रंग मैत्रीचे

रंग मैत्रीचे🌷

मैत्री असावीअशी की ऊनातही सावली
 सुख दुःखात तीची साथ पावलोपावली🌷

 वागण असाव अल्लड ,बोलण ही गोड
उथळ पाण्याला  जसा तळ खूप खोल 🌷

हास्य गमती कराव्या खळखळून
 मनाची सरिता मग वाहते दुथडी भरून🌷

 मैत्रीच असावं प्रत्येकाजवळ एक खातं, 
 मनाचे व्यवहार करायला तिथे सोप जातं🌷

मैत्री असावी जशी ऊन सावलीचा खेळ, 
रुसवे-फुगवे काढण्यात नको जायला वेळ🌷

 मैत्री  असावी  जसे जंगल घनदाट, 
 बाहेर निघायला नकोच कुठे वाट🌷

 मैत्री म्हणजे मौज मनमयुराची, 
जगण्यात जणू उधळण सप्तरंगाची🌷

 खरंच मैत्री म्हणजे दुधावरची साय , 
 ती भेटल्यावर मनाला हवं तरी काय🌷
                शब्द गुंफण 
               सुरेखा माकोडे, अकोट

Comments

Popular posts from this blog

लाडक्या गणपती बाप्पाला पत्र

माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी मायक्रो केमिस्ट्री प्रॅक्टिकल किट तयार करणे.

आर्यभट्ट गगनयान पुरातन ज्ञान ते अनंत कक्षा