच्या ..एका तिसऱ्या वर्गातल्या स्वरालीला शुगर झाली तिला रोज इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागते..ती स्वतःच रोज इंजेक्शन टोचून घेते.
मॅडम --हो जेव्हा शुगर गोळीने कंट्रोल होत नाही.तेव्हा इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागतात.तरच नियंत्रित राहते .साखर खाणे अजिबात बंद करावे लागते .
स्नेहल --तिला कसा काय झाला,?एवढ्या लहानपणी शुगर चा आजार??
अश्विनी --मॅडम, तिची आई खूप रागट आहे .तिला आईची खूप भीती वाटते .सततच्या दडपणाखाली राहिल्यामुळे तिला ही बिमारी लागली..
मॅडम-- हो पण खूप वाईट झाल.. म्हणूनच मी तुम्हाला सांगते
नेहमी आनंदी राहावं . अभ्यासाच्या च्या तणावाखाली राहू नये.
जमेल तेवढा करावा.
स्नेहल --हो मॅडम ..हा अंकुश तर नेहमी हसतच राहते.
मॅडम-- हसणे आरोग्यासाठी चांगले असते .पण कधीही ?कुठेही? हसू नये.. विनोदी प्रसंग असला तरच हसावे.
लक्षात ठेवा...
आपण आजारी पडू नये म्हणून आरोग्याची काळजी घ्यावी .दररोज भरपूर खेळावे.सकाळी कोवळ्या उन्हात बसावे.ताजे अन्न घ्यावे.वेळेवर झोपावे.. पुरेशी झोप घ्यावी..
आहारात मिलेटचा समावेश करावा..
स्नेहल --मिलेट म्हणजे काय मॅडम?
यश -मिलेट म्हणजे मी सांगू का मॅडम? ? जाऊ द्या.तुम्ही मला मारसाल ...मी नाही सांगत..
अंकुश - मी सांगतो मॅडम मी लेट म्हणजे? मला उशीर झाला.😀😀
मॅडम -- नाही रे ..तसं नाही ..
मिलेट म्हणजे भरड धान्य... लहान-बीज असलेल्या तृण वर्गीय पिकांचा एक अत्यंत वैविध्यपूर्ण गट आहे, जो जगभरात जनावरांचा चारा आणि मानवी अन्नासाठी धान्य म्हणून मोठ्या प्रमाणावर पिकवला जातो. भरड धान्ये ही आकाराने बारीक, गोलाकार तसेच खाण्यासाठी जशीच्या तशी वापरता येतात. त्याला विशेष प्रकारची शुद्धता किंवा कोणतीही विशेष प्रक्रिया करण्याची गरजच नाही.
शितल - हो मॅडम मला माहित आहे ..
आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे संयुक्त राष्ट्रांनी 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून साजरे करण्याची घोषणा केली आहे. “या उपक्रमाच्या माध्यमातून देशांतर्गत तसेच जागतिक पातळीवर भरड धान्यांचा वापर वाढविणे हे आपले उद्दिष्ट आहे,”
मॅडम-- हो आपल्या आहारात जर मीलेट म्हणजेच पॉझिटिव्ह धान्य जसे की जवारी ,बाजरी , नाचणी ,राजगिरा ,भगर यासारख्या धान्याचा जास्तीत जास्त समावेश केला तर आपल्याला बीपी, शुगर यासारखे आजार होणार नाहीत किंवा झाल्यास ते नियंत्रित राहतील .
अश्विनी --माझी आजी नेहमी सांगते जुन्या काळातील लोक जास्तीत जास्त ज्वारीची भाकरी आहारात घेत होते.
मॅडम --आता मात्र आहारात पोळीचा समावेश आहे.
शितल-- मॅडम माझी बहीण तर कधीच भाकर खात नाही . आईने भाकर केली तर ती खूप रडते म्हणून आई सर्वांसाठी पोळ्या करते . आईला पोळ्या करायला ही सोप्या जातात.
मॅडम --हो पण गहू ,तांदूळ अशी ही ऋण धान्य आपण आहारात घेतली असता ,. गव्हातील लुटेन नामांक प्रथिन पचायला खूप जड असते. तेल ,तूप, मास आहारात जास्त घेतल्यास कोलेस्ट्रॉल वाढते आणि त्यामुळे हृदयाचे आरोग्य बिघडते.
अश्विनी --हो मॅडम ,कालच माझ्या काकांना छातीत खूप दुखत होते.डॉक्टर सांगत होते की हे अटॅक चे लक्षण आहे .तुम्ही ताबडतोब दवाखान्यात आणलं म्हणून बरं झालं..
शितल -मॅडम अटॅक कसा असतो?
अंकुश-- अटॅकची ॲक्शन करून दाखवतो.
मॅडम --हृदयाचे आरोग्य राखायचे असेल तर दररोज मिलेटचा आपल्या आहारात समावेश करावा.
ज्वारी, बाजरी ही शरीराला अत्यंत लाभदायक आहे.
ज्वारी ही फायबर युक्त असते. . फायबर मुळे अन्न नलिकेचं कार्य सुरळीत होत असतं.
शितल - हो मॅडम खरंच ...माझी आजी नेहमी सांगते, ज्वारी च्या भाकरीने गॅसेस, बद्धकोष्ठता, जेवण झाल्यावर जड वाटणे, पोट साफ न होणे अश्या तक्रारी अगदी कमी होतात.रोग प्रतिकारक शक्ती वाढवणे :
अश्विनी --ज्वारी मध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियमचं प्रमाण अधिक असल्याने ज्वारीची भाकरी खाल्ल्याने हाडं आणि शिरा मजबूत होतात. ज्वारी मध्ये असलेल्या आयर्न मुळे लाल रक्तपेशी वाढण्यास मदत होते.
शितल-- खावी ज्वारी ,बाजरी ,नाचणी
बनतील हाडे मजबूत काम्बीवाणी
मॅडम -ज्वारी मध्ये असलेल्या फायबर मुळे बॅड कोलेस्ट्रॉल चं प्रमाण कमी होतं ज्यामुळे हृदया संबंधित होणारे आजार जसं की , अटॅक येण्याची शक्यता कमी होते.
पोटदुखी होत नाही : वजन वाढत नाही
शितल --माझ्या काकू खूप लठ्ठ आहेत मॅडम.. Acting
मॅडम--वजन कमी करण्याची ज्यांना इच्छा आहे त्यांनी पोळी, रोटी, चपाती पेक्षा ज्वारीची भाकरी खावी असं डॉक्टर सांगतात.
डायबिटीसने त्रस्त असलेल्या लोकांनी सुद्धा ज्वारीची भाकरी खावी असं सांगितलं जातं.
अश्विनी-- खरंच मॅडम मी मिलेट चे महत्व माझ्या घरी नक्की सांगणार.. म्हणजे काकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल.
आणि माझ्या शेजारच्या डायबिटीस झालेल्या स्वराली ला सुद्धा सांगणार..
मॅडम -- मिलेट मुळे रक्तवाहिन्या मोकळ्या ठेवल्या जातात. यामध्ये शर्करा कमी असल्यामुळे मधुमेह रोगीसुद्धा पोटभर या पिकाचे जेवण करू शकतात.
शितल-- हो मी वाचलं होतं 👉तृणधान्याच्या नियमित सेवनाने लठ्ठपणा, हृदयविकार, मधुमेह, कर्करोग होण्याचे प्रमाण कमी होते आणि आयुर्मान ही वाढते यासाठी आहारामध्ये तृणधान्याचा समावेश असणे गरजेचे आहे...
रवा ,मैद्याचे अति सेवन करू नका . .
मधून लठ्ठपणाला आमंत्रण देऊ नका..
नाचणीमधील पोटॅशियममुळे मूत्रपिंड, हृदय व मेंदू उत्कृष्टपणे काम करतात. व्हिटॅमिन बी हे मेंदूच्या कार्यापासून ते निरोगी पेशी विभाजनापर्यंत उपयोगी, शरीराच्या कॅल्शिअम पूर्ततेसाठी उपयोगी, हाडाचे आरोग्य सुधारते, थकवा कमी करण्यास मदत, शक्तीवर्धक, पित्तशामक असल्याने नाचणी रक्त शुद्ध करण्यास उपयुक्त आहे. कॅल्शियम आणि लोह मुबलक असल्याने गरोदर माता व वयोवृद्ध व्यक्तींना हाडांसाठी व ॲनिमियावर नाचणीचे पदार्थ उपयोगी ठरतात.
बाजरीमध्ये कॅल्शियम, विटामिन A, B व फॉस्फरस, लोह, मँगेनीज अधिक मात्रेत उपलब्ध असते. रक्तातील मेदाचे प्रमाण नियंत्रित, रक्तदाबावर नियंत्रण, हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी व ॲनेमिया आजारावर मात करण्यासाठी बाजरी उपयुक्त आहे. बाजरीत प्रथिने अधिक, ग्लुटेन फ्री असल्याने पचनास सोपे हृदयास सक्षम करते, फॉस्फरस उच्च प्रमाणात आढळते,
पोटॅशियम व फायबर, प्रोटिन्स मोठ्या प्रमाणात आढळते. संधिवात, सांधेदुखी, हृदयासाठी उपयोगी. ग्लुटेन फ्री फायबरमुळे वजन कमी करण्यास उपयुक्त, मॅग्नेशिअम अधिक प्रमाणात असल्याने मायग्रेनसाठीही उपयुक्त आहे.
अंकुश - मॅडम माझी आई उपवासाला सुद्धा तीन वेळा साबुदाणा खायला देते. साबुदाणा शरीरासाठी चांगला असतो का?
मॅडम --उपवासाला साबुदाणा ऐवजी आहारात भगर चा समावेश करावा.भगर खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर तो दूर होतो, गॅसेस होत नाहीत आणि अपचनामुळे पोट दुखत असेल तर ते सुद्धा दुखायचे कमी होते..
नवजात शिशु, बालक आणि माता यांच्यासाठी उत्तम पोषकधान्य आहे. सदृढ आरोग्य व रोगप्रतिकार क्षमतावाढविण्यास वरई उपयुक्त आहे. वरई मधुमेह, ह्रदयरोग यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव कमी करते.
मॅडम - तुम्हा सगळ्यांना राजगिऱ्याचे लाडू सुद्धा खूप आवडत असतील ना.. तो पण मीलेट चा प्रकार आहे
राजगिरा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. राजगिऱ्यामध्ये लोह, फायबर आणि व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत आहे. . हिवाळ्यात राजगिऱ्याचे आणि गुळाचे लाडू खाल्ल्याने हाडे मजबूत होतात, पोटाशी संबंधित आजार दूर होतात.
मीलेट आहे सर्वश्रेष्ठ आहार
त्यामुळे येई जीवनाला बहार
धन्यवाद
संवाद लेखन
सुरेखा माकोडे..
यशोदा माध्यमिक विद्यालय चंदिकापुर अकोट
Comments
Post a Comment