Drama workshop
💫💫 *नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा* 💫💫
शिक्षणाधिकारी कार्यालयाद्वारा आयोजित अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये नाट्यीकरण कौशल्याचा प्रभावी उपयोग करण्यासाठी नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अकोला आणि जे. आर. डी. टाटा स्कूल & लॅब, खडकी, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.
दि ७ ऑक्टोबर २०२३ला सकाळी १०ते ०२ वेळेत संपन्न झालेल्या या नाट्यप्रशिक्षणाला जिल्ह्यातील अनेक शिक्षकांची भरगच्च उपस्थिती होती. यावेळी विविध जिल्ह्यामध्ये कार्याचा ठसा उमटवणा-या व सतत नवनवीन आव्हाणात्मक नाविण्यपूर्ण प्रयोग राबविणा-या अकोला जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य)आदरणीय डॉ सुचिता पाटेकर मॅडम स्वत: उपस्थित होत्या.त्यांनी यवतमाळ,परभणी जिल्ह्यात बालनाट्य प्रयोगाविषयी केलेल्या भरीव कामाविषयी प्रशिक्षणार्थ्यांना विस्तृत माहिती दिली व कार्यशाळेविषयीची अपेक्षा, उद्दिष्टे विषद केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश कवडे सर यांनी केले.
भाषा व वाचिक अभिनयात प्रा. मधु जाधव यांनी नाटकाची व्याख्या सांगताना कथा, घटना, प्रसंग आणि संवाद यांच्या माध्यमातून नाट्य रूपाने व्यक्त होणारा संघर्षमय कथानक आणि अनुभव म्हणजे नाटक होय.तसेच पुढे सुखात्मिकाcomedy, शोकांतिकाtragedy, प्रहसनfarce,अतिनाट्यmelodrama असे नाटकांच्या प्रकाराविषयी माहिती दिली.सिनेसृष्टीत
tragedy किंग दिलीप कुमार व tragedy क्वीन मिनाकुमारी यांना म्हटल्या जाते अशी सामान्य ज्ञानात भरही पडली.
शब्द बदलले तर अर्थ बदलतो अशी काही वाक्य त्यांनी सांगितले.
दारू पिऊ न ये.
छोडो ,मत पकडो . छोडो मत , पकडो
वीज म्हणाली धर तीला.
बालनाट्य आणि दिग्दर्शन प्रकारात मा. डॉ. सुनील गजरे यांनी आवाज वाढविण्यासाठीचे व्यायाम,नाट्यवाचन,नभोनाट्य,
अभिवाचन या विषयावर विस्तृत चर्चा केली.
मा. प्रशांत गावंडे यांनी शाळा आणि नाटक तासिकेमध्ये भूतान मधील शिक्षकांनी अक्षर सुधारण्यासाठी केलेल्या प्रयोगाची माहिती दिली.नदीच्या काठावर दगड भिरकावणा-या मुलास तेच कार्य सतत पाच सहा दिवस करण्यास सांगितले.त्यामुळे लेखन कौशल्यात आमुलाग्र बदल घडून आला. समाजसेवक प्रकाश आमटे सोबतचा सहवास व इंजिनियर कडून शिक्षकांपर्यंतचा प्रवासही विषद केला.
1) या ना...तू जा..., 2) उचलतो बाण आणि मार त्या पक्षाला.. 3) कोण येते ...ही वेगवेगळी उदाहरणे आहेत.
या शब्दांना आदर युक्त, नकारात्मक, प्रेयसी, विनंती, सन्मान अशा वेगवेगळ्या भावाने म्हणता येतात .त्याला वाचिक अभिनय म्हणतात.
तसेच त्यांनी डॉक्टर श्रीराम लागू यांचे वाचिक अभिनयावर आधारित आधारित
God must be crazy 1
Honey I shrunk the kids हे सिनेमे बघायला सांगितले.
चहाची व्यवस्थाही छान होती☕🍵
अभिनय प्रकारात मा.प्रा. अरूण घाटोळेंनी नाटकांतील भरतमुनींनी सांगितलेले रस प्रकार यामध्ये करूण,हास्य,अदभूत,भय,वीर,
शृंगार,बीभत्स,रौद्र,शांत,भक्ती इत्यादींची माहिती दिली. या सर्वांचे त्यांनी छान उदाहरण दिले..
बाळ जन्माला येते तेव्हा करूण रस .
तीन महिन्यााचे असते तेव्हा हसते म्हणजे हास्य रस .
रांगताना इकडे तिकडे नवीन वस्तूला बघून आश्चर्यकारित होते म्हणजे अद्भुत रस .
इकडे तिकडे फिरताना पडण्याची किंवा इतर कशाची भीती वाटते म्हणजे भय रस .
मोठा झाल्यावर मी जिंकणार अशी आशा करतो म्हणजे वीर रस .
प्रेयसीच्या प्रेमात पडतो लग्न करतो म्हणजे शृंगार रस .
काही दिवसांनी खटके उडतात म्हणजे विभक्त रस.
जेव्हा त्याला राग येतो आणि भांडणे होतात तेव्हा रौद्र रस.
जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्व रसांचा आपल्या जीवनात समावेश असतो. असे या उदाहरणातून स्पष्ट होते.
रडणे, वाकोल्या दाखवून भांडण करणे ,शंभर ची नोट सापडली तर ...हे करून ,हास्य ,अद्भुत रसांची उदाहरणे आहेत.
गोऱ्या राधेने काळया कृष्णावर प्रेम केले.
या वाक्यात प्रत्येक शब्दावर जोर देऊन एक नवीन वाक्य तयार होते.
भक्ती बर्वे च्या ती फुलराणी पुस्तकाच खूप छान वर्णन सांगितले.
पाठमोऱ्या होऊन वेगवेगळ्या कृती करा आणि विद्यार्थ्यांना ओळखायला सांगा. पाठमोरे होऊन हालचाल न करता फक्त शब्दांनी भाव व्यक्त करा. अभिवाचन प्रकार..
तसेच प्रशिक्षणार्थ्यांकडून प्रॅक्टिकल ही त्यांनी करून घेतले.त्यामुळे शिक्षकांमधील सुप्त कलेला वाव मिळाला.नाटकासांठी निर्लज्जपणा असणे खूप महत्वाचे असते म्हणजे hollow होणे जरूरीचे आहे असा संदेशही दिला. शिक्षणाधिकारी मॅडम यांनी प्रत्यक्ष सहभागातून सर्व प्रशिक्षाणार्थ्यांना प्रोत्साहित केले.
मा. ओंकार दामले यांनी सादरीकरणाच्या काही टीप्स दिल्या.सहजतेने खेळाच्या माध्यमातून शिक्षक ज्याप्रमाणे वर्गात विद्यार्थ्यांसाठी एखादा अचानक खेळ घेतात.तसा खेळ प्रशिक्षणार्थ्यासाठी घेण्यात आला. त्यामुळे सर्वजण अंचबित झाले. जंगल,राजपुत्र अशा विविध तुटक वाक्यांनीnonstop गोष्ट पूर्ण झाली. यामुळे सर्वजण chargingझाले.चेटकीनीच्या कथा,चॉकलेटचा बंगला यांच्याशी साधर्म्य साधून पूरक मूल्य रूजविणे विद्यार्थ्यात रूजवायला हवे असा अट्टहास त्यांनी केला.
रंगभूषा आणि वेशभूषा यामध्ये कोणत्याही नाटकासाठी साजेशी रंगभूषा,वेशभूषा महत्वाची असते. हलका मेकअप, रंगमंच मेकअप,निमगोरा रंगासाठी २७नंचा मेकअप,आयब्रो पेन्सील,विग ,पॅनकेक इत्यादींची थोडक्यात माहिती मिळाली.
या बहारदार कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निलेश कवडे सर यांनी केले, तर आभारप्रदर्शन शिक्षणाधिकारी डॉ सुचिता पाटेकर यांनी केले.प्रशिक्षणाची भेट म्हणून पुस्तक स्वरूपात प्रा मधू जाधव लिखित चौफेर व नाट्यांगण मिळाले.शेवटी कुमार गंधर्व यांच्या ओळी आठवून जातात ---
*ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी*
भेटीत तृष्टता मोठी
भेटीत तूष्टता मोठी......
Comments
Post a Comment