Posts

Showing posts from January, 2022

The woman scientist of India

Indian Independence Movement Role of science India's women scientist  On the occasion Celebration of 75th years of independence , the nectar festival of freedom should be organized in such a way that freedom struggle and role of science should be experience.Women plays an important role in the  scientific progress of India. They are the glow of modern India. Means talent and strength of our scientist is the power of India.When our country celebrate Amrit mahotsav, it shows where we will be? What will be  our place in the world? Where will you take India?  So,the freedom struggle of India and role of science will inspire us for our progress.  The female scientists from pre-independence era whose contribution to the field of science is part of our rich legacy: Gender roles were largely deterministic in the eighteenth century and women made substantial advances in science. During the nineteenth century, women were excluded from most formal scientific education, but...

सखी

   सखी, तुु जाई मी जुई  मनमोहक मैत्रीचा  गंध ग बाई  मैत्रीचा आपल्या झालाय मुरब्बा  आता कोण साखर नि कोण आंबा  प्रत्येक भेटीच असते नव चैतन्य  तरुणच राहू आपल्या मैत्रीच तारुण्य कुणाच्या विचारांचे कुणावर नाही वर्चस्व घेतो भावना सांभाळून असो दीर्घ वा रस्व           नेहमी जुळते आमच्या विचारांची कविता           सदैव प्रेरणा आम्ही एकमेकी करिता न बोलता ही जे वाटतं ते तिला बरोबर कळतं रस्ते जरी वळणाचे तरी मन एकच वाट शोधत एकमेकिंशिवाय आपलं हलत नाही पान  शॉपिंगची तर येते मजाच खूप छान मैत्रीच आपलं विश्व भलमोठ  रेशीमता त्यात नाही कमी कुठ उपभोगून तंत्रज्ञानाची खास भेट  नेहमीच ठेवतो स्वतःला अपडेट सतत स्पर्धा प्रदर्शनांना हजेरी लावून  माहितीचा खजिना येतो सोबत घेऊन एकमेकींच्या आपण सल्लागार समिती सहजच मिळवतो मार्गदर्शन नी माहिती                       खरंच  ....  मैत्री म्हणजे रंग जगण्याचे मैत्री म्हणजे रंग इंद्रधनुचे सुरेखा माकोडे ,आक...

आई

Image
आकोट

श्वास

Image
श्वास श्वासात तु ध्यासात तू देह मंदिरात तू ही तू सृष्टीत तू दृष्टीत तू  जळी स्थळी तू ही तू  रानात तू वनात तू  पानापानात तू ही तू जाणीव तू उणीव तू  रंध्रारंध्रात तू ही तू  गंधही तू चव ही तू   पंचेंद्रियात तू ही तू व्यक्त तू अव्यक्त तू  अग्नीसाक्षी तू ही तू    क्रिया तू प्रतिक्रिया तू कर्ता करविता तू ही तू  चेतन तू अचेतन तू  चराचरात तू ही तू   ओम तू ओंकार तू   सौंदर्यात तू ही तू शक्ती तू सामर्थ्य तू  रोमरोमात तू ही तू ज्ञानात तू बुद्धीत तू   अंतरंगात तू हि तू जोवर तन-मन-धनाची आस  तोवर फक्त एक श्वास श्वास       सुरेखा माकोडे, अकोट

झुंज जगण्याशी

Image
झुंज जगण्याशी  जोडीदार तिच्या संसाराचा ,होता महामेरू .. आकस्मिक उडून गेले त्याचे प्राणपाखरू...  गेला सोडून तिचा विठ्ठल अर्ध्या वाटेवर... देऊन संसारधुरा रुक्माईच्या खांद्यावर...   अशी केली त्याची नियतीने फसगत,.. श्वासाचीही त्याला दिली नाही सवलत...  अश्रू झाले अनावर, जिव झाला निष्प्राण..  लेकरांचा तिच्या तो होता जीव की प्राण..  तारुण्यातच तिला सोडून गेला वाऱ्यावर...   पुरुषी जबाबदाऱ्या आल्या अंगाखांद्यावर  रुतले चिखलात तिच्या संसाररथाचे चाक..   ओढून ओढून मात्र तिची होते दमछाक ...  चालून दुःखाच्या निखाऱ्यावर...  सोसते चटके एकटीच्या जीवावर ....  हरवले  जरी आभाळ ,सुख झाले गहाळ ...   तूच दाखव मार्ग ईश्वरा ,तूच कर सांभाळ ...   उडण्या आकाशी पिल्लांना ,सामर्थ्य दे पंखात . ..  जगण्याशी झुंजण्यास , सहनशक्ती दे अंगात.. उठ, कर शक्तीची उपासना येण्या बळ अंगी..   तूच आहे तुझ्या संसाराची रणचंडी, सप्तशृंगी..  .               शब्द ग...

तिचे आनंदी जगणे

Image
आनंदी जगणे ही खरंच एक कला आहे.. नाहीतर सर्व असूनही जगणं निराश आहे..   पैसे खर्च करूनही खरा आनंद मिळवता येत नाही...   सकारात्मक दृष्टी शिवाय जगण्याला अर्थ येत नाही ..  लढाई जगण्याची तिची कधीच थांबली नाही ..  झुंजत राहिले वेळेशी ती कधी हरले नाही ..    जर ,भाकरीचा चंद्र शोधण्यात तिचं आयुष्य जाईल ...   तर ,खरंच  तिला कला संशोधन कसं शक्य होईल..   तिचा सतत वेळ जातो पैशाचा हिशोब जोडण्यात...   उधारीचे हास्य चेहऱ्यावर ओढून ताणून आणण्यात...   काही मिळो ना मिळो आनंद मिळतो कुठूनही...   पण तो मिळवण्याचा मार्ग शोधता यावा कुठूनही ...  सतत सोडवत प्रश्नांना ती उत्तर शोधत राहिले...   आलेला प्रत्येक क्षण मात्र आनंदाने जगत राहिले...  संसार रथ ओढतेस आयुष्यभर  विसावा न घेता कधीही क्षणभर...   परिस्थितीशी संघर्ष तिचा कधीही संपला नाही . .  जीवनातला आनंद मात्र कमी होऊ दिला नाही...  अळखड जगण्याचा हा तिचा मंत्र...   दाखवतो रस्ता असो कितीही काळोखी रा...