रंग विज्ञानाचा..Inspire Award
माझ्या बाल वैज्ञानिकांच्या जीवनातील बहुमूल्य सन्मान म्हणजे इंस्पायर अवार्ड योजने मध्ये राज्यस्तरावर निवड
.मुलांच्या जिज्ञासा ,कुतूहल आणि सृजनशिल कल्पनाशक्तीला वाव देणारी ..राष्ट्रीय दर्जाची अत्यंत साधी ,सरळ ,सोपी नोंदणी प्रक्रिया असणारी इन्स्पायर अवार्ड योजना.
शोधांची दुनिया, जादुई नगरी ,सतत सत्याचा शोध ,निसर्गातील घडणाऱ्या घटनांचे निरीक्षण ,त्यातून निर्माण होणारी जिज्ञासा ...का? कुठे? कसा ?उलगडण्याचा प्रयत्न ..हा एक मानवाच्या जगण्याचा वेगळाच रंग नाही का? वैज्ञानिक वृत्ती ला चालना देणारा जीवनाचा रंग .त्यातूनच जीवनाला सहज, सुलभ, सुकर बनवण्याचा सततचा प्रयत्न .मानवी जीवनाचे रंगच बदलून टाकणारे प्रगत विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे विश्व .हे सारे सहज शक्य झाले ते मानवाच्या सततच्या निरीक्षणातून .निसर्गाच्या घडणाऱ्या घटनांच्या शोधातून ..जसे जलचक्र , ऑक्सिजन चक्र, जीव भू रसायन चक्र ,ऋतुचक्र . सततच्या संशोधनातून निकषाप्रत पोहोचलेले व्याख्या, नियम, सूत्र ,सिद्धांत जे मानवी जीवनाला अत्यंत मोलाचे ठरले आहे.विज्ञान तर मानवी जीवनाला वरदानच.
लहानपणी मूल आईला ,शाळेत गेल्यावर टीचरला ,जर प्रश्न विचारत असतील, पान हिरवी का ?फुले रंगीत का? बी पासून झाड ,झाडापासून बी कशी तयार होते? अशा प्रश्नांना आनंदाने उत्तर द्यावे .जर का त्याला रागवून चूप बस. मध्ये बोलू नको. म्हटले तर त्याची चौकस प्रवृत्ती हळूहळू लोप पावते. म्हणून नेहमीच लहान मुलांच्या चौकस वृत्तीला खतपाणी घालण्याचे काम करावे . कारण नवनवीन प्रश्न विचारणार मूल म्हणजे बहुमूल्य संपत्तीच होय.
अशा कल्पनाशील मुलांसाठी इन्स्पायर अवॉर्ड योजना म्हणजे सुवर्णसंधीच होय.मुलांच्या जिज्ञासा ,कुतूहल, सृजनशील विचारांना वाव देणारी राष्ट्रीय दर्जाची योजना. बाल वैज्ञानिकांची जणू स्पर्धाच ..2009 पासून भारत सरकारने या योजनेची सुरुवात केलेली आहे .नोंदणी प्रक्रिया सुद्धा अत्यंत साधी सरळ आणि सोपी. वर्ग 6 ते 10 च्या किशोरवयीन प्रज्ञावंत मुलांसाठी उत्कृष्ट संधी. निवड प्राप्त मुलांना दहा हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येते. मॉडेल बनवणे ,प्रदर्शनस्थळी ये-जा करणे हा खर्च त्यातूनच . .त्यासाठी सर्वप्रथम आपल्या शाळेचे रजिस्ट्रेशन करावे .त्यानंतर तुमच्या आयडिया चे नॉमिनेशन करण्यासाठी विद्यार्थ्याचा पासपोर्ट फोटो, आधार कार्ड ,अकाउंट नंबर यांची झेरॉक्स.तुम्ही केलेल्या या मॉडेलचे नाव ,त्याचे 200 शब्दात वर्णन आणि आकृती ,video चालेल. संपूर्ण देशभरातून अशा एक लाख आयडीयांचे सिलेक्शन NIF करते. या सर्वांचे जिल्हास्तरावर प्रदर्शन भरते .त्यातून 10 टक्के विद्यार्थी राज्यस्तर यासाठी निवडण्यात येतात.नंतर त्यातून दहा टक्के विद्यार्थी राष्ट्रीय स्तरासाठी निवडल्या जातात.शेवटी 60 विद्यार्थ्यांचे सिलेक्शन होते.त्यांचे राष्ट्रपती भवनात प्रदर्शन भरवले जाते .त्यांना जपान ला जाण्या सुद्धा संधी मिळते.
मी आतापर्यंत पाच वेळा माझ्या विद्यार्थ्यांना लाभ मिळवून दिला आहे त्यापैकी दोन वेळा माझ्या शाळेचे मॉडेल राज्य स्तरापर्यंत पोचले आहे 1)आधुनिक पद्धतीने पीक संरक्षण -2017 मध्ये( 2) Easy urinals - 2019 मध्ये
राज्यस्तरीय प्रदर्शनाचा सुद्धा एक वेगळाच अनुभव विद्यार्थ्यांना येतो.तीन दिवस घरापासून लांब राहणे. तिथे स्वतःला जुळवून घेणे . इतरांशी विचारांचे आदान-प्रदान करणे .स्वतःचे मॉडेल इतरांना समजून सांगणे आणि राज्यभरातून आलेल्या मॉडेल्स ला बघणे ,समजून घेणे. नवनवीन विचार आत्मसात करणे.. ग्रामीण भागातील मुलांना हे सर्व नवीन असतं. त्यांच्या जीवनातील एक अनोखा अनुभव. म्हणून त्यांना असे उपक्रम उपलब्ध करून द्यावे .वैज्ञानिक विचारांचे प्रसार करणारे सर्वोत्तम माध्यम म्हणजे विद्यार्थी . त्यांच्या नवविचारां वर संशोधन करण्याचं काम NIF (National Innovation Foundation)करते .
इंस्पायर अवार्ड मध्ये फक्त आयडिया इनोव्हेटिव्ह असणे आवश्यक आहे. तुमच्या मॉडेल्स चा काहीही गाजावाजा नको .खूप मोठ असाव किंवा खूप महाग असावं असंही नाही. फक्त ते समाज उपयोगी आणि सहज उपलब्ध होणार असाव.
2019 च्या राज्यस्तरीय प्रदर्शनी मधील माझी ओळख श्री ..ठाकरे सर यवतमाळ यांच्याशी झाली .त्यांचे दोन मॉडेल नॅशनल ला गेले आणि एक राज्यस्तरावर. अगदी साधं श्रवण यंत्र .जे कर्णबधिरांना अत्यंत उपयोगी आणि फक्त 250 रुपयात तयार होणार ऑडिओ ट्रांसफार्मर त्यातील एंपलीफायर ची एक तार दाताला जोडली की आवाज ऐकू येतात.म्हणजेच हाडातून सुद्धा ध्वनी ऐकायला येतो ,हेच त्या मॉडेल चे नाविन..
आपल्या दररोजच्या जीवनात आपल्याला कुठे समस्या येतात, एखादे उपकरण वापरत असताना काही समस्या असतील ... किंवा आणखी नवीन काही ...तर त्यावर उपाय म्हणून जर काही तुम्ही शोधले ...,त्याला म्हणतात New आयडिया. बस . . आयडिया चा विचार करताना clean India,Green India,Digital India, Make in India,Best from waste या विषयावर जास्तीत जास्त भर द्यावा . त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करत राहावे . शाळेचे उत्कृष्ट आयडियाची निवड करावी .अशाच नाविन्यपूर्ण आयडी यांचे येथे प्रदर्शन भरवल्या जाते.
विभागीय विज्ञान मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर भास्कर सर यांना इन्स्पायर अवॉर्ड योजनेचा लाभ शहरी तसेच ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा अशी त्यांची तळमळ आहे.विज्ञानाचे जाळे तळागाळापर्यंत पोहोचवणे हे त्यांचे जणू ध्येयच आहे . यासाठी सर्वतोपरी प्रयत्न चालू आहेत .प्रत्येक शाळेने या योजनेचा लाभ घ्यावा अशी त्यांची हार्दिक इच्छा आहे. जिल्ह्यातून जेवढे जास्त बाल वैज्ञानिक सहभागी होतील तेवढे जास्त राज्य स्थळासाठी निवडल्या जातील... 💐💐
@Inspire Awards manak#
@बालवैज्ञानिक#
@Thinking in diffent way ..कल्पकता#
@New ideas..सृजनशील#
मस्त👌 inspire award exhibition information 👍
ReplyDeleteNice 👍 All the best for next exhibition
ReplyDeleteVery nice platform for students n very nicely explained in simple language. Congratulations for ur achievements n all d best
ReplyDeleteInformative
ReplyDelete